दिल्लीत आयटीबीपी जवानांभोवती कोरोनाचा विळखा, 45 जणांना कोरोनाचा संसर्ग, 167 जण क्वारंटाईन

दिल्लीत सुरक्षेच्या कामावर तैनात असणाऱ्या इंडो तिबेटन सीमा पोलिसांच्या (ITBP) 45 जवानांना कोरोनाची लागण झाली आहे (Corona infection to ITBP soldiers in Delhi).

दिल्लीत आयटीबीपी जवानांभोवती कोरोनाचा विळखा, 45 जणांना कोरोनाचा संसर्ग, 167 जण क्वारंटाईन
Follow us
| Updated on: May 05, 2020 | 4:45 PM

नवी दिल्ली : कोरोना विषाणूचा संसर्ग देशाच्या विविध सुरक्षा यंत्रणांमधील जवानांनाही बाधा पोहचवत आहे. दिल्लीत सुरक्षेच्या कामावर तैनात असणाऱ्या इंडो तिबेटन सीमा पोलिसांच्या (ITBP) 45 जवानांना कोरोनाची लागण झाली आहे (Corona infection to ITBP soldiers in Delhi). त्यामुळे इतरांच्या सुरक्षेसाठी कर्तव्य बजावत असणाऱ्या या जवानांच्या सुरक्षेचा प्रश्न उभा राहिला आहे. या संसर्गानंतर आरोग्य यंत्रणेने तात्काळ उपचार सुरु केले आहेत. संसर्ग झालेल्या जवानांच्या संपर्कातील इतर जवानांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे. दुसरीकडे महाराष्ट्रात देखील हिंगोली जिल्ह्यात राज्य राखीव पोलीस दलाच्या (SRPF) 14 जवानांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.

दिल्लीत संचारबंदी दरम्यान सुरक्षा व्यवस्थेसाठी तैनात आयटीबीपीच्या 45 जवानांना कोरोना संसर्गानंतर यंत्रणा सतर्क झाली आहे. सुरक्षेसाठी काम करणाऱ्यांनाच संसर्ग झाल्याने कोरोनाचं सावट वाढताना दिसत आहे. आयटीबीपीच्या 45 जवानांपैकी 41 जवानांना ग्रेटर नोयडामधील सीएपीएफ रेफरल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 2 जणांना सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यांच्या संपर्कातील इतर 76 जणांना दिल्लीतील आयटीबीपीच्या चावला येथील छावणीत क्वारंटाईन करण्यात आले आहे.

दिल्लीतील रोहिणी परिसरात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी तैनात आयटीबीपीच्या 2 कोरोनाबाधित जवानांना हरियाणातील झज्जर येथील एम्स रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांच्या संपर्कातील 91 जणांना चावला येथे क्वारंटाईन करण्यात आले आहे. क्वारंटाईन केलेल्या सर्व जवानांचे नमुने कोरोना चाचणीसाठी पाठवण्यात आले आहेत. त्याचे अहवाल आल्यानंतरच या संसर्गाची व्याप्ती स्पष्ट होणार आहे.

दरम्यान, हिंगोलीत आणखी 14 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने आरोग्य यंत्रणांची काळजी वाढली आहे. हे कोरोना बाधित एसआरपीएफ जवान असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने तैनात जवानांच्या आरोग्याचा प्रश्नही तयार झाला आहे. हिंगोलीतील कोरोना बाधितांची संख्या सध्या 90 वर पोहचली आहे. यापैकी 83 रुग्ण एसआरपीएफचे जवान आहेत. यातील एकाला उपचारानंतर बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहे. सध्या 89 कोरोना अॅक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

संबंधित बातम्या :

मुंबईत IPS अधिकाऱ्याला कोरोनाची लागण, ड्रायव्हरमुळे संसर्ग

Pune corona Update | पुण्यात दुपारपर्यंत आणखी तिघांचा मृत्यू, पिंपरीत 2 लहान मुलांसह 9 नवे कोरोना रुग्ण

अकोल्यात एकाच दिवसात कोरोनाचे 11 नवे रुग्ण, बाधितांची संख्या 75 वर

Corona Live Update : पुण्यात 19 तासात कोरोने तिघांचा मृत्यू

Corona infection to ITBP soldiers in Delhi

Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर.
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने....
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने.....
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.