धुळे-नंदुरबारच्या निकालावरुन उद्याच्या राजकारणाची दिशा स्पष्ट, प्रवीण दरेकरांचा महाविकास आघाडीला टोला
धुळे-नंदुरबारमध्ये महाविकास आघाडीचे मिळून 213 मतं होती. पण त्यांच्या उमेदवाराला अवघी 98 मतं मिळाली आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीचे नेते मतभेद नसल्याचा कितीही दावा करत असले तरी त्यांच्यात अलसेल्या विसंवादाचा स्फोटच आज झाल्याचं दिसलं, अशी प्रतिक्रिया प्रवीण दरेकर यांनी दिलीय.
मुंबई: धुळे-नंदूरबार विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसला धूळ चारत भाजपनं दणदणीत विजय मिळवला आहे. भाजप उमेदवार अमरीश पटेल यांनी 332 मतं घेत विजयी गुलाल लावला. तर काँग्रेसचे उमेदवार अभिजित पाटील यांना 98 मतांवर समाधान मानावं लागलं. त्यामुळे महाविकास आघाडीची मंत मोठ्या प्रमाणात फुटल्याचं धुळे-नंदुरबार विधान परिषद निवडणुकीत पाहायला मिळालं. या निकालावरुन महाविकास आघाडीतील मतभेद स्पष्ट झाले आहेत. हा निकाल उद्याच्या राजकारणाची दिशा स्पष्ट करणारा असल्याचा विश्वास विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केलाय.(After victory in Dhule-Nandurbar, Praveen Darekar criticized Mahavikas Aghadi)
धुळे नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघात महाविकास आघाडी आपली ५० टक्के ही मतं राखु शकली नाहीत यावरून ऊद्याचे महाविकास आघाडीचे काय भविष्य राहील हे स्पष्ट होतय, @BJP4Maharashtra चे उमेदवार श्री अमरीश पटेल यांचे तसेच सर्व मतदारांचे त्रिवार अभिनंदन!@TV9Marathi @TheMahaMTB
— Pravin Darekar – प्रविण दरेकर (@mipravindarekar) December 3, 2020
धुळे-नंदुरबारमध्ये महाविकास आघाडीचे मिळून 213 मतं होती. पण त्यांच्या उमेदवाराला अवघी 98 मतं मिळाली आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीचे नेते मतभेद नसल्याचा कितीही दावा करत असले तरी त्यांच्यात अलसेल्या विसंवादाचा स्फोटच आज झाल्याचं दिसलं, अशी प्रतिक्रिया प्रवीण दरेकर यांनी दिलीय. धुळे-नंदूरबारमधील मतदारांनी महाविकास आघाडीचा आदेश पाळला नाही. त्यामुळे हा निकाल म्हणजे उद्याच्या राजकारणाची दिशा आहे. त्याचबरोबर महाविकास आघाडीचं भविष्य काय असेल, हे आज स्पष्ट झाल्याचा टोला दरेकरांनी लगावला आहे.
धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद जागेवर @BJP4Maharashtra चे श्री. अमरीश पटेल जी यांचे विजयी झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा ! pic.twitter.com/pMXi2FuLAQ
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) December 3, 2020
अमरीश पटेल यांच्या विजयाचं गणित कसं जुळलं?
भाजपचे उमेदवार अमरीश पटेल विरोधकांची 115 मतं फोडण्यात यशस्वी झाले आहेत. भाजपाच्या 199 मतदारांनी तर महाविकास आघाडीच्या 213 मतदारांनी मतदान केलं होते. त्यात काँग्रेसच्या किमान 57 मतदारांनी क्रॉस व्होटिंग केल्याचं स्पष्ट झालं आहे. काँग्रेसचं संख्याबळ 157 असतानाही अभिजित पाटील यांना फक्त 98 मतं मिळाली आहेत. तर महाविकास आघाडीच्या किमान 115 मतदारांनी क्रॉस व्होटिंग केलं आहे. महाविकास आघाडीकडे 213 मतं असतानाही पाटील यांना 98 च मतं मिळाल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
विजयाचं श्रेय कार्यकर्त्यांना- पटेल
अमरीश पटेल यांनी आपल्या विजयाचं श्रेय कार्यकर्त्यांना दिलं आहे. धुळे आणि नंदुरबारमधील भाजपचे आमदार, खासदार, सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी घेतलेल्या परिश्रमामुळेच आपण विजयी झालो, अशी प्रतिक्रिया पटेल यांनी दिली आहे. क्रॉस वोटिंगबद्दल विचारल्यावर मात्र त्यांनी जास्त बोलण्यास नकार दिला. आपण कुणावरही दबाव टाकला नाही. आपण कुणालाही फोडण्याचा प्रयत्न केला नाही. मतदारांना माझ्यावर विश्वास असल्यानं त्यांनी आपल्याला मतदान केल्याचं पटेल म्हणाले. महाविकास आघाडीकडून नगरपालिका, महानगरपालिकांना पाहिजे तेवढा निधी उपलब्ध करुन दिला जात नाही. त्यामुळे विकासाची गती मंदावल्याचंही अमरीश पटेल म्हणाले.
संबंधित बातम्या:
अमरिश पटेल – विजयाची हॅटट्रिक, तरीही 12 महिन्यांसाठी आमदार!
Praveen Darekar criticized Mahavikas Aghadi