रडू नका, खचून जाऊ नका, आम्ही तुमच्यासोबत आहोत; मुख्यमंत्र्यांनी दिला शेतकऱ्यांना धीर

उस्मानाबाद: शेतीचं नुकसान झाल्यानं रडू नका. खचून जाऊ नका. आलोय ना मी आता घाबरू नका. आम्ही सर्व तुमच्यासोबत आहोत, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांनी धीर दिला. (CM Uddhav Thackeray visits flood-hit areas in Osmanabad) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज उस्मानाबादच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्यासोबत महसूल मंत्री बाळासाहेब थोरातही आहेत. त्यांनी काटगाव येथे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन […]

रडू नका, खचून जाऊ नका, आम्ही तुमच्यासोबत आहोत; मुख्यमंत्र्यांनी दिला शेतकऱ्यांना धीर
Follow us
| Updated on: Oct 21, 2020 | 11:31 AM

उस्मानाबाद: शेतीचं नुकसान झाल्यानं रडू नका. खचून जाऊ नका. आलोय ना मी आता घाबरू नका. आम्ही सर्व तुमच्यासोबत आहोत, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांनी धीर दिला. (CM Uddhav Thackeray visits flood-hit areas in Osmanabad)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज उस्मानाबादच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्यासोबत महसूल मंत्री बाळासाहेब थोरातही आहेत. त्यांनी काटगाव येथे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांची विचारपूस केली. त्यांच्या झालेल्या नुकसानीची माहिती घेतली आणि त्यांना धीरही दिला. मुख्यमंत्री आपल्या गावात आलेले पाहून पुरुषच नव्हे तर महिलांनीही हंबरडा फोडत आपल्या व्यथा मांडल्या.

तुमच्या भागात किती पाऊस झाला? असा पाऊस तुम्ही कधी पाहिला होता का? तुमच्या शेत पिकांचे पंचनामे झालेत का? अशी विचारपूस मुख्यमंत्र्यांनी केली. यावेळी आमच्या आयुष्यात आम्ही असा पाऊस पाहिला नाही. 8 ते 10 फूट पाणी होतं. त्यामुळे आमचं संपूर्ण शेत वाहून गेलं. ऊस, कांदा, कपाशी आणि द्राक्षंही नासली. साडेसात एकरावरील द्राक्षांपैकी साडेचार एकरावरील द्राक्षं वाहून गेली, असं सांगत एका शेतकऱ्याने हंबरडा फोडला. मुख्यमंत्र्यांनीही या शेतकऱ्याला धीर देत रडू नका. खचून जाऊ नका. मी आलोय ना. तुम्ही एकटे नाहीत. आम्ही तुमच्यासोबत आहोत. काळजी करू नका, असा धीर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला.

आकडे सांगायला आलो नाही

मी या ठिकाणी पहिल्यांदा आलो तेव्हा मुख्यमंत्री नव्हतो. आता तुमच्या भेटीला आलो आहे. तुमच्या अपेक्षा मी पूर्ण करणार आहे. मी केवळ आकडे सांगायला आलो नाही. तुम्हाला दिलासा द्यायला आलो आहे. धीर सोडू नका. खचून जाऊ नका. मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. तोपर्यंत 90 टक्के पंचनामे झालेले असतील. तेव्हा तुमचं समाधान होईल, अशी मदत तुम्हाला केली जाईल, असं सांगतानाच मी जे बोलतो ते करतो. जे बोलत नाही. ते करत नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

विद्यार्थीनीच्या अभ्यासाची विचारपूस

यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकरीच नव्हे तर विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचीही विचारपूस केली. अभ्यास सुरू आहे ना? ऑनलाइन शिक्षण आवडतं की शाळेत जायला आवडतं? ऑनलाइनवरून अभ्यास जमतोय ना? असे प्रश्न मुख्यमंत्र्यांनी एका विद्यार्थीनीला विचारला. तिनेही ऑनलाइन अभ्यास आवडतो. पण शाळेत जायला आवडतं, असं सांगितलं. (CM Uddhav Thackeray visits flood-hit areas in Osmanabad)

संबंधित बातम्या:

CM Uddhav Thackeray Osmanabad Visit Live | उद्धव ठाकरे काटगावमध्ये, मुख्यमंत्र्यांसमोरच महिलांचा हंबरडा

कर्जासाठी बँकांकडून शेतकऱ्यांना तगादा, अतिवृष्टीग्रस्त भागात कर्ज वसुली करू नका

मुख्यमंत्र्यांचा दौरा रेड कार्पेटवर, फडणवीस आणि मी चिखलातून शेतकऱ्यांच्या बांधावर, दरेकरांचं टीकास्त्र

(CM Uddhav Thackeray visits flood-hit areas in Osmanabad)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.