Women’s World Cup | महिला विश्वचषकात टीम इंडियानं इतिहास रचला, स्मृती-हरमनप्रीत कौरची धमाल

महिला विश्वचषक स्पर्धेत आज भारतीय संघ आणि वेस्ट इंडिज आमनेसामने आहेत. टीम इंडियाची कर्णधार मिताली राजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. टीम इंडियानं 313 धावांवर आपली सातवी विकेट गमावली आहे. विश्वचष्कात टीम इंडियाची धमाल सुरू असून स्मृतीनंतर हरमनप्रीत कौरची सेंच्युरी झाली आहे.

Women’s World Cup | महिला विश्वचषकात टीम इंडियानं इतिहास रचला, स्मृती-हरमनप्रीत कौरची धमाल
विश्वचष्कात टीम इंडियाची धमाल, स्मृतीनंतर हरमनप्रीत कौरची सेंच्युरीImage Credit source: TWITTER
Follow us
| Updated on: Mar 12, 2022 | 11:27 AM

महिला विश्वचषकात (Women’s World Cup) टीम इंडियाने इतिहासरचला आहे. वेस्ट इंडिज (IND vs WI) विरुद्धच्या सामन्यात भारतानं दोन शतके झळकावली आहेत. या सामन्यात स्मृती मंधनाशिवाय हरमनप्रीत कौरनेही (Harmanprit Kaur) शतक झळकावले आहे. विश्वचषकापूर्वी दोघांच्या फॉर्मवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. मात्र, आता सर्वात मोठे आव्हान असताना संघातील वरिष्ठ खेळाडूंनी हा धमाका केला आहे. या सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. या निर्णयाला योग्य ठरवत मंधना आणि यास्तिका भाटिया यांनी सलामीला खेळायला येत संघाला चांगली सुरुवात दिली. या दोघींनी 49 धावांची भागीदारी रचली. पण भाटिया आक्रमक 31 धावांची खेळी करून बाद झाली. त्यानंतर भारतानं कर्णधार मिताली राज आणि दिप्ती शर्मा यांच्या विकेट्स स्वस्तात गमावल्या.

स्मृती-हरमनप्रीत जोडीची धमाल

मंधना आणि उपकर्णधार हरमनप्रीत कौर यांची जोडी जमली. या दोघींनीही चौथ्या विकेटसाठी 184 धावांची दिडशतकी भागीदारी केली आहे. या भागीदारीत मंधनानं 40व्या षटकात हेली मॅथ्यूजविरुद्ध चौकार ठोकत शतकाला गवसणी घातली. तिनं 108 चेंडूत तिचे शतक पूर्ण केले. शतक पूर्ण केल्यानंतर आक्रमक पवित्रा तिनं स्विकारला होता. 43 व्या षटकात तिला शामेलिया कॉनेलनं बाद केलं. मंधनानं 119 चेंडूमध्ये 123 धावांची खेळी करताना 13 चौकार आणि २ षटकार मारले आहे. हे तिचे विश्वचषकातील दुसरे शतक आहे.

इतर बातम्या

IND vs SL, 2nd Test, LIVE Streaming: जाणून घ्या कधी, कुठे पाहता येईल डे-नाईट कसोटी सामना?

CCTV Video: पुण्यात पोलीसांच्या नाकावर टिच्चून गुंडागर्दी, वाहनांची पुन्हा तोडफोड, सीसीटीव्हीत घटना कैद

नाल्यात पोहताना दोन विद्यार्थ्यांचा बुडाले, मित्र पळून गेले, रात्री मृतदेह सापडले

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.