फडणवीस, राज ठाकरेंच्या सुरक्षेत कपात; जाणून घ्या Z+, Y सुरक्षा व्यवस्था काय असते? कुणाला दिली जाते?

ठाकरे सरकारने राज्यातील महत्त्वाच्या व्यक्तींना ( VIP person) देण्यात येणाऱ्या सुरक्षा व्यवस्थेत नुकताच मोठा बदल केला आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या सुरक्षा ताफ्यातील बुलेटप्रुफ गाडी काढून घेण्यात आली आहे. (detail information vip security)

फडणवीस, राज ठाकरेंच्या सुरक्षेत कपात; जाणून घ्या Z+, Y  सुरक्षा व्यवस्था काय असते? कुणाला दिली जाते?
Follow us
| Updated on: Jan 10, 2021 | 1:21 PM

मुंबई : ठाकरे सरकारने राज्यातील महत्त्वाच्या व्यक्तींना ( VIP person) देण्यात येणाऱ्या सुरक्षा व्यवस्थेत नुकताच मोठा बदल केला आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या सुरक्षा ताफ्यातील बुलेटप्रुफ गाडी काढून घेण्यात आली आहे. तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची झेड (z) दर्जाची सुरक्षा काढून घेऊन त्यांना वाय (Y+) दर्जाची सुरक्षा दिली आहे. या पार्श्वभूमीवर ही सुरक्षा प्रणाली नेमकी काय असते हे समजून घेऊया. (detail information of the security given to VIP person by government)

देशासह राज्यात अनेक प्रकारच्या विशेष व्यक्ती आहेत. या व्यक्तींना देशासह राज्यामध्ये विशेष महत्त्व असते. त्यांना विशेष महत्त्व असल्यामुळे आकसापोटी किंवा शत्रूत्वाची भावना ठेवून त्यांच्यावर हल्ला होऊ शकतो. या शक्यतांचा विचार करुन सरकारतर्फे त्यांना वेगवेगळ्या प्रकारची सुरक्षा प्रदान करण्यात येते. ही सुरक्षा व्यवस्था एकूण चार प्रकारची असून झेड प्लस (Z+), झेड (z), वाय (Y), एक्स (X) असे सुरक्षा व्यवस्थेचे प्रकार आहेत.

या सर्वांपेक्षा उच्च समजली जाणारी SPG ( स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप) सुरक्षा व्यवस्था देशाचे पंतप्रधान, माजी पंतप्रधान आणि त्यांच्या कुटुंबाला दिली जाते. गुप्तचर यंत्रणा, पोलीस यांनी दिलेल्या गुप्त माहितीनुसार देशातील तसेच राज्यातील महत्त्वाच्या व्यक्तींना सुरक्षा प्रदान केली जाते. एसपीजीसह इतर चार प्रकारच्या सुरक्षा व्यवस्था राष्ट्रपती, माजी राष्ट्रपती, पंतप्रधान, माजी पंतप्रधान, खासदार, आमदार, सेलिब्रिटी, बॉलिवूड सेलिब्रिटी, क्रिकेटर यांना दिली जाऊ शकते.

झेड प्लस (Z+) सुरक्षा काय आहे?

ही एसपीजी (SPG) नंतर दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी सुरक्षा व्यवस्था आहे. यामध्ये महत्त्वाच्या व्यक्तीच्या सुरक्षेसाठी एकूण 55 सुरक्षा रक्षक तैनात करण्यात येतात. या 55 सुरक्षा रक्षकांपैकी 10 पेक्षा जास्त एनएसजी (NSG) कमांडो असतात. त्यासोबतच या ताफ्यात पोलीस अधिकारीसुद्धा असतात. आयटीबीपी (ITBP) आणि सीआरपीएफ (CRPF) चे जवानसुद्धा या प्रकारच्या सुरक्षा व्यवस्थेत तैनात केले जातात. झेड प्लस सुरक्षा व्यवस्थेत एस्कॉर्ट्स आणि वानहसुद्दा दिले जाते.

झेड (Z) प्रकारची सुरक्षा व्यवस्था

या सुरक्षा व्यवस्थेत चार ते पाच एनएसजी कमांडो महत्त्वाच्या व्यक्तीचे रक्षण करतात. त्यांच्यासोबत एकूण 22 सुरक्षारक्षक या प्रकारच्या सुरक्षेत तैनात केले जातात. या प्रकारच्या सुरक्षेत दिल्ली पोलीस, आयटीबीपी आणि सीआरपीएफचे जवान या प्रकारच्या सुरक्षा व्यवस्थेत तैनात असतात. तसेच या ताफ्यात पोलीस अधिकारीसुद्दा असतात.

वाय (Y) प्रकारची सुरक्षा व्यवस्था

तिसऱ्या क्रमांकाची ही सुरक्षा व्यवस्था आहे. महत्त्वाचे असणारे मात्र तुलनेने कमी धोका असेलेल्या व्यक्तींना वाय श्रेणीची सुरक्षा दिली जाते. या व्यवस्थेत एकूम 11 सुरक्षा रक्षक असतात. ज्यामध्ये दोन प्रशिक्षित जवान असतात.

एक्स श्रेणी की सुरक्षा

एक्स प्रकारच्या सुरक्षा श्रेणीमध्ये दोन सुरक्षा रक्षक दिले जातात. देशात अनेक महत्त्वाच्या व्यक्तींना या प्रकारची सुरक्षा दिलेली आहे. या सुरक्षा व्यवस्थेत कोणत्याही प्रकारचे कमांडो नसतात.

दरम्यान, राज्यात अनेक राजकीय व्यक्तींच्या सुरक्षा व्यवस्थेत बदल केले आहेत. दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत राज्य सरकारने हा निर्ण घेतला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, भाजप आमदार प्रसाद लाड आदी नेत्यांच्या सुरक्षा व्यवस्थे मोठी कपात केली गेली आहे.

संबंधित बातम्या :

फडणवीस, राज ठाकरे, चंद्रकांतदादांच्या सुरक्षेत कपात; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

सुरक्षारक्षकाचा प्रामाणिकपणा, 24 लाख रुपयांनी भरलेली बॅग पोलिसांच्या स्वाधीन, पोलिसांकडून सत्कार

(detail information of the security given to VIP person by government)

'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.