जळगावातील कोरोना रुग्णसंख्येत वाढ, एकनाथ खडसे म्हणतात….

कोरोना रुग्णसंख्या वाढीवरुन भाजप नेते एकनाथ खडसे यांनीदेखील (Eknath Khadse on Corona) राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

जळगावातील कोरोना रुग्णसंख्येत वाढ, एकनाथ खडसे म्हणतात....
Follow us
| Updated on: Jun 09, 2020 | 5:58 PM

मुंबई : कोरोना रुग्णसंख्या वाढीवरुन आता भाजप नेते एकनाथ खडसे यांनीदेखील (Eknath Khadse on Corona) राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. “राज्य सरकार आणि प्रशासन हातात हात धरुन काम करत नाही. या हलगर्जीपणामुळे महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दररोज वाढ होत आहे”, असा घणाघात एकनाथ खडसे यांनी केला आहे (Eknath Khadse on Corona).

“जळगाव जिल्ह्यात कोरोना रुग्णांची दररोज संख्या वाढत आहे. याशिवाय जळगावतील कोरोना रुग्णांचा मृत्यूदरदेखील जास्त आहे. जळगावमधील या परिस्थिला प्रशासन आणि शासनाचा हलगर्जीपणा जबाबदार आहे”, असा आरोप एकनाथ खडसे यांनी केला आहे.

“महाराष्ट्रात कोरोना रुग्ण संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. याला प्रतिबंध घालण्यासाठी यंत्रणा कुठेतरी कमी पडत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने आणि सरकारने कठोर पावलं उचलण्याची आवश्यकता आहे. मात्र, प्रशासन आणि सरकार हातात हात धरुन काम करत नाही. या हलगर्जीपणामुळे कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे”, असं एकनाथ खडसे म्हणाले.

“महाराष्ट्रात रुग्णसंख्या वाढणे ही अत्यंत चिंतेची बाब आहे. नागरिकांनीही प्रशासनाच्या सर्व नियमांचे पालन करणं आवश्यक आहे. नागरिक सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करताना दिसत नाहीत. कोरोनाचं मोठं संकंट असताना लोक मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडत आहेत. विशेष म्हणजे अनेक लोक मास्कशिवाय बाहेर फिरतात. त्यामुळे नागरिकांनीदेखील स्वतःची काळजी घेणे आवश्यक आहे”, असं एकनाथ खडसे यांनी सांगितलं.

याआधी भाजपच्या अनेक नेत्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकार आणि प्रशासनाचे अधिकारी यांच्यात समन्वय नसल्याचा आरोप केला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी याच गोष्टीचा धागा पकडत सरकारच्या नेतृत्वाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यानंतर आता एकनाथ खडसे यांनीदेखील राज्य सरकारवर टीका केली आहे.

संबंधित बातम्या :

भाजप नेते ज्योतिरादित्य शिंदे यांना ‘कोरोना’, मातोश्री माधवी राजे शिंदे यांनाही लागण

ममतादीदी, ‘कोरोना एक्स्प्रेस’ तुमचा ‘एक्झिट रुट’ ठरेल, अमित शाह यांचा घणाघात

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.