‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ पंचवीशीत; 18 देशांत पुन्हा प्रदर्शित होणार
'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' हा शाहरुख-काजोलचा ब्लॉकबस्टर चित्रपट पुन्हा 18 देशांमध्ये प्रदर्शित होणार असल्याचे चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी सांगितले आहे.
मुंबई : ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे‘ हा शाहरुख-काजोलचा ब्लॉकबस्टर चित्रपट पुन्हा 18 देशांमध्ये प्रदर्शित होणार असल्याचे चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी सांगितले आहे. अमेरिका, यूके, युएई, सौदी अरेबिया, कतार, मॉरिशस सारख्या देशांचा यादीत समावेश आहे. शाहरुख खान आणि काजोल यांचा ‘दिलवाला दुल्हनिया ले जायेंगे’ या चित्रपटाची 25 वर्षे पूर्ण झाली असून या पार्श्वभूमीवर हा चित्रपट पुन्हा प्रदर्शित केला जाणार आहे. 25 वर्षांनंतरही या चित्रपटाची आजही तेवढीच क्रेझ आहे.(Dilwale dulhaniya le jaayenge 25 years will be screened again in 18 countries)
शाहरुख-काजोलचा हा ब्लॉकबस्टर चित्रपट 18 देशांमध्ये प्रदर्शित होणार आहे. अमेरिका, ब्रिटन, युएई, सौदी अरेबिया, कतार, मॉरिशस, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, फिजी, जर्मनी, नॉर्वे, स्वीडन, स्पेन, स्वित्झर्लंड, अॅस्टोनिया आणि फिनलँडमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होईल. याचा अर्थ केवळ भारतातच नव्हे तर देशाबाहेरही ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ची क्रेझ अद्यापही कायम असल्याचं सिद्ध होतं.
लंडनमध्ये शाहरुख-काजोलचा पुतळा
या चित्रपटाला 25 वर्षे पूर्ण झाली असून त्यानिमित्ताने शाहरुख आणि काजोलचा विशेष सन्मान होणार आहे. बॉलिवूडच्या या चित्रपटाचा लंडनच्या लेस्टरस्टर स्क्वेअरमध्ये पहिल्यांदाच गौरव होणार आहे. या ठिकाणी शाहरुख आणि काजोल या दोघांचा सुंदर पुतळा बसविला जाणार असल्याचं सांगण्यात येतं. हार्ट ऑफ लंडन बिझिनेस अलायन्सने जारी केलेल्या निवेदनात असे सांगण्यात आले आहे की, यावेळी ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’च्या एका सीनलाही ‘सीन इन द चौक’ मध्ये समाविष्ट केले जाईल. त्यामुळे इतका मोठा सन्मान मिळणारा हा बॉलिवूडचा एकमेव सिनेमा ठरणार आहे.
या ब्लॉकबस्टर चित्रपटाचे दिग्दर्शन आदित्य चोप्रा यांनी केले होते. या चित्रपटात शाहरुख-काजोल व्यतिरिक्त अनुपम खेर, अमरीश पुरी, फरीदा जलाल, सतीश शाह यासारखे उत्कृष्ट कलाकार होते. प्रत्येकाची पात्रे अजूनही प्रेक्षकांच्या हृदयात आहेत..
संबंधित बातम्या :
DDLJ | ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ची 25 वर्षे पूर्ण, ‘राज-सिमरन’चा नवा अवतार दिसणार!
(Dilwale dulhaniya le jaayenge 25 years will be screened again in 18 countries)