Diwali 2020 | दिवाळीच्या खास दिवशी लक्ष्मीमातेसाठी बनवा ‘या’ गोड पदार्थांचा नैवेद्य!

दिवाळीच्या विशेष प्रसंगी घरात आनंद आणि समृद्धी टिकून राहावी म्हणून लक्ष्मीमातेला नैवेद्य (Prasad) अर्पण केला जातो.

Diwali 2020 | दिवाळीच्या खास दिवशी लक्ष्मीमातेसाठी बनवा ‘या’ गोड पदार्थांचा नैवेद्य!
Follow us
| Updated on: Nov 13, 2020 | 5:15 PM

मुंबई : हिंदू परंपरेनुसार दिवाळीचा (Diwali 2020) पाच दिवसांचा उत्सव कार्तिक महिन्याच्या त्रयोदशीपासून सुरू होतो. या दिवसाला धनतेरस किंवा धनत्रयोदशीदेखील म्हणतात. धनत्रयोदशी आणि दिवाळीसाठी लोक आधीच तयारी करत असतात. या विशेष दिवशी आई लक्ष्मी, भगवान धन्वंतरि आणि कुबेर यांची पूजा केली जाते. धनतेरसच्या दिवशी विशेषतः भगवान धन्वंतरी आणि धनदेवतेची पूजा केली जाते. तर, दिवाळीच्या दिवशी गणपती आणि देवी लक्ष्मीची पूजा अर्चना करुन मिठाई वाटली जाते (Diwali Special Sweets For Pooja Prasad).

दिवाळीच्या विशेष प्रसंगी घरात आनंद आणि समृद्धी टिकून राहावी म्हणून लक्ष्मीमातेला नैवेद्य (Prasad) अर्पण केला जातो. या खास दिवशी तांदूळ, गूळ आणि नारळ मिसळून गोड पदार्थ तयार केले जातात. या गोड पदार्थांना नैवेद्य म्हणून अर्पण केले जाते. या दिवशी प्रसादासाठी तुम्ही देखील खीर, फिरणी, गुळाचीची खीर आणि खोबऱ्याचे लाडू बनवू शकता.

तांदळाची खीर

बहुतेक सणांच्या दिवशी तांदळाची खीर बनविली जाते. तांदळाची खीर लक्ष्मी मातेचा आवडता पदार्थ म्हणून ओळखली जाते. तांदळाची खीर बनवण्यासाठी एक लिटर दुधात मुठभर बासमती तांदूळ, वेलची पूड, 8 चमचे साखर घालून सतत ढवळत राहा. खीर शिजल्यानंतर त्यात काजू-पिस्ता, बदाम यांचे बारीक काप करून घाला. 10 ते 15 मिनिटे या खिरीला उकळी काढून, खाण्यास सर्व्ह करा (Diwali Special Sweets For Pooja Prasad).

केशरी गोड भात

केशरी भात ही एक गोड पदार्थ आहे. तांदळासह साखर, केशर, ड्रायफ्रूट्स या पदार्थामध्ये वापरले जातात. यासाठी एक कप तांदूळ हलके शिजवावे. साखरेचा पाक करून शिजवलेल्या तांदळामध्ये घालावा. यानंतर तांदूळ एक तासभर केशरच्या पाण्यात भिजत ठेवा. यानंतर कढईत तूप घालून नंतर काजू, मनुका, बदाम, पिस्ता, थोडी साखर आणि भात घाला. या सर्व गोष्टी व्यवस्थित मिसळून भात नीट शिजू द्या.

फिरणी

‘फिरणी’ हा दुधापासून बनवलेला नैवेद्याचा पदार्थ आहे. देवी लक्ष्मीला नैवेद्य म्हणून फिरणी अर्पण केली जाते. फिरणी बनवण्यासाठी एका भांड्यात एक लिटर दूध घेऊन त्यात साखर घाला. दूध घट्टसर होईपर्यंत उकळा. यानंतर त्यात काजूचे काप, मनुका, बदाम आणि पिस्त्याचे काप घाला. व्यवस्थित शिजवून खजूर आणि मनुकासह सजवून सर्व्ह करा (Diwali Special Sweets For Pooja Prasad).

गुळाचे लाडू

गुळाचे लाडू बनवण्यासाठी 80 ग्रॅम गुळामध्ये 2 चमचे साखर आणि अर्धा कप पाणी मिसळा. गूळ व्यवस्थित वितळत नाही तोपर्यंत हे मिश्रण मंद आचेवर शिजवा. दुसर्‍या कढईत 50 ग्रॅम बेसन, 250 ग्रॅम तूपात खरपूस भाजा. बेसन मिश्रणात 150 ग्रॅम रवा घालून पुन्हा एकदा परतून घ्या. या मिश्रणात वेलची, काजू, पिस्ता, बदाम काप घालून व्यवस्थित मिसळा. त्यानंतर त्यात गुळाचे पाणी घाला आणि ढवळत राहा. घट्टसर गोळा तयार झाल्यावर या मिश्रणाचे लाडू वळून सर्व्ह करा.

खवा-नारळाचे लाडू

खवा-नारळाचे लाडू बनवण्यासाठी 2 कप किसलेले खोबरे सुके होईपर्यंत 2 ते 3 मिनिटे परतून घ्या. त्यानंतर एका कढईत एक चमचा तूप, एक कप खवा घालून मिश्रण व्यवस्थित ढवळत राहा. खवा वितळू लागला की, त्यात अर्धा कप साखर घाला. नंतर काजू, मनुका, बदाम आणि परतून घेतलेले खोबरे घाला. हे मिश्रण प्लेटमध्ये काढा. मिश्रण थोडे थंड झाले कि त्याचे लाडू वळा.

कोणत्याही उपासनेत प्रसादाला अर्थात नैवेद्याला खूप महत्त्व आहे. दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर देवाला प्रसन्न करण्यासाठी आपणही हे गोड पदार्थ नक्की ट्राय करू शकता.

(Diwali Special Sweets For Pooja Prasad)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.