Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चांगली बातमीः औरंगाबादेतील ऐतिहासिक दरवाजे अन् शहागंज घड्याळ्याचे मनोरे रोषणाईने उजळणार

नव्या वर्षात ऐतिहासिक नगरी औरंगाबादचे चित्र पालटण्याची योजना महापालिकेने आखली आहे. या वर्षात शहरातील दरवाजांवर आकर्षक रोषणाई केली जाणार आहे.

चांगली बातमीः औरंगाबादेतील ऐतिहासिक दरवाजे अन् शहागंज घड्याळ्याचे मनोरे रोषणाईने उजळणार
औरंगाबादेतील ऐतिहासिक दरवाजे रोषणाईने उजळणार
Follow us
| Updated on: Jan 05, 2022 | 7:00 AM

औरंगाबादः नव्या वर्षात ऐतिहासिक नगरी औरंगाबादचे चित्र पालटण्याची योजना महापालिकेने आखली आहे. या वर्षात शहरातील दरवाजांवर आकर्षक रोषणाई केली जाणार आहे. या योजनेत शहरातील आठ दरवाजे आणि शहागंज येथील ऐतिहासिक घड्याळाच्या मनोऱ्यावर आरजीबीडब्ल्यू लायटिंग केली जाणार आहे. स्मार्टी सिटीने 1 कोटी 40 लाख रुपयांच्या खर्चातून हा प्रकल्प हाती घेतला आहे.

सण-उत्सवांना शहरात विद्युत रंगांची उधळण

महत्त्वाच्या सण आणि उत्सवांच्या प्रसंगी वेगवेगळ्या या ठिकाणी वेगवेगळ्या संकल्पनांवर आधारीत रोषणाई केली जाईल. रात्रीच्या वेळी पर्यटक याकडे विशेष आकर्षित होतील, असा विश्वास स्मार्ट सिटीला वाटतोय. वेरूळ, अजिंठा लेणी पाहून शहरात मुक्कामी आलेल्या पर्यटकांना औरंगाबादमधील दरवाजे आणि ऐतिहासिक ठेव्यांचे दर्शन घडवण्यासाठी हा उपक्रम महापालिकेतर्फे राबवण्यात येत आहे.

कोणत्या 8 दरवाजांवर रोषणाई?

शहरातील रंगीन गेट, खिजरी गेट, काला गेट, पैठण गेट, मेहमूद दरवाजा, नौबत दरवाजा, रोशन गेट, जाफर गेट आणि नव्याने दुरुस्त करण्यात आलेल्या शहागंजच्या वॉच टॉवरवर रोषणाई केली जाईल. स्मार्ट सिटीतर्फे 3 कोटी 20 लाख रुपये खर्च करून 9 दरवाजांची दुरूस्ती आणि सौंदर्यीकरण केले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून ही लायटिंग केली जामार आहे. जानेवारी महिन्यात यासाठीच्या निविदा उघडल्या जातील आणि पुढील तीन महिन्यात हे काम पूर्ण होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

इतर बातम्या-

मुंबईत 500 चौरस फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ, काँग्रेस म्हणते, निर्णय चांगला, पण…

Hariyana: हरियाणात कौटुंबिक कलहातून सुपारी देऊन मुलाने केली वडिलांची हत्या, सोनीपत येथील धक्कादायक घटना

राज ठाकरेंच्या 'हिंदी' विरोधानंतर शेलार आक्रमक; म्हणाले, अभ्यासपूर्ण..
राज ठाकरेंच्या 'हिंदी' विरोधानंतर शेलार आक्रमक; म्हणाले, अभ्यासपूर्ण...
रोहित पवारांकडून दादांचं जंगी स्वागत, जामखेडच्या 'त्या' बॅनरची चर्चा
रोहित पवारांकडून दादांचं जंगी स्वागत, जामखेडच्या 'त्या' बॅनरची चर्चा.
'तुम्हाला चड्ड्याही नव्हत्या तेव्हापासून मी...', पडळकरांचा रोख कोणावर?
'तुम्हाला चड्ड्याही नव्हत्या तेव्हापासून मी...', पडळकरांचा रोख कोणावर?.
काँग्रेसला पुण्यात झटका? संग्राम थोपटे भाजपात? रविवारी देणार राजीनामा?
काँग्रेसला पुण्यात झटका? संग्राम थोपटे भाजपात? रविवारी देणार राजीनामा?.
'मुंडेंची चांगली वाणी बंद पडलीय अन्...', नामदेव शास्त्री काय म्हणाले?
'मुंडेंची चांगली वाणी बंद पडलीय अन्...', नामदेव शास्त्री काय म्हणाले?.
हिंदी ही संपर्कसूत्राची भाषा आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
हिंदी ही संपर्कसूत्राची भाषा आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
मुंडेंसाठी सगळ्यांनी प्रार्थना करा, नामदेव शास्त्रींनी केलं आवाहन
मुंडेंसाठी सगळ्यांनी प्रार्थना करा, नामदेव शास्त्रींनी केलं आवाहन.
..म्हणून अट्टाहास, हिंदीची सक्ती महाराष्ट्रातच का? राज ठाकरेंचा इशारा
..म्हणून अट्टाहास, हिंदीची सक्ती महाराष्ट्रातच का? राज ठाकरेंचा इशारा.
भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांचा पुण्याच्या मशिदीतला व्हिडीओ व्हायरल
भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांचा पुण्याच्या मशिदीतला व्हिडीओ व्हायरल.
नव्या वक्फ कायद्याला तूर्त स्थगिती, कोर्टाच्या निर्णयावर ओवैसी म्हणाले
नव्या वक्फ कायद्याला तूर्त स्थगिती, कोर्टाच्या निर्णयावर ओवैसी म्हणाले.