AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सहा महिन्याच्या बाळाला कोरोना, दूध पाजायचं कसं? मातेने पान्हा पाजला, दुधाच्या ताकदीने कोरोनाला हरवलं

जग धास्तावलंय. अशातच रत्नागिरीत 6 महिन्यांच्या चिमुकल्याला कोरोनातून बाहेर काढण्यासाठी सुरु असलेल्या बाळाची आईच्या संघर्षाला यश आलं आहे (Corona infected baby recovered in Ratnagiri).

सहा महिन्याच्या बाळाला कोरोना, दूध पाजायचं कसं? मातेने पान्हा पाजला, दुधाच्या ताकदीने कोरोनाला हरवलं
जाणून घ्या नवजात बाळाला मालिश कसे करावे !
Follow us
| Updated on: Apr 24, 2020 | 4:40 PM

रत्नागिरी : ‘आई’ हा एकच शब्द अनेकांच्या आय़ुष्यात ताकद देवून जातो.कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या काळातही हीच आई अनेक पातळ्यांवर लढताना दिसत आहे. रत्नागिरीत देखील असंच एक उदाहरण पाहायला मिळालं आहे. सध्या संपूर्ण जगात कोरोनाचा हाहाकार सुरु आहे, त्यामुळे जग धास्तावलंय. अशातच रत्नागिरीत 6 महिन्यांच्या चिमुकल्याला कोरोनातून बाहेर काढण्यासाठी सुरु असलेल्या बाळाची आईच्या संघर्षाला यश आलं आहे (Corona infected baby recovered in Ratnagiri).

रत्नागिरीतील या आईच्या 6 महिन्यांच्या चिमुकल्याला कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर कोरोनाच्या संसर्गाचा धोका असताना देखील त्या बाळाच्या आईने आपला जीव धोक्यात घालून बाळाला दुधाचा पान्हा पाजला. यासाठी या आईला बालरोगतज्ज्ञांचीही साथ होती. विशेष म्हणजे आईच्या याच दुधाने या चिमुरड्या बाळाला कोरोनाशी लढण्याची ताकद दिली. आता ते बाळ कोरोना संसर्गातून मुक्त झालं आहे.

जगभरात थैमान घातलेल्या कोरोनाचा विळख्या भारतातही घट्ट होतोना पहायला मिळतोय. कोरोनाच्या संसर्गापासून वृद्धांची आणि छोट्या बाळांचीही सुटका झालेली नाही. 14 एप्रिल रोजी रत्नागिरीमध्ये साखरतर या गावातील बाळाला कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. आरोग्य यंत्रणा आणि जिल्हा प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले. दरम्यान बाळाला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. त्याकरता वेगळा वॉर्ड तयार करण्यात आला आणि यामध्ये आई आणि बाळाला ठेवण्यात आलं. विशेष बाब म्हणजे बाळाच्या आईला मात्र कोरोनाची लागण झालेली नव्हती.

बाळावरच्या उपचारादरम्यान डॉक्टरांचे एक पथक त्याच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून होते. बाळाची आई देखील बाळासोबत त्याच वॉर्डमध्ये होती आणि बाळाला स्तनपान करत होती. सरकारनं दिलेल्या गाईडलाईननुसार हे उपचार सुरु होते. बाळाला दूध देताना आईदेखील काळजी घेत होती. त्याचे परिणाम देखील सकारात्मक दिसून आले आहेत. 10 दिवसांनंतर बाळाचा कोरोनाचा दुसरा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. यामध्ये कोरोनाला हरवण्यासाठी आईच्या दुधाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यासोबत या बाळाला उपचार करणाऱ्या बालरोग तज्ज्ञांचीही भूमिका महत्वाची होती.

