फडणवीसांचा जळगाव दौरा, खडसेंची भेट नाहीच, फोनवरुन खडसे म्हणाले….

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज (9 जुलै) जळगाव दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ खडसे यांची प्रत्यक्ष भेट होऊ शकली नाही (Eknath Khadse Phone call to Devendra Fadnavis).

फडणवीसांचा जळगाव दौरा, खडसेंची भेट नाहीच, फोनवरुन खडसे म्हणाले....
Follow us
| Updated on: Jul 09, 2020 | 11:34 PM

जळगाव : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज (9 जुलै) जळगाव दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि फडणवीस यांची प्रत्यक्ष भेट होऊ शकली नाही. मात्र, एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांना फोन करत राज्यातील विविध विषयांवर चर्चा केली (Eknath Khadse Phone call to Devendra Fadnavis).

एकनाथ खडसे यांचा पाय फ्रॅक्चर असल्याने ते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी जाऊ शकले नाहीत. मात्र, देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात झाल्याची माहिती कळताच खडसेंनी त्यांना फोन केला. यावेळी खडसेंनी त्यांची आणि इतरांची विचारपूस केली (Eknath Khadse Phone call to Devendra Fadnavis).

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!

देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत फोनवर झालेल्या चर्चेत खडसे यांनी जळगावच्या वरणगाव पोलीस प्रशिक्षण केंद्राबाबत चर्चा केली. वरणगाव पोलीस प्रशिक्षण केंद्र अहमदनदर जिल्ह्यात वळवले आहे. मात्र, हे योग्य नाही. हा जळगाव जिल्ह्यासोबत अन्याय आहे, अशी तक्रार खडसे यांनी फडणवीस यांच्याकडे केली.

याशिवाय सध्या खतांची मोठ्या प्रमाणात साठेबाजी होत आहे. त्यामुळे याविरोधातदेखील आवाज उठवला पाहिजे, अशी चर्चा फडणवीस यांच्यासोबत झाल्याची माहिती एकनाथ खडसे यांनी दिली.

एकनाथ खडसे यांच्या तक्रारीवर देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सर्व मुद्दे उपस्थित करु, असं आश्वासन दिलं. त्याचबरोबर आपण सध्या फक्त कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र दौरा करत असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली.

देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर राज्यातील विविध महापालिकांना भेट देत कोरोनाची परिस्थिती जाणून घेत आहेत. दरम्यान, काल (8 जुलै) देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर हे दिवंगत आमदार हरिभाऊ जावळे यांच्या जळगावच्या घरी जात होते. त्याचवेळी गाडीचा ब्रेक फेल झाल्याने त्यांची गाडी समोरच्या गाडीवर आदळली. त्यामुळे अपघात झाला. सुदैवाने दोघांनाही कोणतीही दुखापत झाली नाही.

'दमानियांना जे करायचं ते करू द्या...', गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल
'दमानियांना जे करायचं ते करू द्या...', गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल.
कल्याण अत्याचार प्रकरण, आरोपी विशाल गवळीच्या वकिलाला धमकी
कल्याण अत्याचार प्रकरण, आरोपी विशाल गवळीच्या वकिलाला धमकी.
बीडच्या फरार आरोपींचं प्रसिद्ध पत्रक जारी, नेमकं काय म्हटलंय?
बीडच्या फरार आरोपींचं प्रसिद्ध पत्रक जारी, नेमकं काय म्हटलंय?.
राऊतांना मातोश्रीवर धुतलं, खोलीत डांबलं? बातम्या व्हायरल; राऊत भडकले
राऊतांना मातोश्रीवर धुतलं, खोलीत डांबलं? बातम्या व्हायरल; राऊत भडकले.
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट, 'या' पाच प्रकारच्या बहिणींना आता...
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट, 'या' पाच प्रकारच्या बहिणींना आता....
'मेजर ध्यानचंद खेलरत्न'ची घोषणा, मनु भाकर-डी गुकेशसह कोणाचा सन्मान?
'मेजर ध्यानचंद खेलरत्न'ची घोषणा, मनु भाकर-डी गुकेशसह कोणाचा सन्मान?.
'आमच्याकडे आता गर्दी, आमच्यासोबत या असं आम्ही साळवींना म्हटलो नाही'
'आमच्याकडे आता गर्दी, आमच्यासोबत या असं आम्ही साळवींना म्हटलो नाही'.
'दादांच्या ताफ्यात वाल्मिक कराडची गाडी..' बीडच्या खासदाराचा गौप्यस्फोट
'दादांच्या ताफ्यात वाल्मिक कराडची गाडी..' बीडच्या खासदाराचा गौप्यस्फोट.
अंत्यविधीची तयारी सुरू अन् 'तो' जिवंत झाला; सिनेमात शोभेल अशी घटना
अंत्यविधीची तयारी सुरू अन् 'तो' जिवंत झाला; सिनेमात शोभेल अशी घटना.
ठाकरे गटाचे राजन साळवी भाजपच्या वाटेवर? होणाऱ्या चर्चांवर म्हणाले...
ठाकरे गटाचे राजन साळवी भाजपच्या वाटेवर? होणाऱ्या चर्चांवर म्हणाले....