खुशखबर! आता फक्त एका दिवसात अॅमेझॉन करणार ऑर्डरची डिलीव्हरी, 50 शहरांत सेवा सुरू
ई कॉमर्स क्षेत्रातही स्पर्धा वाढत असल्याने सर्व वेबसाईट्स आपल्या ग्राहकांना चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यात अमेरिकेतली दिग्गज अॅमेझॉनने एक मोठा निर्णय घेतला आहे
जगभरात ई कॉमर्स (E Commerce) वेबसाईट्सने एक समांतर अर्थव्यवस्था उभी केली आहे. दररोज या क्षेत्रात नवनवीन बदल होत आहेत. ई कॉमर्स क्षेत्रातही स्पर्धा वाढत असल्याने सर्व वेबसाईट्स आपल्या ग्राहकांना चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यात अमेरिकेतली दिग्गज अॅमेझॉनने एक मोठा निर्णय घेतला आहे ज्यामुळे ग्राहकांना मोठा फायदा होणार आहे.
अॅमेझॉनने (amazon) फक्त एका दिवसात सामानाची डिलीव्हरी देण्याची सेवा सुरू केली आहे. ही सेवा अॅमेझॉनच्या प्राईम (amazon prime) ग्राहकांसाठी असणार आहे. ब्राझिलमध्ये (Brazil) अॅमेझॉनची ही विशेष सेवा सुरू करण्यात आली आहे. लॅटिन अमेरिकेत सध्या ई कॉमर्स कंपन्यांमध्ये मोठी स्पर्धा आहे. अशात अॅमेझॉनने एका दिवसात डिलीव्हरी देण्याची सेवा सुरू केल्याने ग्राहकांना याचा मोठा फायदा मिळणार आहे. (e commerce compony Amazon has launched a one-day delivery service)
अॅमेझॉनची एका दिवसात डिलीव्हरीची सेवा अमेरिका (UAS), कॅनडा (Canada) आणि इंग्लंडमध्ये (UK) सुरू आहे. आता ती ब्राझिलमध्येही सुरू करण्यात आली आहे. ब्राझीलमध्ये दोन वर्षांपूर्वी अॅमेझॉनने प्राईम सेवा सुरू केली होती. आता या प्राईम ग्राहकांना एका दिवसात सामानाची डिलीव्हरी दिली जाणार आहे. सुरूवातीला ब्राझीलच्या राजधानीसह 50 शहरांमध्ये ही सेवा सुरू करण्यात आली आहे.
ब्राझीलच्या अॅमेझॉन प्राईमच्या प्रमुख मारियाना रोथ यांनी सांगितलं की, ”ब्राझील एक खंडप्राय देश आहे. त्यामुळे दळणवळण आणि वाहतूक इथल्या ई कॉमर्सपुढची मोठी समस्या आहे. मात्र, तरीही अॅमेझॉन आपल्या ग्राहकांना चांगली सेवा देण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवत असते. एका दिवसात सामान डिलीव्हरी करण्याच्या निर्णयामुळे ग्राहक अॅमेझॉन प्राईमकडे आकर्षित होतील”, असा विश्वासही रोथ यांनी व्यक्त केला.
संबंधित बातम्या :