अहमदाबाद: केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात देशभरातील शेतकऱ्यांनी उद्या 8 डिसेंबर रोजी भारत बंदची हाक दिली आहे. मात्र, गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी गुजरातमध्ये भारत बंद होणार नसल्याचं स्पष्ट करतानाच गुजरातमध्ये बंद करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. (Cm Vijay Rupani Says Gujarat Is Not Supporting Bharat Bandh Call Made By Farmers)
मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना हा इशारा दिला आहे. शेतकऱ्यांच्या नावावर विरोधक भारत बंद आंदोलन करत आहेत. नाव केवळ शेतकऱ्यांचं आहे. पण विरोधकांना आपलं अस्तित्व टिकवायचं आहे. त्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे, अशी टीका मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी केली आहे. शेतकरी आंदोलनात कोणत्याही राजकीय पक्षांना सामावून घेण्यात येणार नाही, असं शेतकरी नेत्यांनी सांगितलं होतं. तरीही या आंदोलनात अनेक राजकीय पक्ष सामिल झाले आहेत. काँग्रेसचं तर अस्तित्व संपुष्टात आलं आहे. काँग्रेस सोबत ना जनता आहे, ना कोणतीही संघटना. काँग्रेसनेच 2019च्या निवडणूक जाहीरनाम्यात एपीएमसी अॅक्ट रद्द करणार असल्याचं सांगितलं होतं. एमएसपी हटवू असंही त्यांनी म्हटलं होतं, याकडेही रुपाणी यांनी लक्ष वेधलं आहे.
जे लोक गुजरातमध्ये जबरदस्ती बंद पुकारण्याचा प्रयत्न करतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. तसेच राज्यात कायदा आणि सुव्यवस्था लागू करण्यासाठीही सरकार विशेष प्रयत्न करणार आहे, असंही त्यांनी सांगितलं. केंद्र सरकार आणि शेतकऱ्यांदरम्यान पाच टप्प्यात बैठक झाली आहे. त्यातून कोणताही तोडगा निघालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी अखेर 8 डिसेंबर रोजी एक दिवसाचा भारत बंद पुकारला आहे. (Cm Vijay Rupani Says Gujarat Is Not Supporting Bharat Bandh Call Made By Farmers)
गुजरामध्ये 23 शेतकऱ्यांच्या संघटनांनी गुजरात खेडूत संघर्श समिती नावाने नवीन संघटन तयार केलं आहे. या संघटनेने केंद्राच्या कृषी कायद्याला विरोध केला असून भारत बंदला पाठिंबा दिला आहे. गुजरात खेडूत समाज आणि गुजरात किसान सभेच्या संयुक्त बैठकीत एकच संघटना बनविण्याचा निर्णय घेण्यात आला होता, असं खेडूत समाजचे अध्यक्ष जयेश पटेल यांनी सांगितलं. आम्ही संपूर्ण गुजरातमध्ये दहा दिवस धरणे आंदोलन करणार आहोत. त्याआधी आण्ही गांधीनगरात सत्याग्रह छावणीमध्ये किसान संसदेचं आयोजन करणार आहोत. त्यानंतर 12 डिसेंबर रोजी आम्ही दिल्लीकडे कूच करू आणि तिथे धरणे आंदोलनात सहभागी होऊ, असंही पटेल यांनी सांगितलं. (Cm Vijay Rupani Says Gujarat Is Not Supporting Bharat Bandh Call Made By Farmers)
Delhi Farmer Protest | कृषी कायदा, शेतकऱ्यांच्या मागण्या ते सरकारची बाजू, एका क्लिकवर वाचा सगळी माहितीhttps://t.co/93A1xVfn9T#DelhiFarmersProtest #ModiGovt
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 7, 2020
संबंधित बातम्या:
FARMER PROTEST | कृषी कायद्यावर विरोधी पक्षांची भूमिका दुतोंडी ? केंद्रीय कायदा मंत्र्यांचा हल्लाबोल
(Cm Vijay Rupani Says Gujarat Is Not Supporting Bharat Bandh Call Made By Farmers)