मुंबई : कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात लॉकडाऊनची घोषणा केली. या घोषणेनुसार आज रात्री 12 वाजेपासून 21 दिवसांसाठी देशभरात लॉकडाऊन असणार आहे. या घोषनेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray on Lock Down) यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी जनतेला धीर देत जीवनाश्यक वस्तूंचा सुरळीतपणे पुरवठा होईल, असं आश्वासन दिलं.
“गैरसमज करुन घेऊन नका. युरोपीय देशांसारखी परिस्थिती निर्माण होऊ नये त्यामुळे आपण अत्यंत महत्त्वाची पाऊलं उचलत आहोत. आपल्या मनातील भीती दूर करा. कोणत्याही परिस्थितीत जीवनाश्यक वस्तू, सेवा पुरवणाऱ्या सुविधा सुरु राहतील”, अशी ग्वावी उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray on Lock Down) यांनी दिली.
“औषधे, औषधे बनवणाऱ्या कंपन्या, कर्मचारी वर्ग, जीवनाश्मक सुविधा पुरवणारा महापालिकेचा कर्मचारी वर्ग, अग्निशमक दल, पोलीस, सर्व रुग्णालयाचा कर्मचारी वर्ग, दुधाच्या गाड्या, भाजीपाला, अन्नधान्याच्या वाहतूक करणाऱ्या गाड्या यापैकी काहीही बंद होणार नाही. त्यामुळे काळजी करु नका. या सेवा कधीही बंद होणार नाहीत”, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
मोबाईलवर मिळणार कोरोनाची माहिती
“कोरोना संबंधित माहिती मिळवण्यासाठी व्हॉट्सअॅप चॅटपॉट हे नवीन तंत्रज्ञान माध्यम सुरु करत आहोत. +912026127394 या क्रमांकाच्या व्हाट्सअॅप गृपवर आपल्या सर्व शंकांचं निरसन होईल. हा एक नवा प्रयोग आहे. सध्या हे इंग्रजीत आहे. लवकरच ते मराठी आणि हिंदीत येईल”, अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली.
नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील महत्त्वाची मुद्दे
संपूर्ण देश २१ दिवसासाठी लॉकडाऊन, पंतप्रधान मोदींनी मोठं हत्यार उपसलं, देशभरात कर्फ्यू, जनता कर्फ्यूचं पुढचं पाऊल, आज रात्री १२ पासून अंमलबजावणी, २१ दिवस घरबाहेर पडण्यास मज्जाव
देश आणि देशातील नागरिकांना वाचवण्यासाठी संचारबंदी लागू करतोय, जिथे आहात तिथेच राहा, पंतप्रधान म्हणून नव्हे तर तुमच्या परिवाराचा सदस्य म्हणून विनंती करतोय, मोदींचं आवाहन, प्रत्येक राज्य आणि केंद्र शासित प्रदेश, शहर, गावं लॉकडाऊन
लक्ष्मण रेखा आखून घ्या, रेषा ओलांडाल तर कोरोनासारखा महाभयंकर रोग घरी घेऊन याल, पंतप्रधान मोदींचा इशारा, कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ब्रेक द चेन गरजेची
काहीही होऊ दे घराबाहेर पडायचंच नाही, देशवासियांनी निर्धार करण्याचा मोदींचा सल्ला, जगाला हैराण केलेल्या कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी मोदींचा मंत्रा
‘जान है तो जहान है’, स्वत: बाहेर पडून इतरांना धोक्यात घालू नका, मोदींची विनंती, महामारीपासून लोकांचे जीव वाचवण्यासाठी दिवस-रात्र काम करणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांना सलाम
चीन, इटली, जर्मनी, अमेरिका यांची आरोग्य यंत्रणा उत्तम, तरीही तिथली परिस्थिती भीषण, मोठं संकट टाळण्यासाठी घरातून बाहेरच पडू नका, मोदींचं आवाहन
कोरोनाविरूद्ध लढण्यासाठी 15 हजार कोटींचं पॅकेज, पंतप्रधान मोदींकडून घोषणा, व्हेंटिलेटर, मास्क, अन्य साधनं वाढवण्यावर भर
अफवा आणि अंधश्रद्धेवर विश्वास ठेवू नका, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधं घेऊ नका, केंद्र आणि राज्य सरकारच्या सूचनांचं पालन करा, मोदींचा सल्ला
21 दिवसांचा लॉक डाऊन मोठा काळ, मात्र तुमच्या आणि कुटुंबीयांच्या स्वास्थ्यासाठी हा निर्णय आवश्यक, प्रत्येक हिंदुस्थानी नेटाने लढेल, मोदींना विश्वास
संबंधित बातम्या :
भारताला वाचवण्यासाठी आज रात्री 12 पासून संपूर्ण देशात लॉकडाऊन : पंतप्रधान मोदी