कधी संपणार काळोख इथला, काँग्रेस आमदाराकडून झोपडीत दिवाळी साजरी
कधी संपणार काळोख इथला? असा प्रश्नही राजू पारवे यांनी उपस्थित केला आहे. (Congress MLA Raju Parve Celebrate diwali festival With Gopal Community)
नागपूर : दिवाळी म्हटलं की सर्वत्र दिवे, पणत्या आणि आकाशकंदीलाच्या रोषणाईचा झगमगाट पाहायला मिळतो. मात्र नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यातील गोपाळ समाज गेली अनेक वर्षांपासून झोपड्यांमध्ये राहतो. या पार्श्वभूमीवर नागपुरातील काँग्रेस आमदार राजू पारवे यांनी गोपाळ समाजासोबत दिवाळी साजरी केली. यावेळी त्यांनी गोपाळ समाजाच्या वाचा फोडण्याचा प्रयत्न केला. कधी संपणार काळोख इथला? असा प्रश्नही राजू पारवे यांनी उपस्थित केला आहे. (Congress MLA Raju Parve Celebrate diwali festival With Gopal Community)
गेल्या 25 वर्षांपासून गोपाळ समाज हा झोपडीत राहत आहे. या समाजाच्या नावावर ही जमीन कधी होणार, या समाजाचा काळोख कधी संपणार असा प्रश्न राजू पारवे उपस्थित करत आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर राजू पारवे यांनी गोपाळ समाजासोबत दिवाळी साजरी केली. त्यावेळी त्यांनी गोपाळ समाजातील बांधवांना भेटवस्तूचे वाटप केले. त्यानंतर झोपडीतंच त्यांनी सामुहिक भोजन ही केले.
दिवाळी म्हणजे दीपोत्सव, प्रकाशाचा उत्सव. पण चुकीच्या सरकारी धोरणांमुळे समाजातील काही लोक आजंही आंधाराचंच जीवन जगतात. नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यातील गोपाळ समाज गेल्या अनेक वर्षांपासून झोपड्यांमध्ये राहतो. वन विभागाची जागा असल्याने जमीन त्यांच्या नावावर झाली नाही. जगण्यासाठी रोज संघर्ष करणाऱ्या या समाजाच्या समस्या सरकारपर्यंत पोहोचाव्यात यासाठी म्हणून उमरडचे आमदार राजू पारवे यांनी या गोपाळ समाजासोबत रात्र काढत, झोपडीत दिवाळी साजरी केली.
या ठिकाणी राहणाऱ्या सर्व महिलांना कपडे भेट दिले. तसेच गावात फटाके फोडत, दिवे लावत दिवाळी साजरी करण्यात आली. राजू पारवे यांनी दिवाळीचं सामूहिक भोजनं याच गावांमध्ये केलं. एक दिवस आमदार गावात आल्यामुळे इथे रोषणाई आली. पण गोपाळ समाजाच्या समस्या कायम सुटाव्यात, त्यांच्या जीवनातील अंधार दूर होऊन, त्यांचं जीवन कायम प्रकाशमान व्हावं, अशी आशा त्यांनी यानिमित्ताने व्यक्त केली. (Congress MLA Raju Parve Celebrate diwali festival With Gopal Community)
संबंधित बातम्या :
करारनामा नाही तर पाणीपुरवठा नाही!, जलसंपदा विभागाचं नाशिक महापालिकेला पत्र, दिवाळीनंतर विशेष बैठक
नक्षलवाद्यांशी लढणाऱ्या पोलिसांना नवी उमेद, दिवाळीत पहिल्यांदाच गृहमंत्री थेट दुर्गम भागात