Umar Khalid : दिल्ली हिंसेप्रकरणी उमर खालिद अडचणीत; UAPA अंतर्गत खटला चालणार

दिल्ली हिंसेप्रकरणी JNU चा माजी विद्यार्थी नेता उमर खालिद विरोधात UAPA अंतर्गत खटला चालवण्यात येणार आहे.

Umar Khalid : दिल्ली हिंसेप्रकरणी उमर खालिद अडचणीत; UAPA अंतर्गत खटला चालणार
Follow us
| Updated on: Nov 06, 2020 | 3:04 PM

नवी दिल्ली: दिल्ली हिंसेप्रकरणी JNU चा माजी विद्यार्थी नेता उमर खालिद विरोधात UAPA अंतर्गत खटला चालवण्यात येणार आहे. दिल्ली सरकार आणि केंद्रीय गृहमंत्रालयाने उमर खालिद विरोधात UAPA अंतर्गत हा खटला चालवण्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे खालिद याच्या अडचणीत वाढ झाली आहे. (Delhi riots case: MHA gives nod to prosecute Umar Khalid under UAPA)

दिल्ली पोलिसांना एक आठवड्यापूर्वीच खालिद विरोधात खटला चालविण्यास परवानगी मिळाली होती. त्यामुळे दिल्ली पोलीस लवकरच दिल्ली हिंसेप्रकरणी उमर खालिद आणि शरजील इमाम यांच्या विरोधात यूएपीए अंतर्गत कोर्टात आरोपपत्र दाखल करणार आहे. त्याशिवाय गुन्हे अन्वेषण विभागही खालिद विरोधात आरोपपत्र दाखल करणार आहे.

दिल्ली पोलिसांनी दिल्ली हिंसेप्रकरणी उमर खालिदला 14 सप्टेंबर रोजी अटक केली होती. कडकड्डुमा कोर्टाने खालिदच्या न्यायलयीन कोठडीत 20 नोव्हेंबरपर्यंत वाढ केली आहे. दिल्ली पोलिसांनी ही न्यायालयीन कोठडी 30 सप्टेंबरपर्यंत वाढवण्याची मागणी केली होती. त्यावेळी खालिदने पोलीस चौकशीला सहकार्य केल्याचं सांगून न्यायालयीन कोठडी वाढवण्यास खालिदच्या वकिलाने विरोध केला होता. तर पोलिसांनी खालिद चौकशीला सहकार्य करत नसल्याचा दावा केला होता.

दरम्यान, फेब्रुवारी महिन्यात उत्तरपूर्व दिल्लीत हिंसाचार  झाला होता. उमर खालिदला त्या दंगली प्रकरणी  UAPA कायद्यांतर्गत 13 सप्टेंबरला अटक करण्यात आली होती. अटकेनंतर उमरला 10 दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली होती. दिल्ली विशेष न्यायालयाने पोलीस कोठडीनंतर उमरला 22 ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी ठोठावली होती.

दिल्ली पोलिसांनी उमर खालिद विरोधात 6 मार्चला चार्जशीट दाखल केली होती. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत दौऱ्यावेळी नागरिकांनी रस्त्यावर येऊन रास्ता रोको करण्याचे आवाहन उमर खालिदने केले होते. त्यावेळी उमरने दोन ठिकाणी प्रक्षोभक भाषण केल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.

उमरच्या वकिलांनी  24 सप्टेंबरला झालेल्या सुनावणीत पोलीस कोठडी दरम्यान उमर खालिदने कोणत्याही कागदपत्रावर स्वाक्षरी केली नसल्याचे सांगितले होते. तसेच तिहार तुरुंगात जाण्यापूर्वी कुटुंबातील सदस्यांना भेटण्याची परवानगी देण्यात यावी,अशी मागणी न्यायालयात केली होती. (Delhi riots case: MHA gives nod to prosecute Umar Khalid under UAPA)

संबंधित बातम्या:

दिल्ली हिंसाचारावर विरोधी पक्ष आक्रमक, लोकसभेत गदारोळ

दिल्ली हिंसाचार पूर्वनियोजित, प्रकाश आंबेडकरांचा खळबळजनक आरोप

Umar Khalid : जेएनयूचा माजी विद्यार्थी उमर खालिदला क्राईम ब्रँचकडून अटक

(Delhi riots case: MHA gives nod to prosecute Umar Khalid under UAPA)

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.