PHOTO | शत्रू देशांवर नजर ठेवण्यासाठी इस्त्रोचा नवा उपग्रह, लवकरच अवकाशात झेपावणार
शत्रू देशांवर नजर ठेवण्यासाठी इस्त्रो 7 नोव्हेंबर रोजी नवा उपग्रह प्रक्षेपित करणार आहे. हा उपग्रह ढगाळ वातावरणातही पृथ्वीवर नजर ठेवू शकतो (EOS 01 Satellite To Be Launched On November 7).
या उपग्रहामुळे भारतीय सैन्याला मोठी मदत होईल. या उपग्रहाच्या सहाय्याने चीनसह सर्वच शत्रू राष्ट्रांवर लक्ष ठेवण्यास मदत होणार आहे. यासोबत शेती, जंगल आणि पूरसदृश्य स्थितीवरही लक्ष ठेवता येणार आहे.
Follow us on
इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन अर्थात ISRO चा यावर्षीचा पहिला उपग्रह 7 नोव्हेंबरला आकाशात झेपावणार आहे. या उपग्रहाचं प्रक्षेपण 7 नोव्हेंबरला दुपारी 3 वाजून 2 मिनिटांनी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटरमधून होणार आहे.
कोरोना संकटामुळे इस्त्रोचे अनेक प्रोजेक्ट पुढे ढकलण्यात आले होते. अखेर शनिवारी (7 नोव्हेंबर) उपग्रह ‘EOS-01′(अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाईट)चं PSLV-C49 या रॉकेटच्या सहाय्याने प्रक्षेपण केलं जाणार आहे. यासोबतच 9 कस्टमर उपग्रहांचं प्रक्षेपण केलं जाणार आहे. हे सर्व उपग्रह न्यू स्पेस इंडिया लिमिटेडच्या एकत्रित करारानुसार प्रक्षेपित केले जाणार आहेत.
PSLV-C49 रॉकेटसोबत ज्या 9 उपग्रहाचां प्रक्षेपण केलं जाणार आहे त्यामध्ये अमेरिकेचे 4, लिथुआनियाचा एक आणि लग्जम्बर्ग या देशाचे 4 उपग्रह असणार आहेत. या सर्व उपग्रहांचं न्यू स्पेस इंडिया लिमिटेडसोबत करार झाले आहेत.
‘EOS-01’अर्थ ऑब्झर्वेशन रिसेट सॅटेलाईटचं एक आधुनिक प्रकार आहे. याच्या सिंथेटिक अॅपर्चर (SAR)रडारमध्ये कुठल्याही वेळेत आणि कोणत्याही वातावरणात पृथ्वीवर नजर ठेवण्याची क्षमता आहे. हा उपग्रह ढगाळ वातावरणातही पृथ्वीवर नजर ठेवू शकतो.
या उपग्रहामुळे भारतीय सैन्याला मोठी मदत होईल. या उपग्रहाच्या सहाय्याने चीनसह सर्वच शत्रू राष्ट्रांवर लक्ष ठेवण्यास मदत होणार आहे. यासोबत शेती, जंगल आणि पूरसदृश्य स्थितीवरही लक्ष ठेवता येणार आहे.