Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अर्जुन खोतकरांवरची कारवाई शिवसैनिकांच्या जिव्हारी, जालन्यात ED च्या मदतीने शिवसेनेचा ‘गेम’ केल्याची भावना

जालन्यात शिवसेनेची रुजवात करणाऱ्या अर्जून खोतकरांवर ईडीची कारवाई झाल्याने शिवसैनिकांमध्ये प्रचंड संताप आहे. ईडीच्या माध्यमातून भाजपने जिल्ह्यातील शिवसेनवर घाव घालण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा येथील राजकारणात सुरु आहे.

अर्जुन खोतकरांवरची कारवाई शिवसैनिकांच्या जिव्हारी, जालन्यात ED च्या मदतीने शिवसेनेचा 'गेम' केल्याची भावना
जालन्यात भाजपने ईडीच्या माध्यमातून शिवसेनेला बाजूला सारल्याची भावना शिवसैनिकांमध्ये आहे.
Follow us
| Updated on: Nov 28, 2021 | 10:16 AM

जालनाः शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) हे रामनगर कारखान्याच्या जमिनीच्या मुद्द्यावरून चांगलेच अडचणीत सापजले आहेत. ईडीने (ED) शुक्रवार आणि शनिवार हे दोन्ही दिवस जालन्यात तळ ठोकून या प्रकरणी कसून चौकशी केली. या चौकशीतून नेमके काय बाहेर येईल, हे आताच सांगता येत नाही, मात्र यामुळे जालन्यात भाजपकडून शिवसेनेचा (Shiv Sena) मोठा गेम झाल्याची प्रतिक्रिया सर्वसामान्यांमध्ये उमटत आहे. भाजपने अगदी पद्धतशीरपणे जालन्यात रुजलेल्या शिवसेनेचा गेम केल्याचे म्हटले जात आहे.

1990 पासून शिवसेना रुजवण्यात खोतकरांचा वाटा

जालन्यात 1990 मध्ये शिवसेना रुजवण्यात अर्जुन खोतकरांसह, माजी आ. शिवाजी चोथे, जिल्हा प्रमुख भास्कर अंबेकर, ए.जे. बोराडे, मोहन अग्रवाल, बद्रीनाथ सोनी आदी ज्येष्ठ नेत्यांचा मोठा वाटा होता. कोणत्याही कार्यक्रमात, नागरिकांच्या सुख-दुःखात धावून जाणारा तो शिवसैनिक अशी पक्षाची ख्याती होती. 1995 मध्ये शिवसेनेचे तीन आमदार होते. नंतर 1999, 2004, 2009, 2014 मध्ये प्रत्येकी एक आमदार शिवसेनेचा होता. तसेच काही काळ जालना पालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीदेखील शिवसेनेच्या ताब्यात होती. आजही जिल्हा परिषदेत शिवसेनेचा अध्यक्ष असून बाजार समितीत अर्जुन खोतकरांचेच नेतृत्व आहे.

2019 पासून भाजपविरोधात खुले बंड

2019 मध्ये लोकसभा निवडणुकीत रावसाहेब दानवे यांच्याविरुद्ध अर्जुन खोतकर उभे होते. परंतु तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस, शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मध्यस्ती करून खोतकरांचे मन वळवले होते. 2019 मधील विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती असतानाही खोतकरांचा परभाव झाला होता. हाच पराभव शिवसेनेच्या जिव्हारी लागला होता. आता भविष्यात पुन्हा खोतकरांकडून दगा होऊ नये, याची तजवीज भाजपकडून आताच केल्याची चर्चा आहे.

इतर बातम्या

पेट्रोल पंपावरील तैनात फौजफाटा वापस बोलावला; नाशिकमधील हेल्मेटसक्तीवर 8 दिवसांत होणार सुनावणी

Vaccination: औरंगाबादेत आता लस प्रमाणपत्र नसलेल्या रिक्षा, बसचालकांवर कारवाई, वाहन जप्त होणार!

'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया.
कोणी महत्वाचं व्यक्ती असतं तर..; रोहित पवारांचा गोपीचंद पडळकरांना टोला
कोणी महत्वाचं व्यक्ती असतं तर..; रोहित पवारांचा गोपीचंद पडळकरांना टोला.
'...त्यांना मन की बात सांगावी', राष्ट्रवादीच्या महिला नेत्यानं डिवचलं
'...त्यांना मन की बात सांगावी', राष्ट्रवादीच्या महिला नेत्यानं डिवचलं.
'कराडच्या सांगण्यावरून देशमुखांनी घुलेला मारहाण...', आरोपींचा खुलासा
'कराडच्या सांगण्यावरून देशमुखांनी घुलेला मारहाण...', आरोपींचा खुलासा.
'त्यांचंही दूध काढू', पिसाळलेला कुत्रा उल्लेख करत शिरसाटांचा पटलवार
'त्यांचंही दूध काढू', पिसाळलेला कुत्रा उल्लेख करत शिरसाटांचा पटलवार.
'वाघ्या'ची चर्चा असताना शाहूंच्या प्रिय खंड्या श्वानाचीही होतेय चर्चा
'वाघ्या'ची चर्चा असताना शाहूंच्या प्रिय खंड्या श्वानाचीही होतेय चर्चा.
कोरटकर थांबलेल्या हॉटेलांना नोटिस दिली; पोलिसांची कोर्टात माहिती
कोरटकर थांबलेल्या हॉटेलांना नोटिस दिली; पोलिसांची कोर्टात माहिती.
कराड-मुंडेंच्या सांगण्यावरून देशमुखांची हत्या,ठाकरेंच्या नेत्याचा आरोप
कराड-मुंडेंच्या सांगण्यावरून देशमुखांची हत्या,ठाकरेंच्या नेत्याचा आरोप.
बंगरुळू हत्या प्रकरण : आरोपीच्या वडिलांनी सांगितला संपूर्ण घटनाक्रम
बंगरुळू हत्या प्रकरण : आरोपीच्या वडिलांनी सांगितला संपूर्ण घटनाक्रम.
देशमुखांच्या हत्येचं शूटींग ज्या फोनमधून केल, त्याचा तपासणी अहवाल समोर
देशमुखांच्या हत्येचं शूटींग ज्या फोनमधून केल, त्याचा तपासणी अहवाल समोर.