गीता जयंतीच्या दिवशी करा हे खास उपाय, श्रीकृष्णांच्या आशीर्वादाचा होईल वर्षाव

गीता जयंती हा एक महत्त्वाचा सण आहे. या दिवशी श्रीकृष्णांनी कुरुक्षेत्राच्या रणांगणात अर्जुनाला गीतेचा उपदेश केला होता. आपल्यावर श्रीकृष्णाची कृपा राहण्यासाठी गीता जयंतीच्या दिवशी काही विशेष उपाय केले जातात. ज्याद्वारे तुम्ही तुमचे जीवन आनंदी करू शकतात. जाणून घेऊया गीता जयंतीच्या दिवशी कोणते उपाय करावे.

गीता जयंतीच्या दिवशी करा हे खास उपाय, श्रीकृष्णांच्या आशीर्वादाचा होईल वर्षाव
Follow us
| Updated on: Jan 03, 2025 | 8:32 PM

गीता जयंती हा सण हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण जो दरवर्षी साजरा केला. गीतेमध्ये मोक्ष प्राप्तीचा मार्ग सांगितला आहे. मोक्ष म्हणजे ईश्वराशी एकरूप होणे किंवा मुक्ती. गीता जीवन जगण्याची कला शिकवते. भागवत गीतेच्या शिकवणीचे स्मरण आणि उत्सव साजरा करण्यासाठी गीता जयंती साजरी केली जाते. गीता जयंतीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णांनी कुरुक्षेत्राच्या रणांगणात अर्जुनाला गीतेचा उपदेश केला होता. गीता जीवन, कर्म, धर्म आणि मोक्ष या तत्वांबद्दल सखोल ज्ञान देते. गीता जयंतीच्या दिवशी गीतेच्या ज्ञानाचा प्रकाश पसरतो. गीतेमध्ये कर्मयोगाचे महत्त्व सांगण्यात आले आहे. माणसाने आपले काम निस्वार्थपणे करत राहिले पाहिजे. कितीही कठीण परिस्थिती असली तरीही संयम आणि शांतता ठेवावी असे गीता शिकवते. गीतेचा अभ्यास हा आध्यात्मिक विकासास मदत करतो. गीता आपल्याला आपल्यातील देवाशी जोडण्याचा मार्ग दाखवते.

कधी आहे गीता जयंती?

मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला गीता जयंती साजरी केली जाते. यावर्षी गीता जयंती 11 डिसेंबर रोजी पहाटे 3:42 मिनिटांनी सुरू होईल आणि 12 डिसेंबर रोजी पहाटे 1:09 मिनिटांनी संपणार आहे. गीता जयंती 11 डिसेंबरला साजरी केली जाणार आहे.

गीता जयंतीला करा हे खास उपाय

1. गीता जयंतीच्या दिवशी भगवद्गीतेचे वाचन करणे शुभ आणि पुण्य कर्म मानले जाते. गीतेचे ज्ञान जीवनातील अनेक समस्यांचे निराकरण करते आणि गीतेच्या वाचनाने व्यक्तीला आत्मज्ञान प्राप्त होते.

हे सुद्धा वाचा

2. गीता जयंतीच्या दिवशी विधीप्रमाणे श्रीकृष्णाची पूजा करावी. कृष्णाच्या मूर्ती समोर किंवा फोटो समोर दिवा, उदबत्ती लावून फुले अर्पण करावी.

3. गीता जयंतीच्या दिवशी उपवास केल्याने मनःशांती मिळते आणि असे म्हणतात की या दिवशी उपवास केल्याने श्रीकृष्णांचा आशीर्वाद प्राप्त होतो.

4. या दिवशी गरिबांना पैसे, अन्न, कपडे दान करा. या दिवशी दान केल्याने पुण्य मिळते आणि जीवनात सुख-समृद्धी येते.

5. गीता जयंतीच्या दिवशी “ओम नमो भगवते वासुदेवाय” या मंत्राचा जप करा. या मंत्राचा जप केल्याने कृष्ण प्रसन्न होतील.

6. भगवान विष्णूला तुळस अत्यंत प्रिय आहे. गीता जयंतीच्या दिवशी तुळशीची पूजा करून श्रीकृष्णाला तुळशीची पाने अर्पण करा.

7. गीता जयंतीच्या दिवशी महादेव आणि पार्वती ची पूजा करा. गीता जयंतीच्या दिवशी प्रत्येकाने गीतेचा ज्ञान इतरांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

गीतेचे वाचन आणि अभ्यास केल्याने आत्मज्ञान प्राप्त होते तसेच गीतेमुळे जीवनाचा योग्य मार्ग कळतो. गीतेच्या शिकवणीचे पालन केल्याने मन शांत राहते आणि तणाव कमी होतो. गीता जयंतीच्या दिवशी पूजा, मंत्र, जप आणि दान केल्याने सुख समृद्धी येते आणि गितेच्या ज्ञानाने मोक्ष प्राप्त होतो. गीता जयंतीच्या दिवशी पूजा, मंत्र जप, दान केल्याने श्रीकृष्णांची कृपा होऊन जीवनात यश प्राप्त होते.

गीतेमध्ये जीवन जगण्याचा योग्य मार्ग सांगितला आहे. या उपायांचे पालन करून आपण गीतेचे ज्ञान आपल्या जीवनात आत्मसात करू शकतो आणि चांगले जीवन जगू शकतो. हे उपाय फक्त गीता जयंतीच्या दिवशीच नाही तर वर्षभर देखील करता येतात.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही )

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.