कोरोनाची लस स्वस्त होणार? केंद्राने सिरम, भारत बायोटेकला दिले हे निर्देश

सिरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेकला कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन लसीचे जाहीर केलेले वाढीव दर कमी करावे लागणार आहेत. दोन्ही कंपन्यांना नागरिकांसाठी पडवडणाऱ्या आणि स्वस्त दराने लस उपलब्ध करावी लागणार आहे. (Corona vaccine will be the cheaper, The instructions given by the Center to Serum, Bharat Biotech)

कोरोनाची लस स्वस्त होणार? केंद्राने सिरम, भारत बायोटेकला दिले हे निर्देश
कोविशिल्ड कोवॅक्सिन
Follow us
| Updated on: Apr 26, 2021 | 10:20 PM

नवी दिल्ली : देशभरात 1 मेपासून 18 वर्षांवरील सर्वांना कोरोना लसीकरण खुले केले जाणार आहे. मात्र कोविड प्रतिबंधक लसीच्या संभाव्य दरवाढीमुळे नागरिकांची चिंता वाढली होती. महामारीत लसीसाठी एवढे पैसे आणायचे कोठून, असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला होता. याचदरम्यान केंद्र सरकारने सिरम इन्स्टि्टयुट आणि भारत बायोटेक या लस उत्पादक कंपन्यांना लसीचे दर कमी करण्याबाबत विचार करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार सिरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेकला कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन लसीचे जाहीर केलेले वाढीव दर कमी करावे लागणार आहेत. दोन्ही कंपन्यांना नागरिकांसाठी पडवडणाऱ्या आणि स्वस्त दराने लस उपलब्ध करावी लागणार आहे. (Corona vaccine will be the cheaper, The instructions given by the Center to Serum, Bharat Biotech)

देशाच्या तळागाळात मोहिम पोहचवण्याचे उद्दिष्ट्य

देशात कोरोनाचा संसर्ग वाढतोच आहे. गेल्या काही दिवसांपासून 3 लाखांच्या वर कोरोना रुग्ण वाढताहेत. ही चिंताजनक रुग्णवाढ रोखण्यासाठी केंद्र सरकारने कोरोना लसीकरणाला अधिकाधिक गती देण्याचा निर्धार केला आहे. ही मोहिम देशाच्या तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे उद्दीष्ट सरकारने डोळ्यासमोर ठेवले आहे. याचवेळी अधिकाधिक नागरिकांनी लसीचा लाभ घ्यावा या हेतूने सरकारने लस उत्पादक कंपन्यांना लसीसाठी जास्त किंमत न आकारण्याचे निर्देश दिले आहेत.

खुल्या बाजारात लसविक्रीला मुभा दिल्यानंतर जाहीर केले नवे दर

केंद्र सरकारने लसीकरणाला गती देण्यासाठीच सिरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेकला 50 टक्के लस राज्यांना आणि खुल्या बाजारात विकण्यास मुभा दिली. सरकारकडून ही परवानगी मिळताच दोन्ही लस उत्पादक कंपन्यांनी कोविड प्रतिबंधक लसीचे नवे दर जाहीर केले. दोन्ही कंपन्यांनी जवळपास दुप्पटीने दर वाढले. त्यावर देशभरातून चौफेर टीका झाली. केंद्र सरकारला कॉंग्रेससह सर्वच विरोधी पक्षांनी कोंडीत पकडले. एकीकडे सरकार वन नेशन, वन रेशनचा दावा करतेय, मग एका लसीसाठी तीन-तीन किंमती कशा काय, असा सवाल विरोधकांनी केंद्र सरकारला केला होता. विरोधकांकडून झालेल्या टीकेनंतर केंद्र सरकारने आपल्या भूमिकेत नरमाई घेत लस उत्पादक कंपन्यांना कोविड प्रतिबंधक लसीचे नवे दर कमी करण्याचे निर्देश दिले आहेत. केंद्र सरकाच्या मंत्रीमंडळाचे सचिव राजीव गौबा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन लसीचे नवीन दर निश्चित करण्यात आले होते. त्यामुळेच केंद्र सरकारला देशभरातून रोषाचा सामना करावा लागला. (Corona vaccine will be the cheaper, The instructions given by the Center to Serum, Bharat Biotech)

इतर बातम्या

लॉकडाऊन इफेक्ट, पुण्यात सलग आठव्या दिवशी नव्या रुग्णसंख्येत घट

टोपे म्हणतात, सुजय विखेंचं एका दृष्टीनं योग्य मग फडणवीस, दरेकरांचं काय चुकलं?

सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.