कुख्यात डॉन संतोष आंबेकरलाही कोरोना संसर्ग, नागपुरातील एकूण रुग्ण संख्या 2774

नागपूर मध्यवर्ती कारागृहात असलेला कुख्यात डॉन संतोष आंबेकर यालाही कोरोनाचा संसर्ग झाला आहे (Corona infection to Nagpur Don Santosh Ambekar).

कुख्यात डॉन संतोष आंबेकरलाही कोरोना संसर्ग, नागपुरातील एकूण रुग्ण संख्या 2774
Follow us
| Updated on: Jul 18, 2020 | 8:04 AM

नागपूर : राज्याची उपराजधानी नागपूरभोवती कोरोनाचा विळखा वाढताना दिसत आहे. आता नागपूर मध्यवर्ती कारागृहात असलेला कुख्यात डॉन संतोष आंबेकर यालाही कोरोनाचा संसर्ग झाला आहे (Corona infection to Nagpur Don Santosh Ambekar). संसर्गानंतर सुरुवातीला काही दिवस त्याच्यावर कारागृहातील रुग्णालयातच उपचार करण्यात आले. सध्या त्याच्यावर मेयोमधील कोविड रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मेयो परिसरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

नागपूर मध्यवर्ती कारागृहात आतापर्यंत 219 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यात कारागृहातील अधिकारी, कर्मचारी आणि कैद्यांचाही समावेश आहे. नागपुरात काल (17 जुलै) एकाच दिवशी 5 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यासह नागपूर जिल्ह्यातील कोरोना बळींची संख्या 45 वर पोहचली आहे. गेल्या 24 तासांमध्ये नागपुरात तब्बल 125 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. आता नागपूर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 2774 वर पोहचली आहे.

MahaFast News 100 | शंभर बातम्यांचा बुलेटच्या वेगाने आढावा, पाहा महाफास्ट न्यूज 100 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!

नागपुरातील कोविड रुग्णालयातून काल दिवसभरात 79 रुग्णांना उपचारानंतर बरे झाल्याने डिस्चार्ज देण्यात आला. नागपुरात आतापर्यंत 1733 रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत.

राज्यात दोन दिवसात 16,922 नवे कोरोना रुग्ण, बाधितांचा आकडा 3 लाखांच्या दिशेला

राज्यात शुक्रवारी (17 जुलै) दिवसभरात कोरोनाचे तब्बल 8 हजार 308 नवे रुग्ण आढळले आहेत (Maharashtra Corona Update). त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 2 लाख 92 हजार 589 वर पोहोचला आहे. विशेष म्हणजे गुरुवारी (16 जुलै) दिवसभरात राज्यात सर्वाधिक 8 हजार 614 नव्या रुग्णांची नोंद झाली होती. त्यामुळे दोन दिवसात 16 हजार 922 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत (Maharashtra Corona Update).

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

दिवसभरात 258 रुग्णांचा मृत्यू

राज्यात आज दिवसभरात 258 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यामध्ये फक्त मुंबईतील 62 रुग्णांचा समावेश आहे. राज्यातील मृत्यूदर हा 3.91 टक्के एवढा आहे. राज्यात आतापर्यंत 11 हजार 452 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

दिवसभरात 2 हजार 217 रुग्णांनी कोरोनावर मात

राज्यात शुक्रवारी दिवसभरात 2 हजार 217 रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. राज्यात आतापर्यंत 1 लाख 60 हजार 357 रुग्ण बरे झाले आहेत. तर 1 लाख 20 हजार 480 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 54.81 टक्क्यांवर पोहोचलं आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

हेही वाचा :

Maharashtra Corona Update | राज्यात दोन दिवसात 16,922 नवे कोरोना रुग्ण, बाधितांचा आकडा 3 लाखांच्या दिशेला

Aishwarya Rai Corona | ऐश्वर्या आणि आराध्याही नानावटी रुग्णालयात दाखल

Kolhapur Lockdown | ठाणे, पुणे, सोलापूरनंतर कोल्हापुरात सोमवारपासून सात दिवसांचा लॉकडाऊन, पालकमंत्री सतेज पाटलांची घोषणा

Corona infection to Nagpur Don Santosh Ambekar

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.