‘तब्लिगी’च्या कार्यक्रमामुळे देशात ‘कोरोना’संसर्गाचा वेग दुप्पट, आरोग्य मंत्रालयाची माहिती

भारतात सात दिवसांऐवजी चार दिवसातच कोरोनाचे रुग्ण दुप्पट होऊ लागल्याने 'तब्लिगी कनेक्शन' स्पष्ट होत आहे. (COVID-19 cases doubling Tablighi Jamaat program)

'तब्लिगी'च्या कार्यक्रमामुळे देशात 'कोरोना'संसर्गाचा वेग दुप्पट, आरोग्य मंत्रालयाची माहिती
Follow us
| Updated on: Apr 05, 2020 | 5:17 PM

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील निजामुद्दीनमध्ये आयोजित ‘तब्लिगी जमाती’च्या कार्यक्रमामुळे ‘कोरोना’संसर्गाचा वेग दुप्पट झाला, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. देशात आतापर्यंत कोरोनाबाधितांचा आकडा 3 हजार 374 वर गेला आहे. (COVID-19 cases doubling Tablighi Jamaat program)

भारतातील कोरोना फैलावाचा वेग वाढण्यास तब्लिगी जमातीचा कार्यक्रम जबाबदार असल्याचं आकडेवारीमुळे सिद्ध होत आहे. सात दिवसांऐवजी चार दिवसातच रुग्ण दुप्पट होऊ लागल्याने ‘तब्लिगी कनेक्शन’ स्पष्ट होत आहे.

केंद्रीय आरोग्य सहसचिव लव अग्रवाल यांच्या माहितीनुसार, दिल्लीतील ‘तब्लिगी जमाती’च्या कार्यक्रमामुळे कोरोना व्हायरसच्या केसेस वाढल्या आहेत. कोरोनाचे रुग्ण दुप्पट होण्याचा सध्याचा काळ 4.1 दिवस इतका आहे, मात्र तब्लिगीचा कार्यक्रम नसता तर 7.4 दिवस इतका कालावधी अपेक्षित होता.

(COVID-19 cases doubling Tablighi Jamaat program)

गेल्या चोवीस तासात ‘कोरोना’चे 472 नवे रुग्ण आढळले असून या कालावधीत 11 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये पुण्यातील तिघांसह महाराष्ट्रातील चौघांचा समावेश आहे. भारतात आतापर्यंत 79 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे. तर 267 कोरोनाबाधित उपचारानंतर ठणठणीत बरे झाले आहेत.

हेही वाचा : सोनिया गांधी, प्रतिभा पाटील ते ममता बॅनर्जी, स्टॅलिन… ‘कोरोना’लढ्यासाठी पंतप्रधानांची दिग्गजांना फोनाफोनी

13.6 लाख कामगारांना त्यांचे मालक किंवा उद्योगामार्फत निवारा आणि भोजन दिले जाते, अशी माहिती गृह मंत्रालयाच्या सहसचिव पुण्य सलीला श्रीवास्तव यांनी दिली.

सरकारकडून 23,924, तर 3,737 स्वयंसेवी संस्थांकडून अशी भारतभरातील सर्व राज्यांमध्ये 27,661 मदत शिबिरे आणि निवारे स्थापित करण्यात आले आहेत . 12.5 लाख नागरिक त्यांच्यामध्ये आश्रय घेत आहेत. अशाचप्रकारे  सरकार आणि एनजीओंकडून 19,460 अन्नछत्रांची सोय करण्यात आली आहे.

(COVID-19 cases doubling Tablighi Jamaat program)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.