जीवघेणा कोरोना वायरस भारतात दाखल, देशातील पहिला रुग्ण केरळमध्ये

चीनमध्ये धुमाकूळ घातलेल्या कोरोना वायरसने आता भारतात प्रवेश केला आहे.

जीवघेणा कोरोना वायरस भारतात दाखल, देशातील पहिला रुग्ण केरळमध्ये
Follow us
| Updated on: Jan 30, 2020 | 5:21 PM

तिरुवनंतपुरम : चीनमध्ये धुमाकूळ घातलेल्या कोरोना वायरसने आता भारतात प्रवेश केला आहे. केरळमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे (Corona Virus first case found in India). या माहितीला प्रशासनाकडून अधिकृतपणे दुजोरा देण्यात आला आहे. केरळमध्ये कोरोना वायरसने संक्रमित झालेला देशातील पहिला रुग्ण हा चीनच्या वुहान विद्यापीठाचा विद्यार्थी आहे. सध्या त्याची प्रकृती स्थिर असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. त्याला देखरेखेखाली ठेवण्यात आलं आहे.

कोरोना वायरसच्या संशयावरुन देशातील काही राज्यातील शेकडो रुग्णांना देखरेखीखाली ठेवण्यात आलं आहे. केरळमध्ये तर 806 संशियत रुग्णांना देखरेखीखाली ठेवण्यात आलं आहे (Corona Virus first case found in India).

दरम्यान, देशाच्या एअर इंडिया आणि इंडिगो या दोन विमान कंपन्यांनी कोरोना वायरस धुमाकूळ घालत असलेल्या देशांमध्ये जाणाऱ्या अनेक फेऱ्या रद्द केल्या आहेत.

कोरोनामुळे आतापर्यंत 170 जणांचा मृत्यू

चीनमध्ये कोरोना वायरसने आतापर्यंत 170 लोकांचा जीव घेतला आहे. याशिवाय 7000 नागरिक या कोरोना वायरसने बाधित आहेत. चीन सरकारने दिलेल्या माहितीनुसार, चीनच्या हुबई प्रांतात 37 जणांचा कोराना वायरसमुळे मृत्यू झाला आहे.

कोरोना विषाणूची लक्षणं

नाक गळणं, खोकला, घसा खवखवणे, डोके दुखी आणि ताप ही कोरोना विषाणूची लक्षण आहेत. कमकुवत रोगप्रतिकारशक्ती असलेल्या लोकांना या विषाणूची लागण लवकर होते. वयस्कर आणि लहान मुलांना या विषाणूची लागण सहज होते. निमोनिया, फुफ्फुसांमध्ये सूज, शिंका येणे, दमा इत्यादीही या विषाणूची लक्षणं असू शकतात.

विषाणूपासून बचावाचे उपाय

जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी, कमी करण्यासाठी काही खबरदारी घेण्यास सांगितले आहे. संयुक्त राष्ट्राने ट्वीट करत यापासून बचावाचे उपाय सांगितले आहेत.

1. हात साबणाने स्वच्छ धुवावे. 2. खोकताना किंवा शिंकताना नाकावर आणि तोडांवर रुमाल ठेवावा. 3. ज्यांना सर्दी किंवा तापाची लक्षणं असतील त्यांनी गर्दीत जाणे टाळावं. 4. मांस आणि अंडी नीट शिजवून घ्यावी. 5. जंगल किंवा शेतात काम करणारे, राहणाऱ्यांनी जनावरांपासून सुरक्षित अंतर ठेवावे.

कोरोना विषाणूवर उपचार

कोरोना विषाणूचा अद्याप कुठलाही उपचार किंवा निदान सापडलेलं नाही. कोरोना विषाणूवर अद्याप कुठलीही वॅक्सीन उपलब्ध नाही. यापासून बचावाचा एकच उपाय आहे आणि तो म्हणजे काळजी घेणे. कुठल्याही आजारी व्यक्ती, सर्दी, निमोनियाग्रस्त व्यक्तीच्या संपर्कात येणे टाळा. मास्क घाला. डोळे, नाक आणि तोडांला स्पर्श करणे टाळा. नेहमी हात स्वच्छ धुवा.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.