अबब! अवघ्या 9 दिवसांत साईचरणी कोट्यवधींचं दान

यामध्ये 6 देशातील परकीय चलनाचाही समावेश असल्याची माहिती मंदिर प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

अबब! अवघ्या 9 दिवसांत साईचरणी कोट्यवधींचं दान
Follow us
| Updated on: Nov 25, 2020 | 8:12 PM

शिर्डी : 8 महिन्यांच्या लॉकडाऊननंतर साई मंदिर (Sai Temple) खुलं होताच साईचरणी कोट्यावधींचं दान करण्यात आलं आहे. 16 नोव्हेंबर ते 24 नोव्हेंबर या कालावधीत एकुण 3 कोटी 9 लाख 83 हजार रुपयांचे दान साई मंदिरात करण्यात आलं आहे. इतकंच नाही तर दक्षिणापेटीत 1 कोटी 52 लाख आणि देणगी काउंटरवर 33 लाख रुपये तर ऑनलाइनच्या माध्यमातून ( चेक / डीडी / क्रेडिट / डेबिट ) 1 कोटी 22 लाख रुपये साई चरणीं दान करण्यात आले आहेत. यामध्ये 6 देशातील परकीय चलनाचाही समावेश असल्याची माहिती मंदिर प्रशासनाकडून देण्यात आली आहे. (Devotees donate 3 crore 9 lakh 83 thousand rupees to shirdi Sai Mandir after lockdown)

अधिक माहितीनुसार, 64.50 ग्रॅम सोने तर 3 किलो 800 ग्रॅम चांदीही दान करण्यात आली आहे. सगळ्यात विशेष म्हणजे नऊ दिवसात 48 हजार 224 भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला आहे. राज्‍य शासनाच्‍या आदेशाने साईबाबांचे समाधी मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्‍यात आलं. यामुळे दिनांक 16 नोव्‍हेंबर ते दिनांक 24 नोव्‍हेंबर 2020 याकालावधीत सुमारे 48 हजार 224 साईभक्‍तांनी श्रींच्‍या दर्शनाचा लाभ घेतला.

या काळात साईभक्‍तांकडून विविध प्रकारे 03 कोटी 09 लाख 83 हजार 148 रुपये देणगी संस्‍थानला प्राप्‍त झालेली आहे. सध्‍या कोरोना विषाणू (कोवीड १९) ची साथ सुरू आहे. तरीदेखील टाइम बेस, जनसंपर्क कार्यालय व ऑनलाईन या सेवांच्या माध्यमातून ऑनलाईन आणि सशुल्‍क दर्शन/आरती पासेसव्‍दारे 61 लाख 04 हजार 600 रुपये प्राप्‍त झालेले आहे. तसेच या कालावधीमध्‍ये श्री साई प्रसादालयामध्‍ये सुमारे 80 हजार साईभक्‍तांनी प्रसाद भोजनाचा लाभ घेतला.

अधिक माहितीनुसार, दिनांक 16 नोव्‍हेंबर ते 24 नोव्‍हेंबर 2020 या कालावधीत रोख स्वरुपात एकूण 03 कोटी 09 लाख 83 हजार 148 रुपये इतकी देणगी प्राप्‍त झालेली आहे. यामध्‍ये दक्षिणापेटी मोजणी रुपये 01 कोटी 52 लाख 57 हजार 102, देणगी काऊंटर 33 लाख 06 हजार 632 रुपये, डेबीट क्रेडीट कार्ड, ऑनलाईन, चेक डी.डी.देणगी, मनी ऑर्डर आदी रुपये 01 कोटी 22 लाख 50 हजार 822 रुपये आणि 06 देशांचे परकिय चलन अंदाजे रुपये 01 लाख 68 हजार 592 रुपयांचा समावेश आहे. तर 64.500 ग्रॅम सोने व 3801.300 ग्रॅम चांदी संस्‍थानला देणगी स्‍वरुपात प्राप्‍त झालेली आहे.

इतर बातम्या –

Shirdi | शिर्डीतील साई मंदिरात भाविकांना प्रवेश, दर्शनासाठी रांगा

शिर्डीतील साई मंदिरात सोमवारपासून 6 हजार भाविकांना दर्शनाची सोय; पण ऑनलाईन बुकिंग सक्तीची!

(Devotees donate 3 crore 9 lakh 83 thousand rupees to shirdi Sai Mandir after lockdown)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.