सारा अली खानही घरी नाही; एनसीबी कार्यालयात दीड तास उशिराने पोहोचणार

अभिनेत्री सारा अली खान आणि श्रद्धा कपूर यांनाही ड्रग्सप्रकरणी चौकशीचं समन्स बजावण्यात आलं आहे. त्यामुळे या दोन्ही अभिनेत्री कोणत्याही क्षणी एनसीबी कार्यालयात दाखल होण्याची शक्यता आहे.

सारा अली खानही घरी नाही; एनसीबी कार्यालयात दीड तास उशिराने पोहोचणार
अभिनेता सैफ अली खान आणि अमृता सिंहची मुलगी सारा अली खानने गेल्यावर्षी प्रदर्शित झालेल्या 'केदारनाथ' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एण्ट्री केली होती. यानंतर ती 'सिंबा' चित्रपटात दिसली होती.
Follow us
| Updated on: Sep 26, 2020 | 11:18 AM

मुंबई: अभिनेत्री सारा अली खान आज एनसीबी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहणार आहे. ड्रग्सप्रकरणात तिचीही चौकशी होणार असून ती चौकशीसाठी दीड तास उशिराने एनसीबी कार्यालयात पोहोचणार आहे. अभिनेत्री दीपिका पदुकोण प्रमाणे साराही घरी नसून ती तिच्या एका मित्राच्या घरी थांबल्याचं सूत्रांनी सांगितलं. (sara ali khan will reaches NCB office)

अभिनेत्री सारा अली खान आणि श्रद्धा कपूर यांनाही ड्रग्सप्रकरणी चौकशीचं समन्स बजावण्यात आलं आहे. त्यामुळे या दोन्ही अभिनेत्री कोणत्याही क्षणी एनसीबी कार्यालयात दाखल होण्याची शक्यता आहे. चौकशीच्या पार्श्वभूमीवर साराच्या घरासमोर पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मात्र, मीडियाचा ससेमिरा चुकविण्यासाठी ती घरी थांबण्याऐवजी मित्राच्या घरी थांबली आहे. वांद्रे येथे राहणाऱ्या एका मित्राच्या घरी ती थांबल्याचं सूत्रांनी सांगितलं. साराची आज ११ वाजता चौकशी होणार होती. मात्र, तिची वकिलांशी अजूनही सल्लामसलत सुरू असल्याने तिने चौकशीला उपस्थित राहण्यासाठी एनसीबीकडे वेळ वाढवून मागितला आहे. त्यामुळे आता ती दुपारी 12.30 वाजता एनसीबी कार्यालयात उपस्थित राहणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

दरम्यान, काल दिवसभर सारानेही तिच्या वकिलांशी चर्चा केली. एनसीबीच्या चौकशीला कसं सामोरे जायचं? इथपासून ते एनसीबीकडून विचारल्या जाणाऱ्या संभाव्य प्रश्नांवरही चर्चा करण्यात आल्याचं सांगण्यात येत.

पाच अधिकारी चौकशी करणार

दरम्यान, एनसीबीचे पाच अधिकारी साराची चौकशी करणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. चौकशी दरम्यान साराला कोणताही फोन घेण्यास किंवा फोन करण्यास मज्जाव करण्यात येणार असून चौकशी कक्षात तिला एकटीलाच थांबावं लागणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. (sara ali khan will reaches NCB office)

सारा अली खानला काय प्रश्न विचारले जाणार?

1) सुशांतशी मैत्री कधी झाली? 2) सुशांतच्या फार्म हाऊसवर कधी पार्टी केली होती. 3) सुशांतशी किती वर्षांपासून ओळख होती? श्रद्धा कपूरला ओळखते का? 4) रिया आणि सुशांतसोबत कधी कुठल्या ड्रग्जच्या पार्टीमध्ये सामील झाली होती का? 5) सुशांतसोबत बँकॉक टूरमध्ये काय झालं होतं आणि कोण कोण त्याच्यासोबत होतं? 6) सुशांतसोबत केदारनाथच्या सेट वर ड्रग्ज घेतले होते का ? 7) रियाने सांगितलं की साराकडून सुशांत आणि रियाने पहिल्यांदा ड्रग्ज मागवले होते. त्यामुळे ती कुठल्या ड्रग्ज पेडलरच्या संपर्कात होती का? 8) बॉलिवूडमध्ये कोण कोण ड्रग्ज घेतं काही माहिती आहे का? 9) पावना डॅम येथील बोट चालकचा स्टेटमेंट साराला ऐकवलं जाणार आणि त्यावर तिला विचारण्यात येणार 10) कुठलं अजून व्यसन आहे का? 11) सारा कुठल्या ड्रग्ज पेडलरच्या संपर्कात होती का? जर होती तर ती संपर्कात कशी आली 12) सुशांत ड्रग्ज घेत होता का? आणि कोण त्याला ड्रग्ज देत होतं? 13) बॉलिवूडमध्ये ज्या पार्ट्या होतात त्या पार्ट्यांमध्ये कधी सारा गेली होती का? तिथे कधी ड्रग्ज घेतले होते का? 14) ड्रग्ज चॅट संदर्भात आणि रियाच्या जबाबा वर सुद्धा साराला विचारण्यात येणार आहे. 15) जया सहा आणि श्रुती मोदीला ओळखते का? कधीपासून ते सुशांतला ड्रग्ज पुरवत होते का? 16) सुशांतच्या स्टाफने जबाब दिला आहे की सारा सुशांतच्या पार्टीमध्ये असायची. त्यावर सुद्धा साराला विचारण्यात येणार आहे.

संबंधित बातम्या:

दीपिका, सारा, श्रद्धाची NCB कडून चौकशी, ‘हे’ प्रश्न विचारले जाण्याची शक्यता

दीपिकाची चौकशी संध्याकाळपर्यंत चालणार; ‘हा’ मराठमोळा अधिकारी करणार तपास

Drugs Case LIVE | करिश्मा प्रकाश NCB कार्यालयात दाखल, तासाभरापासून दीपिकाची चौकशी सुरु

(sara ali khan will reaches NCB office)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.