आधी घरात जोरदार गणेशोत्सव, मग एकाच कुटुंबातील 35 जणांना कोरोना संसर्ग

कल्याण जोशी बाग परिसरातील एकाच कुटुंबातील 35 जणांना कोरोनाची लागण झाली आहे (Corona infected in Kalyan family).

आधी घरात जोरदार गणेशोत्सव, मग एकाच कुटुंबातील 35 जणांना कोरोना संसर्ग
Follow us
| Updated on: Sep 05, 2020 | 3:15 PM

कल्याण : कल्याण जोशी बाग परिसरातील एकाच कुटुंबातील 35 जणांना कोरोनाची लागण झाली आहे (Corona infected in Kalyan family). या घटनेमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. या कुटुंबातील सर्वांवर सध्या एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. नुकतेच या कुटुंबाने दीड दिवसाचा गणपती बसवला होता. त्यावेळी एकमेकांशी आलेल्या संपर्कानंतर संसर्ग झाल्याची शक्यता आहे. (Corona infected family in Kalyan).

कल्याण पश्चिमेतील जोशीबाग परिसरात राहणारे व्यावसायिक विजय पंडीत यांच्या कुटुंबातील 35 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये एकाला डिस्चार्ज मिळाला आहे, तर उर्वरीत 34 जणांवर उपचार सुरु आहेत.

पंडीत यांच्या घरी दीड दिवसांचा गणपती बसवला होता. गणपती दरम्यान या कुटुंबाला कोरोनाची लागण झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. पंडीत यांच्या कुटुंबात 40 जण आहेत. त्यांचे एकत्र कुटुंब आहे. सगळयांचे जेवण एकाच ठिकाणी केले होते. त्यामुळे सुद्धा कोरोनाचा संसर्ग झाला असावा, असं म्हटलं जात आहे.

दरम्यान, कल्याण डोंबिवलीतील शिवसेना नगरसेवक यांच्यासह त्यांच्या घरातील तीन जणांनाही कोरोनाची बाधा झाली आहे.

कल्याण-डोंबिवलीत आतापर्यंत 665 जणांचा कोरोनाने मृत्यू

कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात कोरोनामुळे आत्तापर्यंत 665 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. तर कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 30 हजार 540 झाली आहे. त्यासोबत 26 हजार रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. सध्या 3 हजार 559 जणांवर उपचार सुरु आहे.

संबंधित बातम्या :

अमेरिकेत 1 नोव्हेंबरपासून कोरोना लस वाटपासाठी तयारी करा, ट्रम्प सरकारचे राज्यांना सूचना

पुण्यात कोरोनाबाधितांच्या अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमींच्या संख्येत वाढ, माजी महापौरांच्या निधनानंतर प्रशासनाला जाग

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.