औरंगाबादः वैजापूरात काका पुतण्यातील बेबनाव चव्हाट्यावर, अभय पाटील चिकटगावकर भाजपच्या गोटात जाणार

औरंगाबादः राजकीय इतिहासात महात्वाकांक्षेमुळे काका-पुतवण्यातील वाद काही नवीन नाहीत. वैजापुरातही प्रसिद्ध राजकीय परिवारातील काका-पुतण्यातील वाद आता चव्हाट्यावर आला असून यातील पुतण्याने पक्षातून वेगळे होत भाजपात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. वैजापुरात राष्ट्रवादी काँग्रेसचे (Vaijapur NCP) अभय पाटील चिकटगावकर (Abhay Patil Chikatgaokar) यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय नुकताच जाहीर केला असून यामुळे काका भाऊसाहेब चिकटगावकर (Bhausaheb […]

औरंगाबादः वैजापूरात काका पुतण्यातील बेबनाव चव्हाट्यावर, अभय पाटील चिकटगावकर भाजपच्या गोटात जाणार
चिकटगावकर काका-पुतण्यात वाद, अभय पाटील चिकटगावकर भाजपामध्ये प्रवेश करणार
Follow us
| Updated on: Nov 17, 2021 | 2:03 PM

औरंगाबादः राजकीय इतिहासात महात्वाकांक्षेमुळे काका-पुतवण्यातील वाद काही नवीन नाहीत. वैजापुरातही प्रसिद्ध राजकीय परिवारातील काका-पुतण्यातील वाद आता चव्हाट्यावर आला असून यातील पुतण्याने पक्षातून वेगळे होत भाजपात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. वैजापुरात राष्ट्रवादी काँग्रेसचे (Vaijapur NCP) अभय पाटील चिकटगावकर (Abhay Patil Chikatgaokar) यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय नुकताच जाहीर केला असून यामुळे काका भाऊसाहेब चिकटगावकर (Bhausaheb Chikatgaokar) यांना मोठा धक्का बसला आहे.

दोन चिकटगावकर बंधूंमध्ये वादाचा इतिहास

राष्ट्रवादी काँग्रेसचे कै. कैलास पाटील चिकटगावकर आणि भाऊसाहेब पाटील चिकटगावकर या बांधूंनी राजकीय कारकीर्द चांगलीच गाजवली आहे. त्यांनी अनुक्रमे 1995-1999 आणि 2014-2019 मध्ये आमदारकीही भूषवलेली आहे. वैजापूरच्या राजकारणात थोरले आणि धाकटे चिकटगावकर हे नेहमीच केंद्रबिंदू राहिलेले आहेत. 2003 नंतर दोन्हीही बंधूंमधील राजकीय महत्त्वाकांक्षा वाढत गेली. दोघांमधील वाद विकोपाला गेले आणि 2004 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीत ही जागा काँग्रेसला सोडली गेली. या निवडणुकीत धाटके चिकटगावकर अपक्ष उमेदवार होते. मात्र थोरल्या चिकटगावकरांनी धाकट्या चिकटगावकरांपासून दूर राहून काँग्रेसचे उमेदवार भाऊसाहेब ठोंबरे यांच्या प्रचाराची धुरा सांभाळली होती. 2009 मधील विधानसभा निवडणुकीत दोघेही चिकटगावकर बंधू अपक्ष उमेदवार म्हणून आमने-सामने होते. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत दोघांमधील भाऊबंदकी संपुष्टात येऊन भाऊसाहेब चिकटगावकरांच्या गळ्यात आमदारकीची माळ पडली होती. त्यानंतर साधरणतः दोन वर्षांनी कैलास पाटील चिकटगावकर यांचे निधन झाले.

2019 मध्ये काका-पुतण्यात नाराजी

2019 मधील विधानसभा निवडणुकीपूर्वी कैलास पाटील चिकटगावकर यांचे पुत्र अभय पाटील चिकटगावकर यांचे पुत्र अभय पाटील चिकटगावकर राजकारणात सक्रिय होऊन त्यांनी निवडणुकीत उमेदवारी मिळवण्यासाठी पक्षश्रेष्ठींकडे ताकद पणाला लावली. अखेर काकांनी माघार घेत उमेदवारी पुतण्याला दिली. मात्र यात अभय पाटील यांचा पराभव झाला. नंतर काही काळ दोघांमधील नातं आलबेल असतानाच पुतण्याने बंड केल्याची चर्चा होऊ लागली. पक्षातील कार्यक्रमांना तो गैरहजर राहू लागला. त्यातच त्यांनी जिल्हा कार्याध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे काका-पुतण्यातील बेबनाव चव्हाट्यावर आला. आता तर पक्षातील मुस्कटदाबी सहन होत नसल्यामुळे आपण भाजपमध्ये प्रवेश करणार आहोत, असं वक्तव्य अभय पाटील चिकटगावकर यांनी केलं आहे. यामुळे भाऊसाहेब चिकटगावकरांना मोठा धक्का बसला आहे.

इतर बातम्या-

वेडे लोक बरळत असतात, ते कोणत्या नशेत बरळतात याचा एनसीबीने तपास करावा; राऊतांचा कंगनाला टोला

नागपुरात जमावबंदी असताना शरद पवार यांच्या सभेला परवानगी कशी?; रविकांत तुपकर यांचा सवाल

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.