नुकसान भरपाईचा निर्णय घाईघाईत घेणार नाही; पंचनामे झाल्यानंतरच मदत मिळेल- मुख्यमंत्री

| Updated on: Oct 19, 2020 | 3:36 PM

केंद्र सरकार हे आपल्याच देशातील सरकार आहे, परदेशातील नव्हे. राज्यांना मदत करणे हे केंद्राचे कर्तव्य आहे. (CM Uddhav Thackeray Solpaur visit).

नुकसान भरपाईचा निर्णय घाईघाईत घेणार नाही; पंचनामे झाल्यानंतरच मदत मिळेल- मुख्यमंत्री
Follow us on

सोलापूर: अतिवृष्टीचे संकट टळेपर्यंत नुकसानभरपाईसंदर्भात कोणताही निर्णय घाईने घेतला जाणार नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. सध्या आम्ही माहिती घेण्याचे काम करत आहोत. विविध भागांत नुकसानीचे पंचनामेही सुरु आहेत. या सगळ्याचा अंदाज घेतल्यानंतर प्रत्यक्ष मदत जाहीर केली जाईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. (CM Uddhav Thackeray Press conference after Solapur Visit)

ते सोमवारी सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत बोलत होते. वेळ पडल्यास आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मदत मागू, या वक्तव्याचा त्यांनी पुनरुच्चारही केला. केंद्र सरकार हे आपल्याच देशातील सरकार आहे, परदेशातील नव्हे. राज्यांना मदत करणे हे केंद्राचे कर्तव्य आहे. राज्यातील विरोधक केवळ पक्षीय राजकारणाचा विचार करत असतील. मात्र, देशाच्या सरकारला मदत करताना पक्षपात करून चालत नाही. अतिवृष्टीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मला फोन केला होता. त्यामुळे त्यांना या सगळ्याची जाणीव असेल, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.


तसेच महाविकासआघाडी सरकारने केंद्र सरकारवर जबाबदारी ढकलून मोकळे होऊ नये, असा धोशा लावणाऱ्या राज्यातील भाजप नेत्यांनाही मुख्यमंत्र्यांनी फटकारले. मला या मुद्दयावरून राजकारण करायचे नाही. त्यामुळे कोणीही एकमेकांवर चिखल उडवू नये. केंद्र काय करणार किंवा राज्य काय करणार, ही चर्चा करण्यात अर्थ नाही. राज्याला केंद्राच्या मदतीची गरज असेल तर सर्वांनी एकत्र येऊन ही मागणी मागितली पाहिजे. देवेंद्र फडणवीस यांनी बिहारमध्ये प्रचारा करण्यापेक्षा स्वत:च राज्य संकटात असताना केंद्राकडे एकवटून मदत मागावी, असा टोलाही यावेळी उद्धव ठाकरे यांनी लगावला.

मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतील ठळक मुद्दे पुढीलप्रमाणे :

[svt-event title=”घाबरु नका, तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही” date=”19/10/2020,3:00PM” class=”svt-cd-green” ] नुकसानग्रस्त शेतकरी, घरांची पडझड झालेले नागरिक यांच्या पाठिशी शासन खंबीरपणे उभे राहील. कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही. तुम्हाला दिलासा देण्यासाठी आम्ही आलो आहोत. तुम्ही सुरक्षित रहा, तुमची काळजी शासन घेईल, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना धीर दिला. [/svt-event]

[svt-event title=”गाफील राहू नका, अजून दोन-तीन दिवस पावसाचा धोका” date=”19/10/2020,2:55PM” class=”svt-cd-green” ] राज्यातील अतिवृष्टीचा धोका अजून सरलेला नाही. येत्या दोन ते तीन दिवसांत मुसळधार पाऊस होण्याची इशारा वेधशाळेने दिला आहे. त्यामुळे लोकांनी गाफील राहू नये. सर्वप्रथम स्वत:ला सुरक्षित ठेवावे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. [/svt-event]

[svt-event title=”केंद्र सरकार हे देशाचं सरकारं आहे परदेशातलं नव्हे, राज्यांची काळजी घेणे कर्तव्य- मुख्यमंत्री” date=”19/10/2020,2:52PM” class=”svt-cd-green” ] आर्थिक मदतीच्या मुदतीवरून राजकारण करु नये. सर्वांनी एकत्र मिळून राज्यासाठी केंद्र सरकारकडे मदत मागितली पाहिजे. केंद्र सरकार हे देशाचं सरकारं आहे परदेशातलं नव्हे, राज्यांची काळजी घेणे हे केंद्र सरकारचे कर्तव्य आहे. [/svt-event]

[svt-event title=”परिस्थिती आजच कळली नाही, सुरुवातीपासून यंत्रणांच्या संपर्कात” date=”19/10/2020,2:46PM” class=”svt-cd-green” ] आजच मला परिस्थिती कळली असं नाही. पावसाला सुरुवात झाल्यापासून यंत्रणेच्या संपर्कात आहे. नुकसान किती होतंय, पाऊस किती पडतोय याची माहिती सातत्याने घेत होतो. [/svt-event]

[svt-event title=”नुकसानग्रस्तांना धनादेशाचे वाटप” date=”19/10/2020,3:01PM” class=”svt-cd-green” ] पत्रकार परिषदेपूर्वी नुकसानग्रस्त रमेश बिराजदार, लक्ष्मण कोणदे, शोभा बिराजदार, नागेंद्र बिराजदार, चन्नव्वा वाघमारे यांना प्रातिनिधीक स्वरूपात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मदतीच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले. [/svt-event]

संबंधित बातम्या: 

पुढचे 24 तास राज्यासाठी धोक्याचे, हवामान खात्याकडून ‘या’ जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

रस्ता वाहून गेला, गाडी जाण्यास मार्ग नाही, चिखल-गाळ तुडवत फडणवीस नुकसानग्रस्तांच्या भेटीला

(CM Uddhav Thackeray Press conference after Solapur Visit)