राम मंदिरावरुन रोष, दिल्ली-उत्तर प्रदेशात बॉम्ब स्फोटाचा कट, पकडलेल्या दहशतवाद्याचा मोठा खुलासा

दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने पकडलेल्या आयसीसच्या अतिरेक्याने चौकशीदरम्यान महत्त्वपूर्ण खुलासे केले आहेत (Delhi Terrorist arrested plan of bomb blast in UP and Delhi on Ayodhya Ram mandir)

राम मंदिरावरुन रोष, दिल्ली-उत्तर प्रदेशात बॉम्ब स्फोटाचा कट, पकडलेल्या दहशतवाद्याचा मोठा खुलासा
Follow us
| Updated on: Aug 22, 2020 | 3:55 PM

नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने पकडलेल्या आयसीसच्या अतिरेक्याने चौकशीदरम्यान महत्त्वपूर्ण खुलासे केले आहेत. “अयोध्येतील राम मंदिराच्या बांधकामाला सुरुवात झाली आहे. मात्र, राम मंदिराच्या निर्मितीवरुन अनेक अतिरेकी नाराज आहेत. त्यामुळेच त्याचा बदला म्हणून दिल्ली आणि उत्तर प्रदेशात मोठा बॉम्बस्फोट घडवण्याचा बेत होता”, असा खुलासा अतिरेक्याने केला आहे (Delhi Terrorist arrested plan of bomb blast in UP and Delhi on Ayodhya Ram mandir).

दिल्ली पोलिसांनी पकडलेल्या अतिरेक्याचे नाव अबू युसूफ असं आहे. तो अफगाणिस्तानमधील त्याच्या सहकाऱ्यांच्या संपर्कात होता, अशी माहिती पोलिसांच्या तपासात समोर येत आहे. पोलिसांकडून त्याची कसून चौकशी सुरु आहे. विशेष म्हणजे तो मूळचा उत्तर प्रदेशच्या बलरामपूर जिल्ह्यातील एका गावाचा रहिवासी असल्याचं समोर येत आहे.

दरम्यान, या अतिरेक्याकडे मिळालेल्या प्रेशर कूकरमध्ये 15 किलो आयईडी स्फोटक पोलिसांच्या हाती लागलं आहे. या स्फोटकात आणखी कोणते केमिकलचं मिश्रण करण्यात आलं होतं, याचा तपास एनएसजीकडून सुरु आहे (Delhi Terrorist arrested plan of bomb blast in UP and Delhi on Ayodhya Ram mandir).

राम मंदिराच्या पार्श्वभूमीवर अतिरेकी मोठा कट रचत असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी पोलिसांना याआधीच दिली होती. त्यानंतर आता अतिरेकी अबू युसूफने केलेल्या खुलासानंतर संपूर्ण उत्तर प्रदेशात हाय अलर्ट जारी करण्यात आलं आहे. उत्तर प्रदेशच्या पोलीस महासंचालक हितेश चंद्र अवस्थी यांनी सर्व जिल्ह्यांमध्ये अतिरिक्त फौजफौटा तैनात करण्याचे आदेश दिले आहेत.

उत्तर प्रदेश एटीएस आणि दिल्ली पोलिसांची विशेष टीम अतिरेकी अबू युसूफच्या बलरामपूर जिल्ह्यातील गावात पोहोचली आहे. तर दुसरी टीमदेखील अबू युसूफला घेऊन बलरामपूरसाठी रवाना झाली आहे.

पोलिसांनी अतिरेक्याला जेरबंद कसं केलं?

दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाला गुप्तचर विभागांकडून अबू युसूफ विषयी माहिती मिळाली होती. त्यानंतर शुक्रवारी (21 ऑगस्ट) रात्री उशिरा पोलिसांनी सर्च ऑपरेशन सुरु केलं. पोलिसांनी आज सकाळी दिल्लीतील धौलाकुआं-करोलबाग रस्त्यावर अबू युसूफला घेरलं. त्यानंतर अबू युसूफने पोलिसांवर गोळीबार सुरु केला. त्यांच्यात थोडावेळ चकमक सुरु राहिली. अखेर युसूफला पकडण्यात पोलिसांना यश आलं.

पोलिसांना अबू युसूफकडून दोन प्रेशर कूकरमध्ये 15 किलो आयईडी स्फोटक मिळालं आहे. एनएसजीच्या पथकाने या स्फोटकाला निकामी केलं आहे.

संबंधित बातमी : दिल्लीत ISIS चा अतिरेकी पकडला, दहशतवाद्यांचा मोठा कट उधळला

... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ
... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ.
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी.
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?.
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?.
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?.
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर.
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.