अहमदनगरमध्ये एकावर एक रचलेले 12 कोरोना रुग्णांचे मृतदेह, शिवसेना नगरसेवकाकडून व्हिडीओ जारी

अहमदनगरमध्ये एकाच रुग्णवाहिकेत 12 कोरोना रुग्णांचे मृतदेह अस्ताव्यस्तपणे रचल्याचं समोर आलं आहे (Corona Patient dead body handling in Ahmednagar).

अहमदनगरमध्ये एकावर एक रचलेले 12 कोरोना रुग्णांचे मृतदेह, शिवसेना नगरसेवकाकडून व्हिडीओ जारी
Follow us
| Updated on: Aug 10, 2020 | 6:18 PM

अहमदनगर : राज्यभरात कोरोना रुग्णांच्या उपचारावर भर दिला जात असताना अहमदनगरमध्ये मात्र, कोरोना रुग्णांचे मृतदेह हाताळताना आरोग्य विभागाकडून अक्षम्य दर्लक्ष झाल्याचं पाहायला मिळालं. पालिकेच्या एकाच रुग्णवाहिकेत 12 कोरोना रुग्णांचे मृतदेह अस्ताव्यस्तपणे रचल्याचं समोर आलं आहे (Corona Patient dead body handling in Ahmednagar). शिवसेनेचे नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी या प्रकाराचा भांडाफोड केला आहे. तसेच प्रशासनावर अत्यंत असंवेदनशीलपणाचा आरोप करत आंदोलनाचा इशारा दिला. शिवसेनेचे नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी या प्रकाराचा एक व्हिडीओ देखील जारी केला आहे.

अहमदनगरमध्ये आज (10 ऑगस्ट) दिवसभरात एकूण 12 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. यात 4 महिला आणि 8 पुरुषांचा समावेश आहे. यानंतर पालिका प्रशासनाकडून या 12 मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी होती. मात्र, पालिका प्रशासनाने अत्यंत बेजबाबदारपणे सर्व 12 मृतदेह एकावर एक रचत एकाच रुग्णवाहिकेत टाकले. अमरधाम येथे गेल्यावरही हे मृतदेह अस्ताव्यस्त टाकून देण्यात आले होते, असा गंभीर आरोप नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी केला आहे.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

बाळासाहेब बोराटे यांनी प्रशासनाच्या या बेजबाबदारपणाचा भांडाफोड करणारा एक व्हिडीओ देखील शेअर केलाय. तसेच कोरोना रुग्णांची मृत्यूनंतरही अवहेलना होत असल्याचा आरोप केला. त्यांनी शेअर केलेल्या व्हिडीओत रुग्णवाहिकेत एकावर एक अस्ताव्यस्त रचून ठेवलेले 12 रुग्णांचे मृतदेह दिसत आहेत. ही घटना मानवतेला काळीमा फासणारी असल्याचं मत बोराटे यांनी व्यक्त केलंय. त्यांनी या प्रकरणी जन आक्रोश आंदोलन करणार असल्याचाही इशारा दिला.

MahaFast News 100 | शंभर बातम्यांचा बुलेटच्या वेगाने आढावा, पाहा महाफास्ट न्यूज 100 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!

बाळासाहेब बोराटे यांनी आयुक्तांना दिलेल्या आपल्या पत्रात मृतदेहांसोबतच कोरोना रुग्णांच्या अवहेलनेचाही आरोप केला आहे. ते म्हणाले, “प्रशासनाला माणसांची किंमत राहिलेली नाही. अशाप्रकारे कोरोना रुग्णांचे मृतदेह अस्ताव्यस्त टाकणे ही मानवतेला काळिमा फासणारी घटना आहे. प्रशासकीय पातळीवर ज्याप्रकारे योजना होणे अपेक्षित आहे तशा उपाययोजना झालेल्या कोठेही दिसत नाही.”

“यातून प्रशासनाचा भोंगळ कारभार दिसून येतो आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांवरही योग्य उपचार होत आहेत की नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे. दोन दिवसांमध्ये या सर्व व्यवस्थांमध्ये सुधारणा झाली नाही, तर वरिष्ठ पातळीवर तक्रार केली जाईल. तसेच नगर शिवसेनेकडून जन आक्रोश आंदोलन केले जाईल,” असा इशारा बोराटे यांनी दिली.

हेही वाचा :

सुशांतच्या आत्महत्येइतकी चर्चा सर्वसामान्यांच्या प्रश्नावर व्हावी, ते सुटतील तरी : राजू शेट्टी

कोरोनावर लक्ष देणं महत्त्वाचे, कठीण परिस्थितीत घाणेरडं राजकारण करणं योग्य नाही : जितेंद्र आव्हाड

Electricity Bill | घराचं वीज बिल 40 हजार, MSEB च्या फेऱ्या मारुनही कपात नाही, जाळून घेत आत्महत्या

Corona Patient dead body handling in Ahmednagar

कराडवर मकोका लावण्यासाठी अल्टिमेटम, मस्साजोगमध्ये नेमकं काय-काय घडलं?
कराडवर मकोका लावण्यासाठी अल्टिमेटम, मस्साजोगमध्ये नेमकं काय-काय घडलं?.
'संजय राऊतांना लवकर उपरती आली', एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
'संजय राऊतांना लवकर उपरती आली', एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल.
'..तर तुझ्या घरालाच टाळं ठोकू', राणेंनी ठाकरे गटाच्या नेत्याला भरला दम
'..तर तुझ्या घरालाच टाळं ठोकू', राणेंनी ठाकरे गटाच्या नेत्याला भरला दम.
'भिकार साले...', लक्ष्मण हाकेंच्या धमकीवर जरांगे नेमकं काय म्हणाले?
'भिकार साले...', लक्ष्मण हाकेंच्या धमकीवर जरांगे नेमकं काय म्हणाले?.
'तेव्हापासूनच संतोष देशमुख अस्वस्थ अन् भिती...', पत्नीच्या प्रतिक्रिया
'तेव्हापासूनच संतोष देशमुख अस्वस्थ अन् भिती...', पत्नीच्या प्रतिक्रिया.
जरांगेंकडून लक्ष्मण हाकेंना धमकी, थेट व्हिडीओ शेअर करत म्हणाले...
जरांगेंकडून लक्ष्मण हाकेंना धमकी, थेट व्हिडीओ शेअर करत म्हणाले....
बायको सोबत होती म्हणून वाचला जीव, नाहीतर...., वसईत नेमकं काय घडलं?
बायको सोबत होती म्हणून वाचला जीव, नाहीतर...., वसईत नेमकं काय घडलं?.
धनंजय देशमुखांचे आंदोलन मागे, अखेर 4 तासांनंतर टाकीवरून उतरले खाली
धनंजय देशमुखांचे आंदोलन मागे, अखेर 4 तासांनंतर टाकीवरून उतरले खाली.
'प्लीज खाली या..', जरांगेंनंतर SP कॉवत यांच्याकडून देशमुखांना विनवण्या
'प्लीज खाली या..', जरांगेंनंतर SP कॉवत यांच्याकडून देशमुखांना विनवण्या.
'...तर यांचं जीनं मुश्किल करेन', जरांगेंचा धनंजय देशमुखांना थेट फोन
'...तर यांचं जीनं मुश्किल करेन', जरांगेंचा धनंजय देशमुखांना थेट फोन.