Rajnath Singh in Leh | राजनाथ सिंह यांच्या हाती पिका मशीनगन, लेह दौऱ्यात शस्त्रसज्जतेचा आढावा
मी सीमेवरील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी काही भागांना भेटी देईन. सशस्त्र दलाच्या जवानांशी संवाद साधणार आहे, असे ट्विट राजनाथ यांनी केले.
नवी दिल्ली : संरक्षणमंत्री राजनाथ सिंह शुक्रवारी सकाळी लेहमध्ये दाखल झाले आहेत. राजनाथ सिंह दोन दिवसांच्या लडाख आणि जम्मू-काश्मीर दौर्यावर आहेत. चीफ ऑफ डिफेंस स्टाफ बिपिन रावत, लष्करप्रमुख मनोज नरवणेही त्यांच्यासोबत आहेत. (Defence Minister Rajnath Singh leaves for Leh)
राजनाथ सिंह, बिपिन रावत आणि मनोज नरवणे यांच्या उपस्थितीत भारतीय लष्कराच्या T-90 टँक आणि बीएमपी लढाऊ रणगाड्यांनी स्टेकना भागात युद्धाभ्यास केला.
#WATCH Indian Army T-90 tanks and BMP infantry combat vehicles carry out exercise at Stakna, Leh in presence of Defence Minister Rajnath Singh, Chief of Defence Staff General Bipin Rawat and Army Chief General MM Naravane. pic.twitter.com/Psc3CJOWok
— ANI (@ANI) July 17, 2020
राजनाथ सिंह यांनी लेह दौऱ्यात शस्त्रसज्जतेचा आढावा घेतला. पिका मशीनगनची पाहणी करतानाचा व्हिडीओ समोर आला आहे.
#WATCH Ladakh: Defence Minister Rajnath Singh inspects a Pika machine gun at Stakna, Leh. pic.twitter.com/MvndyQcN82
— ANI (@ANI) July 17, 2020
भारतीय सशस्त्र दलाच्या जवानांनी स्टेकना येथे पॅरा ड्रॉपिंगचा अभ्यास केला
#WATCH Ladakh: Troops of Indian Armed Forces carry out para dropping exercise at Stakna, Leh in presence of Defence Minister Rajnath Singh, Chief of Defence Staff General Bipin Rawat and Army Chief General MM Naravane. pic.twitter.com/TX4eVOkeT0
— ANI (@ANI) July 17, 2020
दौर्याच्या पहिल्या दिवशी राजनाथ सिंह लडाखमध्ये असतील, तर शनिवारी ते जम्मू-काश्मीरमध्ये श्रीनगरला जातील. भारत आणि चीन यांच्यातील तणावानंतर संरक्षणमंत्र्यांचा हा पहिलाच दौरा आहे. दोन आठवड्यांपूर्वी (3 जुलै) पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही लडाख दौरा केला होता.
Defence Minister Rajnath Singh, Chief of Defence Staff General Bipin Rawat and Army Chief General MM Naravane arrive at Leh Airport. Defence Minister is on a two-day visit to Ladakh and Jammu & Kashmir. pic.twitter.com/CXj2Pmoyu4
— ANI (@ANI) July 17, 2020
“दोन दिवसांच्या लडाख आणि जम्मू-काश्मीर दौर्यावर रवाना होत आहे. मी सीमेवरील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी काही भागांना भेटी देईन. सीमा भागात तैनात सशस्त्र दलाच्या जवानांशी संवाद साधणार आहे” असे ट्विट राजनाथ यांनी केले होते.
Leaving for Leh on a two day visit to Ladakh and Jammu-Kashmir. I shall be visiting the forward areas to review the situation at the borders and also interact with the Armed Forces personnel deployed in the region. Looking forward to it.
— Rajnath Singh (@rajnathsingh) July 17, 2020
पूर्व लडाखमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर उभय पक्षांमध्ये नुकतीच चर्चेची चौथी फेरी झाली. याआधी 6 जून, 22 जून आणि 30 जूनला उच्चस्तरीय चर्चा झाल्या होत्या.
Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर
मंगळवारपासून सुरु झालेली बैठक बुधवारी पहाटेपर्यंत लांबली होती. भारतीय आणि चिनी सैन्य दलाच्या कमांडर्समध्ये झालेल्या चर्चेत दोन्ही बाजूंनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेत (एलएसी) ताणतणाव कमी करण्याच्या दिशेने चर्चा केली.
संबंधित बातम्या :
जवानांचं बलिदान व्यर्थ जाणार नाही, उत्तर देण्यास भारत सक्षम : पंतप्रधान मोदी
(Defence Minister Rajnath Singh leaves for Leh)