दिसला का स्पार्क? ऋतुराजच्या शतकानंतर सोशल मीडियावर धोनी ट्रोल, चाहत्यांकडून मात्र सेंच्युरीचं क्रेडिट कॅप्टनला

यशस्वी जयसवालची वादळी सुरुवात आणि शिवम दुबेच्या शानदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर राजस्थाने 7 गडी आणि 15 चेंडू राखून चेन्नईने दिलेलं आव्हान पूर्ण केलं. मात्र या समन्यात सर्वाधिक चर्चा झाली ती चेन्नईचा सलामीवीर ऋतुराज गायकवाडची.

दिसला का स्पार्क? ऋतुराजच्या शतकानंतर सोशल मीडियावर धोनी ट्रोल, चाहत्यांकडून मात्र सेंच्युरीचं क्रेडिट कॅप्टनला
Follow us
| Updated on: Oct 03, 2021 | 6:44 PM

मुंबई : IPL 2021 स्पर्धेत शनिवारी अबू धाबीच्या शेख जायद आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर 47 वा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्स या दोन संघांमध्ये खेळवला गेला. या सामन्यात चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना 189 धावांचा डोंगर उभा केला होता. मात्र राजस्थानच्या फलंदाजांनी हा डोंगर अगदी सहजपणे सर केला. यशस्वी जयसवालची वादळी सुरुवात आणि शिवम दुबेच्या शानदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर राजस्थाने 7 गडी आणि 15 चेंडू राखून चेन्नईने दिलेलं आव्हान पूर्ण केलं. मात्र या समन्यात सर्वाधिक चर्चा झाली ती चेन्नईचा सलामीवीर ऋतुराज गायकवाडची, त्याने या सामन्यात आक्रमक शतक ठोकून चेन्नईला 189 धावांपर्यंत मजल मारुन दिली. ऋतुराजलाच सामनावीराचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. (Did you see the spark? Netizens question to MS Dhoni after Ruturaj Gaikwad Hits His Maiden IPL Century)

ऋतुराज गायकवाड आणि फाफ डुप्लेसीने 47 धावांची भागीदारी करत चेन्नईला चंगली सुरुवात मिळवून दिली. त्यानंतर आलेल्या मोईन अली, सुरेश रैना आणि अंबाती रायुडूला फार चांगली कामगिरी करता आली नाही, मात्र सलामीवीर ऋतुराज गायकवाडने राजस्थानच्या गोलंदाजांची यथेच्च धुलाई सुरुच ठेवली. अखेरच्या काही षटकांमध्ये ऋतुराजला रवींद्र जाडेजाने चांगली साथ दिली. दोघांनी पाचव्या विकेटसाठी 22 चेंडूत नाबाद 55 धावांची भागीदारी रचली. या दरम्यान ऋतुराज गायकवाडने आयपीएल कारकिर्दीतलं पहिलं शतक साजरं केलं. त्याने 60 चेंडूत नाबाद 101 धावांची खेळी केली. या खेळीत 9 चौकार आणि 5 षटकारांचा समावेश होता.

स्पार्क दिसला का?

ऋतुराजने या सामन्यात शतक ठोकल्यामुळे सोशल मीडियावर चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीची चर्चा सुरु होती. आता तुम्ही म्हणाल शतक तर ऋतुराजने ठोकलं, मग चर्चा धोनीची का होतेय? तर त्यासाठी तुम्हाला थोडं मागं जावं लागेल. आयपीएलच्या गेल्या मोसमात चेन्नईने ऋतुराजसह काही तरुण खेळाडूंना संधी दिली होती. मात्र हे खेळाडू आपली छाप पाडण्यात अपयशी ठरले. तेव्हा धोनी एकदा क्रिकेट कॉमेंटेटर्सशी बोलताना म्हणाला होता की, त्याच्या संघातील तरुण खेळाडूंमध्ये ‘स्पार्क’ दिसत नाही. त्यानंतर मागील आयपीएलमध्ये चेन्नईच्या अखेरच्या तीन सामन्यांमध्ये पुन्हा एकदा ऋतुराजला संधी दिली गेली. यावेळी त्याने सलग तीन अर्धशतकं ठोकून चेन्नईच्या कोणत्याही खेळाडूला आजवर न जमलेली कामगिरी करुन दाखवली. यंदाच्या आयपीएलमध्येदेखील ऋतुराजची बॅट चांगलीच तळपतेय. यंदाच्या आयपीएलमध्ये त्याने 12 सामन्यांमध्ये तब्बल 508 धावा चोपल्या आहेत. यात 1 शतक आणि 3 अर्धशतकांचा समावेश आहे. त्यामुळेच धोनीचे ट्रोलर्स धोनीला ट्रोल करत आहेत. काही नेटिझन्सनी सोशल मीडियावर आता तरी “धोनीला स्पार्क दिसला का?” किंवा “धोनी भाय ये स्पार्क कुछ ज्यादा तो नहीं हुआ ना?” असे सवाल उपस्थित करुन धोनीला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला आहे.

ऋतुराजला कर्णधाराचा पाठिंबा

दुसऱ्या बाजूला धोनीच्या पाठिराख्यांनी या शतकाचं किंवा ऋतुराजच्या परफॉर्मन्सचं श्रेय धोनीला दिलं आहे. ऋतुराज यंदाच्या आयपीएलमध्ये सुरुवातीच्या तिन्ही सामन्यांमध्ये अपयशी ठरला होता. मात्र तरीदेखील धोनी त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला आणि त्याने चौथ्या सामन्यात ऋतुराजला संधी दिली. या सामन्यात त्याने अर्धशतक ठोकलं. त्यानंतरच्या 9 पैकी 8 सामन्यांमध्ये त्याने 30 पेक्षा जास्त धावांची खेळी केली आहे. धोनीच्या चाहत्यांच्या मते धोनी ऋतुराजच्या पाठीशी उभा राहिला नसता, तर त्याला पुढच्या सामन्यांमध्ये कदाचित संधीच मिळाली नसती. चेन्नई सुपरकिंग्सकडे सलामीसाठी अनुभवी रॉबिन उथप्पाचा पर्याय होता. तरीदेखील धोनीने ऋतुराजलाच संधी दिली.

इतर बातम्या

RCB vs PBKS: पंचाचा चूकीचा निर्णय, राहुल भडकला, दिग्गज क्रिकेटपटू म्हणतो पंचाला तात्काळ बडतर्फ करा, वाचा नेमकं प्रकरण काय?

WTC 2021 मध्ये विजयानंतरही न्यूझीलंडला भारताविरुद्ध कसोटी सामन्याचा धसका, संघातील प्रमुख खेळाडू म्हणतो…

राजस्थानच्या फलंदाजांचा पराक्रम, ऋतुराजच्या आधी अनेक खेळाडूंच्या शतकांवर पाणी फेरलं

(Did you see the spark? Netizens question to MS Dhoni after Ruturaj Gaikwad Hits His Maiden IPL Century)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.