Corona | मॉडर्ना वॅक्सीन मानवी शरीरात 3 महिन्यात बनवू शकते अँटीबॉडी, रिसर्चमध्ये दावा

या मॉर्डना लसीचा 17 डिसेंबरला आढावा घेतला जाणार आहे.

Corona | मॉडर्ना वॅक्सीन मानवी शरीरात 3 महिन्यात बनवू शकते अँटीबॉडी, रिसर्चमध्ये दावा
Follow us
| Updated on: Dec 05, 2020 | 7:44 PM

वॉशिंग्टन : कोरोना विषाणूच्या (Corona Virus) लसीकडे सर्व जगाचेच लक्ष लागून राहिले आहे. यातच आता मॉर्डना वॅक्सीनबाबत (Moderna Vaccine) एनआयएआडीच्या वैद्यकीय पथकाने अर्थात (National Institute of Allergy and Infectious Diseases) ने एक दावा केला आहे. या दाव्यानुसार मॉर्डना लस दिल्यानंतर किमान 3 महिन्यांसाठी मानवी शरीरात अॅंटीबॉडी निर्माण करु शकते. वैद्यकीय चाचणीच्या पहिल्या टप्प्यात एकूण 34 जणांवर याचा अभ्यास करण्यात आला. यातून किमान 3 महिने मानवी शरीरात अॅंटीबॉडी राहिल्याचं स्पष्ट झालं. Corona How long will the modern vaccine keep you safe

“याबाबत चिंता करण्याचं कोणतही कारण नाही. ही मॉर्डना लस 3 महिन्यांपर्यंत शरीरात अँटीबॉडी निर्माण करु शकते. या अॅंटीबॉडीमुळे रोग प्रतिकारशक्ती आणखी मजबूत होण्यास मदत होईल”, असा आशावाद नेशनल इंस्टीट्यूट फॉर एलर्जी एंड इंफेक्शियस डिसीज (NIAID) च्या संशोधकांनी व्यक्त केला. क्लिनिकल चाचणी दरम्यान MRNA -1273 लस 28 दिवसांच्या आत दोनदा दिली गेली.

“ही MRNA -1273 लस देण्यात आल्यानंतर जर पुन्हा त्या संबंधित व्यक्तिच्या शरीरात कोरोनाची निर्मिती झाल्यास ही लस पुन्हा सक्रीय होईल. तर याआधी ही 94 टक्के परिणामकारक झाली. मॉर्डना लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर 119 दिवसांमध्ये प्रतिकारशक्ती मजबूत होईल. तर दुसरा डोस घेतल्यास अवघ्या 90 दिवसांमध्ये रोग प्रतिकारशक्ती बळकट करण्यास सुरुवात होईल”, असं एनआयएआयडीमध्ये करण्यात आला आहे.

17 डिसेंबरला लसीचा आढावा

या मॉर्डना लसीचा 17 डिसेंबरला आढावा घेतला जाणार आहे. अन्न आणि औषध प्रशासन अर्थात FDAची सल्लागार समिती या लसीचा आढावा घेणार आहे. या आढाव्यानंतर लस वितरीत करण्याची परवानगी मिळणार आहे. तसेच ब्रिटेनकडून या लसीला लवकरच परवानगी मिळण्याची आशा आहे, असंही मॉर्डनाच्या वैद्यकीय पथकाकडून सांगण्यात आलं.

दुसऱ्या टप्प्यातील चाचणीशिवाय परवानगी

रशियामध्ये कोणत्याही चाचणीशिवाय लसीचा दुसरा टप्पा पूर्ण न करता लस वापरण्यास मान्यता देण्यात आली. या परवानगामुळे जागतिक आरोग्य संघटना (World Health Organistaion) आणि इतर आरोग्य संस्थांच्या टीकेला सामोरे जावे लागले.

अमेरिकेची महागडी मॉर्डना लस

मॉडर्ना ही अमेरिकेच्या कंपनीने कोरोनाची लस बनवली आहे. नावाप्रमाणेच ही लसही मॉर्डन आहे. तिसऱ्या टप्प्यातील चाचणीत 94.5 टक्के यशस्वी ठरल्याचा दावा कंपनीने केला आहे. ही लस 25 ते 30 डॉलर म्हणजेच तब्बल 1800 ते 2700 रुपयांच्या दरम्यान असू शकते. कोरोनाने ज्यांची तब्येत जास्त बिघडली आहे, त्यांच्यासाठी ही लस संजीवनी असेल, असा कंपनीचा दावा आहे.

संबंधित बातम्या :

कोरोना लस कधी येणार? किंमत काय? सगळ्यात आधी कुणाला टोचणार? कोरोना लशीची A to Z माहिती

Corona How long will the modern vaccine keep you safe

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.