कोव्हिड - 19 जीवघेण्या (COVID-19 Pandemic) संसर्गाला रोखण्यासाठी संपूर्ण देश लॉकडाऊन कारावा लागला. या काळात अनेक लहान-मोठे उद्योग आणि व्यवसाय ठप्प झाले. याच लघू उद्योगांना पुन्हा चालना देण्यासाठी सरकारने महत्त्वाची पाऊलं उचलण्यास सुरुवात केली आहे.
आता मोदी सरकार छोट्या व्यावसायिकांना भारतीय रेल्वेसोबत (Indian Railway) काम करून पैसे कमावण्याची सुवर्णसंधी देत आहे.
भारताला स्वावलंबी करण्यासाठी भारतीय रेल्वेने लघु आणि मध्यम उद्योगांना भागीदारी देण्याची संधी दिली आहे. यामध्ये व्यावसायिक त्यांच्या वस्तू रेल्वेला विकून मोठी कमाई करू शकतात.
रेल्वे वर्षाला 70,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त वस्तू खरेदी करतं - भारतीय रेल्वेने डब्बे आणि इंजिन तयार करण्यासाठी MSME (Micro, Small, and Medium Enterprises) म्हणजेच लहान उद्योगांना सहभागी होण्याची ऑफर केली आहे.
भारतीय रेल्वे वर्षाकाठी 70,000 कोटींपेक्षा जास्त किंमतीची उत्पादने खरेदी करते. मेक इन इंडिया धोरणांतर्गत, केवळ 50 टक्के पेक्षा जास्त स्थानिक उत्पादने असलेले पुरवठा करणारे रेल्वे वॅगन, ट्रॅक आणि एलएचबी डब्यांच्या टेंडरमध्ये 50 टक्के अधिक स्थानिक उत्पादनं भागीदारी करू शकतात.
रेल्वेत कोणत्याही टेंडरच्या 25 टक्के खरेदीत लहान उद्योगांना 15 टक्क्यांपर्यंत प्राधान्य मिळेल. याखेरीज लघुउद्योगांना सुरक्षा ठेव आणि सुरक्षा ठेव रक्कम जमा करण्याच्या अटीही अटीही घालण्यात आल्या आहेत.
इथे करा रजिस्ट्रेशन - तुम्हालाही रेल्वेसोबत व्यवसाय करायचा असेल तर https://ireps.gov.in/ आणि https://gem.gov.in वर तुम्ही नोंदणी करू शकता.