कोरोनानंतर तब्बल दोन वर्षाच्या प्रतिक्षेनंतर “ढोलकीवर थाप, अन घुंगरांचा आवाज अन ललनांच्या दिलखेचक अदानी रंगला तमाशाचा फड
तमाशा व लावणी कलावंतानी तब्बल दोन ते अडीच वर्षानंतर पुन्हा लोककलेला पुन्हा एकदा लोकांसमोर सादर केली. पुन्हा एकदा तमाशाचा फड उभा राहिल्याने कलाकार भारावून गेले होते. राज्य शासनाने तमाशा थिएटर व यात्रा मधुन तमाशा सादर करण्याची परवानगी दिली याबाबत राज्य शासनाचे जाहीर आभार यावेळी मानले.
जुन्नर- तालुक्यातील बेल्हे येथे बेल्हेश्वर यात्रेच्या निमित्ताने दोन दिवस लोकनाट्य तमाशा व लावणी महोत्सव सोहळा मोठ्याप्रमाणात साजरा झाला.यावेळी तमाशा कलावंतानी आणी लावणी रसिकानी या महोत्सवास भरभरून हजेरी लावली होती.व गुलाबी थंडीत सुध्दा “रगेल आणी रंगेल” प्रेक्षकांनी या लावणी महोत्सवाचा आनंद लुटला.
यावेळी तमाशा व लावणी कलावंतानी तब्बल दोन ते अडीच वर्षानंतर पुन्हा लोककलेला पुन्हा एकदा लोकांसमोर सादर केली. पुन्हा एकदा तमाशाचा फड उभा राहिल्याने कलाकार भारावून गेले होते. राज्य शासनाने तमाशा थिएटर व यात्रा मधुन तमाशा सादर करण्याची परवानगी दिली याबाबत राज्य शासनाचे जाहीर आभार यावेळी मानले.
व्यक्त केली खंत लावणी सम्राज्ञी सुरेखाताई पुणेकर, तमाशा संघटनेचे अध्यक्ष मास्टर रघुवीर खेडकर तसेच लोककलावंत सुरेश डोळस व आदी तमाशा कलावंतानी कोरोनाच्या काळात झालेली परवड, उपासमार व संकटे आणी दिशाहीन झालेल्या राजकीय समाज व्यवस्थेबद्दल खंत व्यक्त केली.
दिग्गज कलाकारांनी लावली हजेरी
या सोहळ्यात संगित रत्न दत्तामहाडीक पुणेकर लोकनाट्य तमाशा मंडळ, लता लंका पाचेगावकर लोकनाट्य (तासगाव)., सिमा पोटे नारायणगावकर, ,अचॅना जावळेकर व संगीता लाखे पुणेकर , छाया खिल्लारी बारामतीचे लोकनाट्य मंडळ,तसेच हरिभाऊ बढे सहभाग सुकन्या बढे लोकनाट्य तमाशा मंडळ आदी तमाशा मंडळानी यामधे सहभाग घेतला होता. तसेच नंटरंगी नार सुरेखाताई पुणेकर या अनेक दिग्गज कलाकरानी या कला महोत्सवाला हजेरी लावली. तसेच पानिपतकार विश्वास पाटील ,तमाशा संघटनेचे अध्यक्ष रघुवीर खेडकर आदींनी लोककलेचे महत्व पटवून दिले.तसेच तमाशा म्हणजे काय ? हे पानिपतकार विश्वास पाटील यानी कलाकार व रसिकांना समजावून सागितले.
Kanpur Test Report : भारत आणि न्यूझीलंडमधील कानपूर कसोटी अनिर्णित, जाणून घ्या पाच दिवसांचा लेखाजोखा
Aaditya Thackeray | दोन-तीन देश आज लॉकडाऊनमध्ये आहेत, आपण काळजी घेणे गरजेचे – आदित्य ठाकरे