एमपीएससी परीक्षेची तारीख लवकरच जाहीर करणार; राज्य सरकारकडून प्रकाश शेंडगेंना आश्वासन

येत्या दोन-तीन दिवसांत एमपीएससी (MPSC) परीक्षांची तारीख जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती ओबीसी नेत प्रकाश शेंडगे यांनी दिली आहे.

एमपीएससी परीक्षेची तारीख लवकरच जाहीर करणार; राज्य सरकारकडून प्रकाश शेंडगेंना आश्वासन
Follow us
| Updated on: Nov 23, 2020 | 8:19 PM

मुंबई : एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थांना लवकरच दिलासा मिळण्याची शक्यता आहे. येत्या दोन-तीन दिवसांत एमपीएससी (MPSC) परीक्षांची तारीख जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती ओबीसी नेत प्रकाश शेंडगे (Prakash Shendge) यांनी दिली आहे. या विषयी ओबीसी शिष्टमंडळाची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याशी चर्चा झाली. या चर्चेनंतर लवकरच परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या जातील, असे आश्वासन ठाकरे यांनी दिल्याचा दावा प्रकाश शेंडगे यांनी केला. ते माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते. (date of MPSC exams will be announced in next two-three days said Prakash Shendge)

“मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर एमपीएससीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. या विषयावर आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यांच्याशी या विषयी चर्चा केली. येत्या दोन ते तीन दिवसांत एमपीएससीच्या परीक्षांची तारीख (date of MPSC exams) जाहीर होईल,” अशी माहिती प्रकाश शेंडगे यांनी दिली. तसेच, ओबीसी विद्यार्थ्यांनी तणावाखाली राहू असे मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याचेही शेंगडे यांनी सांगितले.

ओबीसी प्रवर्गातील अधिकाऱ्यांना लवकरच बढती

राज्यात ओबीसी प्रवर्गातील अधिकारी, कर्मचारी यांच्या रखडलेल्या पदोन्नतीचा मार्गही लवकरच मोकळा होणार असल्याचाही दावा शेंडगे (Prakash Shendg) यांनी केला आहे. “राज्यात ओबीसी प्रवर्गातील कर्मचाऱ्यांच्या पदोन्नत्या रखडल्या होत्या. या मुद्द्याला घेऊन आम्ही इतर मागासवर्ग कल्याणमंत्री विजय वडेट्टीवर यांची भेट घेतली. त्यांनी आमच्या मागणीची दखल घेत थांबलेल्या पदोन्नत्या लवकरच देण्याचे आश्वासन दिले.” अशी माहिती प्रकाश शेंडगे यांनी दिली.

13 डिसेंबरचा ओबीसी मेळावा होणार

राज्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे 7 डिसेंबरला ओबीसी समाजाचा मुंबईला धडकणारा मोर्चा रद्द करण्यात आला आहे. मात्र, ओबीसी समाजाचा 13 डिसेंबरला मराठवाड्यात होणारा मेळावा नियोजित तारखेलाच होणार, असे प्रकाश शेंडगे यांनी शुक्रवारी (20 नोव्हेबंर) सांगितले. लवकरच आंदोलनाची पुढील दिशा ठरण्यात येईल अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली होती. (date of MPSC exams will be announced in next two-three days said Prakash Shendge)

संबंधित बामत्या :

मुंबईतील 7 डिसेंबरचा ओबीसी समाजाचा नियोजित मोर्चा रद्द, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय : प्रकाश शेंडगे

…तर एकाही ओबीसी मंत्र्याला महाराष्ट्रात फिरु देणार नाही, प्रकाश शेंडगे आक्रमक

मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याचा प्रयत्न झाल्यास…, प्रकाश शेंडगेंचा ठाकरे सरकारला इशारा

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.