मंतरलेले लिंबू आणि कुंकू दिल्याने 20 जणांना कोरोना, लातूरमधील धक्कादायक घटना

| Updated on: Jul 07, 2020 | 9:39 PM

अंधश्रद्धाही कोरोनाचं कारण ठरु शकतं, याचा प्रत्यय लातूर येथील एका घटनेने आला आहे (Corona infection of 20 people in Latur due to superstition).

मंतरलेले लिंबू आणि कुंकू दिल्याने 20 जणांना कोरोना, लातूरमधील धक्कादायक घटना
Follow us on

लातूर : अंधश्रद्धाही कोरोनाचं कारण ठरु शकतं, याचा प्रत्यय लातूर येथील एका घटनेने आला आहे (Corona infection of 20 people in Latur due to superstition). लातूर जिल्ह्यातील सारोळा गावात ‘आराधी’ म्हणजेच देवीचं जागरण-गोंधळ करणाऱ्या व्यक्तीमुळे 20 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. या व्यक्तीने मंतरलेले लिंबू आणि कुंकू लोकांना खायला दिल्याने जवळपास 20 जणांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे (Corona infection of 20 people in Latur due to superstition).

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज! 

सारोळा गावात काही दिवसांपूर्वी गोंधळाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात आराधी व्यक्तीने उपस्थित लोकांना लिंबू आणि कुंकवावर फुंकर मारुन देवीचा प्रसाद म्हणून खायला दिला. काही दिवसांनी या व्यक्तींमध्ये कोरोनाची लक्षणे दिसून आली. या कार्यक्रमाचा आराधी सारोळा गावाचाच रहिवासी आहे.

कोरोनाची लक्षणे दिसून आल्याने सारोळा गावातील तीन कुटुंबांची कोरोना चाचणी करण्यात आली. यापैकी तब्बल 20 जणांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली असून तपास सुरु केला आहे.

सुरक्षित अंतर आणि कोरोनासंबंधी नियम पाळण्याच्या सूचना देऊनही ग्रामीण भागात असे अंधश्रद्धेचे कार्यक्रम सुरुच आहेत. त्यातूनच आराध्याने 20 जणांना कोरोनाचा प्रसाद दिला आहे. दरम्यान, सारोळा गावात पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने गावातला संबंधित भाग सील करण्यात आला आहे.

हेही वाचा : सहजा सहजी न पडणारं झाड पडलं, बँकेसमोर उभे असलेल्या एकाचा मृत्यू, दोघे जखमी