मुंबई: धार्मिकस्थळं सुरू करण्यासाठी राज्यात भाजपसह विविध संघटनांनी आंदोलनं केलेली असतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मात्र इतक्यात मंदिरे सुरू करणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. मंदिरे सुरू करण्याचा निर्णय हळूहळू घेऊ. घाईघाईत कोणताही निर्णय घेण्यात येणार नाही, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केल्याने राज्यातील प्रार्थनास्थळं सुरू होण्यासाठी भक्तांना आणखी काहीकाळ प्रतिक्षा करावी लागणार आहे. (cm uddhav thackeray on reopening worship places)
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मंदिरं घाईघाईत सुरू करणार नसल्याचं स्पष्ट केलं. कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यापासून गर्दी करू नका म्हणून मी सर्वांना आवाहन करत आहे. सणासुदीतही हे आवाहन केलं होतं. सर्व धर्मीयांनी माझं म्हणणं ऐकलं. आता दिवाळी आणि नवरात्र येत आहेत. त्यामुळे या काळातही आपल्याला सोशल डिस्टन्सिंगचं पालन करायचं आहे. तोंडाला मास्क लावणं हे बंधनकारक आहे. इतर सणांप्रमाणेच येणाऱ्या सणांच्यावेळीही सर्वांनीच खबदारी घ्यायची आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
राज्यातील मंदिर सुरु करण्याबाबत सध्या आम्ही हळूवारपणे पावले उचलत आहोत. अनेकजण हे सुरू झालं, मग ते का नाही, असे प्रश्न विचारत आहेत. मात्र, त्यांनी शांत बसावे. सरकार चालवण्याची जबाबदारी तुमच्यावर नव्हे तर आमच्यावर आहे. आम्हाला जनतेची काळजी आहे. उगाच तंगड्यात तंगडं घालण्याची सवय नाही. आपण सर्व दारे हळुवार उघडतोय. या दारांतून सुबत्ता आणि समृद्धी आली पाहिजे. योग्य काळजी न घेतल्यास या दारांतून कोरोना शिरेल. त्यामुळे राज्यातील मंदिरे सुरु करण्याबाबत योग्यवेळी निर्णय घेतला जाईल, असंही त्यांनी सांगितलं.
CM Uddhav Balasaheb Thackeray addressing the State https://t.co/E8qhmRTulz
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) October 11, 2020
अनेक देशात पुन्हा लॉकडाऊन करावा लागला आहे. ब्रिटनमध्ये तर सहा महिने नियमावली लागू राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी निर्धास्त राहू नये. स्वत:ची काळजी घ्यावी. दिलेल्या सूचनांचं कटाक्षाने पालन करावं. एक क्षणही गाफील राहू नका आणि कोरोनाचा बळी ठरू नका, असंही ते म्हणाले. (cm uddhav thackeray on reopening worship places)
#मुंबई : मुंबई लोकल लवकर सुरु होणार नाही, मला गर्दी नकोय, मला कोरोना फैलाव नकोय : मुख्यमंत्री https://t.co/Mdv0mdobIt
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 11, 2020
संबंधित बातम्या:
मला लोकलमध्ये गर्दी नको; तूर्तास लोकल सुरु न करण्याचे मुख्यमंत्र्यांचे संकेत
मोठी बातमी: मेट्रोची कारशेड आरेत नव्हे कांजूरमार्गला होणार; उद्धव ठाकरेंची घोषणा
लोकल सुरु करण्यासाठी तातडीने धोरण आखा; मंत्र्यांवरही जबाबदारी सोपवा- हायकोर्ट
(cm uddhav thackeray on reopening worship places)