नवी दिल्ली : कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून या जीवघेण्या संसर्गाला रोखण्यासाठी संपूर्ण जग प्रयत्न करत आहे. कोरोनाची लस बनवण्यासाठी प्रत्येक देश आपल्या पद्धतीने काम करत आहेत. यातच एक आनंदाची बातमी समोर येत आहे. अमेरिकेची कंपनी मॉडर्ना इंकचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्टीफन बँसेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, जर नोव्हेंबरमध्ये लसीच्या तिसऱ्या चाचणीमध्ये सकारात्मक परिणाम पुढे आले तर अमेरिकी सरकार डिसेंबरमध्ये याच्या वापरासाठी मंजूरी देण्याची शक्यता आहे. (Coronavirus Vaccine News covid19 vaccine moderna inc can approved in december)
मंगळवारी बँसेल यांनी माध्यमांशी बोलताना ही प्रतिक्रिया दिली आहे. तिसऱ्या टप्प्यामध्ये जर कोरोनाची मानवी चाचणी यशस्वी झाली तर तात्काळ डिसेंबरमध्ये लस सगळ्यांसाठी उपलब्ध असणार आहे. मॉडर्नाने जुलै महिन्यात 30000 स्वयंसेवकावर लसीचं परिक्षण सुरू केलं होतं. चाचणी दरम्यान, 50 टक्के स्वयंसेवकांना लस डोस आणि उर्वरित स्वयंसेवकांना प्लेसबो देण्यात आला होता. या चाचणीचे सगळे अहवाल आणि माहिती नोव्हेंबरपर्यंत येईल असंही बँसेल यांनी सांगितलं.
खरंतर, चाचणी केल्यानंतर त्याचा अखेरचा रिपोर्ट तयार होण्यासाठी संपूर्ण परीक्षण करावं लागतं. यावेळी लस दिल्यानंतर कोणामध्ये काय बदल झाला, याची नोंद आणि परीक्षण करणं महत्त्वाचं असतं. लसीच्या पहिल्या टप्प्यातील चाचणीमध्ये 53 लोकांना लस दिल्यानंतर त्यांचा धोका कमी झाल्याचं समोर आलं आहे.
…तरच कोरोनाचं संकट टळेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितला ‘उपाय’
जर अंतिम टप्प्यामध्ये कोरोनाच्या लसीचा असाच प्रभाव दिसला तर ही मोठी आनंदाची बाब असणार आहे. यानंतर मॉडर्ना तात्काळ याच्या मंजूरीसाठी सरकारकडे निवेदन करणार असल्याचं बँसेल यांनी सांगितलं आहे.
(Coronavirus Vaccine News covid19 vaccine moderna inc can approved in december)