देशातली पहिली कोरोना लस ‘कोव्हॅक्सिन’ची तिसऱ्या टप्प्यात चाचणी सुरू, 26 हजार स्वयंसेवकांचा समावेश

फेज-3 चाचणीमध्ये संपूर्ण भारतातील 26,000 स्वयंसेवकांचा समावेश असणार आहे.

देशातली पहिली कोरोना लस 'कोव्हॅक्सिन'ची तिसऱ्या टप्प्यात चाचणी सुरू, 26 हजार स्वयंसेवकांचा समावेश
Follow us
| Updated on: Nov 17, 2020 | 8:16 AM

नवी दिल्ली : कोरोनाच्या जीवघेण्या संसर्गावर मात करण्यासाठी सगळेच देश लस निर्मितीच्या कामात गुंतले आहेत. अशात लस (Vaccine) उत्पादक कंपनी भारत बायोटेकने (Bharat Biotech) सोमवारी कोव्हिड – 19 संसर्गावर मात करणाऱ्या भारतातील पहिल्या देशी लसीची म्हणजेच ‘कोव्हॅक्सिन’ची (covaxin) तिसऱ्या टप्प्यात चाचणी सुरू केली असल्याची घोषणा केली. फेज-3 चाचणीमध्ये संपूर्ण भारतातील 26,000 स्वयंसेवकांचा समावेश असणार आहे. याचं संचालन हे भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) च्या संयुक्त विद्यमानं सुरू आहे. (corona vaccine bharat biotech announced start third phase of covaxin)

हैदराबादमध्ये स्थित कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार, लससाठी हा भारताचा पहिला फेज-3 कार्यक्षमता अभ्यास असून आतापर्यंतचा सर्वात मोठा फेज-3 किती प्रभावी आहे याचं परीक्षण यामध्ये होणार आहे. चाचणीत सहभागी झालेल्या स्वयंसेवकांना 28 दिवसात दोन इंट्रामस्क्युलर इंजेक्शन दिले जाणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. सहभागींना कोवाक्सिन किंवा प्लेसबो दिलं जाईल. ही चाचणी दुहेरी अंध असणार आहे. म्हणजेच अन्वेषक, सहभागी आणि कंपनीला कोणत्या ग्रुपची लस दिली गेली आहे हे कळणार नाही.

भारतातील 22 संस्थांमध्ये होणार चाचणी भारतातील 22 संस्थांमध्ये ही चाचणी घेण्यात येणार असून यामध्ये अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) आणि नवी दिल्लीतील गुरु तेग बहादूर रुग्णालयाचाही समावेश असणार आहे. याशिवाय अलिगड मुस्लिम विद्यापीठ, अनुदान शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर जे.जे. ग्रुप ऑफ हॉस्पिटल, लोकमान्य टिळक महानगरपालिका जनरल हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज (सायन हॉस्पिटल) यांचा यात समावेश आहे. भारत बायोटेक कोवाक्सिन आयसीएमआर-नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (एनआयव्ही) सोबत भागीदारीत विकसित केली गेली आहे.

दरम्यान, पुण्यातल्या कोव्हीशिल्ड (Covishield) लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांची नोंदणी पूर्ण झाली असून भारतात डिसेंबरपर्यंत सिरम इन्स्टिट्यूट कोरोना लसीचे 10 कोटी डोस पुरवणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. जर असं झालं तर कोरोनाचा संसर्ग संपवण्यात भारताला मोठं यश येईल.

सिरम आणि भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेतर्फे (आयसीएमआर) देशातील 15 केंद्रांवर कोव्हीशिल्ड लसीच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. महत्त्वाचं म्हणजे या चाचण्या समाधानकारक असल्याची माहितीही सिरम आणि आयसीएमआरकडून व्यक्त करण्यात आली आहे. या चाचण्यांचे निकाल चांगले आले असून आता लस रुग्णांच्या वापरासाठी तयार असल्याचंही बोललं जात आहे. त्यामुळे डिसेंबर महिन्यापर्यंत लस मिळण्याची शक्यता आहे.

(corona vaccine bharat biotech announced start third phase of covaxin)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.