आईच्या दुधामुळे बाळाला कोरोना विरोधात लढण्यासाठी शक्ती मिळाली. 6 महिन्यांच्या बाळाला आईचे दूध देखील तितकेच गरजेचे असते. त्यामुळे स्तनपान करताना आई काळजी घेत होती. याचवेळी बाळावर उपचार देखील सुरु होते. सुरुवातीच्या 2 ते 4 दिवसांमध्ये बाळाला ताप येणे किंवा इतर त्रास जाणवला. पण, त्यानंतर मात्र बाळाच्या प्रकृतीत कमालीची सुधारणा झाली. औषध उपचारादरम्यान आईच्या दूधाने बाळाला कोरोनाच्या लढाईत खरी ताकद दिली. बाळाच्या प्रकृतीत सध्या कमालीची सुधारणा होत आहे. पुढील 4 ते 6 दिवसांमध्ये बाळाचे आणखी रिपोर्ट करण्यात येतील. त्यानंतर बाळाला सोडण्यासंदर्भातला निर्णय होईल. आईच्या प्रेमाची ताकद कोरोनाला सुद्धा हरवू शकते यासाठी हे उदाहरण बोलकं ठरलं आहे.

संबंधित बातम्या :

नऊ महिने भरले, प्रसुती तोंडावर; कणकवलीच्या आशा सेविकेचे ‘कोरोना सर्व्हे’ला प्राधान्य

अमरावतीतील चार जण कोरोनामुक्त, डॉक्टर, परिचारिका यांच्याकडून टाळ्या वाजवत अभिनंदन

पुण्यात आझम कॅम्पसची प्रार्थनास्थळाची दुमजली इमारत क्वारंटाईनसाठी बहाल, नागरिकांच्या जेवणाचीही सोय

Corona : राज्यातील 60 जेलमधील तब्बल 4 हजार कैद्यांना सोडलं, 11 हजार कैद्यांना सोडण्याची तयारी

Corona infected baby recovered in Ratnagiri

532 भारतीय नागरिक मायदेशी परतले
532 भारतीय नागरिक मायदेशी परतले.
नवा व्हिडीओ, नवा प्रश्न... पहलगाममधील हल्ल्याचा आणखी एक व्हिडीओ समोर
नवा व्हिडीओ, नवा प्रश्न... पहलगाममधील हल्ल्याचा आणखी एक व्हिडीओ समोर.
पाकिस्तान हादरला... पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, सात जणांचा मृत्यू
पाकिस्तान हादरला... पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, सात जणांचा मृत्यू.
पाक क्रिकेटर आफ्रीदी ‘पहलगाम’वर बोलताना भुंकला, ओवैसी म्हणाले हा तर...
पाक क्रिकेटर आफ्रीदी ‘पहलगाम’वर बोलताना भुंकला, ओवैसी म्हणाले हा तर....
सॅल्यूट...बघा भारतीय सैन्याची ताकद, त्रिशक्ती कॉर्प्सकडून व्हिडीओ शेअर
सॅल्यूट...बघा भारतीय सैन्याची ताकद, त्रिशक्ती कॉर्प्सकडून व्हिडीओ शेअर.
कचाट्यात सापडणार तोच निसटले, ते दहशतवादी 4 वेळा वाचले; नेमकं काय घडलं?
कचाट्यात सापडणार तोच निसटले, ते दहशतवादी 4 वेळा वाचले; नेमकं काय घडलं?.
ट्रकनं कट मारला अन् एसटी थेट खड्ड्यात, चालकानं सांगितलं नेमकं काय घडलं
ट्रकनं कट मारला अन् एसटी थेट खड्ड्यात, चालकानं सांगितलं नेमकं काय घडलं.
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे केली मोठी मागणी
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे केली मोठी मागणी.
तहव्वुर राणाच्या रिमांडमध्ये 12 दिवसांची वाढ करण्याची मागणी
तहव्वुर राणाच्या रिमांडमध्ये 12 दिवसांची वाढ करण्याची मागणी.
भारताशी दगफटका...चीननंतर तुर्की पाकिस्तानच्या मदतीला, सढळ हस्ते....
भारताशी दगफटका...चीननंतर तुर्की पाकिस्तानच्या मदतीला, सढळ हस्ते.....