दत्तात्रय भरणे पालकमंत्रिपदाला वैतागले ? जबाबदारीतून मुक्त करण्यासाठी घेतली शरद पवारांची भेट

सोबतच उजनीच्या पाण्यावरून सोलापूरकरांचा गैरसमज झाला होता. मात्र पदापेक्षा माझ्या इंदापूर तालुक्याच्या पाण्याचा विषय महत्वाचा आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दत्तात्रय भरणे पालकमंत्रिपदाला वैतागले ? जबाबदारीतून मुक्त करण्यासाठी घेतली शरद पवारांची भेट
दत्ता भरणे
Follow us
| Updated on: Jun 27, 2021 | 11:43 PM

पुणे : राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सोलापूरच्या पालकमंत्रिपदाबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. त्यांनी एका महिन्यापूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन सोलापूरच्या पालकमंत्रिपदाच्या जबाबदारीतून मुक्त करावं अशी विनंती केली होती. तशी माहिती त्यांनी स्वत: दिली आहे. सोबतच उजनीच्या पाण्यावरून सोलापूरकरांचा गैरसमज झाला होता. मात्र पदापेक्षा माझ्या इंदापूर तालुक्याच्या पाण्याचा विषय महत्वाचा आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. इंदापूर शहराचे नगरसेवक अमर गाडे यांच्या खडी क्रेशरच्या प्लॅटच्या उद्घाटनाच्या वेळी दत्तात्रेय भरणे बोलत होते. (Dattatray Bharane was ready to resign from Solapur guardian minister visited sharad pawar)

राज्यमंत्री दत्तात्रय भरणे पालकमंत्रिपदाला वैतागले होते?

गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यानंतर सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी इंदापूरचे आमदार व राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांना देण्यात आली. या नंतरच्या काळात उजनी धरणातून इंदापूर तालुक्यातील बावीस दुष्काळी गावांना पाच टीएमसी पाणी देण्याच्या निर्णय झाला. याचा राज्य सरकारने सर्वेक्षणाचा आदेश काढ़ल्यानंतर सोलापूरमधील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी दत्तात्रय भरणे यांच्या विरोधात उघड नाराजी व्यक्त केली होती.

शरद पवार आणि दत्तात्रय भरणो यांची भेट

त्यामुळे सहाजिकच दत्तात्रय भरणे यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे लोकप्रतिनिधी नाराज असल्याचे जाणवत होते. याच कारणामुळे दत्तात्रय भरणे यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची एका महिन्यापूर्वी भेट घेतली होती. तसेच या भेटीत मला सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदातून मुक्त करा अशी विनंती त्यांनी केली होती.

माझ्या पदापेक्षा माझ्या इंदापूर तालुक्याच्या पाण्याचा विषय महत्वाचा..

उजनीच्या पाण्यावरून सोलापूरकरांचे पाणी नसतानाही सोलापूरकरांचा गैरसमज झाला होता. मात्र पदापेक्षा माझ्या इंदापूर तालुक्याच्या पाण्याचा विषयही महत्वाचा असल्याचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या सरळमार्गी स्वभावामुळे व हसतमुख चेहऱ्याने कार्यकर्त्यांचे स्वागत करण्याच्या त्यांच्या सवयीमुळे मंत्रिमंडळात व राज्यभरात त्यांची एक वेगळी छाप आहे परंतु सोलापूरकरांना भरणे अजून रुचलेच नाहीत का ? असा प्रश्नही निर्माण होत आहे.

इतर बातम्या :

VIDEO: “मी भुजबळ यांच्या विरोधात नाही, कुणाला वाईट वाटले असेल तर माफी मागतो”

DATTA BHARNE

DATTA BHARNE

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.