EPFO Update: आता पेन्शनचे टेन्शन सोडा, ईपीएफओने सुरु केली ही सेवा
निवृत्तीधारकाला दर वर्षी जीवन प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य करण्यात आले आहे. जीवन प्रमाणपत्र सादर न केल्यास त्याचे निवृत्ती वेतन थांबण्याची भीती कायम राहते. ईपीएफओच्या म्हणण्यानुसार, ईपीएस 95 निवृत्तीधारकांना कुठल्याही निश्चित मुदतीऐवजी वर्षभरात जीवन प्रमाणपत्र सादर करता येईल.

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी खात्याने (EPFO) निवृत्तीधारकांच्या अडचणी आणि समस्या दुर करण्यासाठी कंबर कसली आहे. त्यासाठी नव-नवीन तंत्राचा आधार घेत किचकट नियमांना फाटा मारण्यात येत आहे. आजादी का अमृतमहोत्सव या कार्यक्रमातंर्गत ईपीएफओने निवृत्तीच्या परिघातील कर्मचा-यांसाठी (Employees) काही खास सोयी-सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे. आता ईपीएफओने जीवन प्रमाणपत्र (Life Certificate) दाखल करण्याची निश्चित मुदत दूर तर केलीच आहे, पण कर्मचा-यांना निवृत्तीच्याच दिवशी पेंशन पेमेंट ऑर्डर (Pension Payment Order) देण्याची व्यवस्था केली आहे. याचा थेट फायदा दरवर्षी सेवानिवृत्त होणा-या तीन लाख कर्मचा-यांना होणार आहे. निवृत्तीधारकाला दर वर्षी जीवन प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे. जीवन प्रमाणपत्र सादर न केल्यास त्याचे निवृत्ती वेतन थांबण्याची भीती कायम राहते. ईपीएफओच्या म्हणण्यानुसार, ईपीएस 95 (EPS-95) निवृत्तीधारकांना कुठल्याही निश्चित मुदतीऐवजी (Deadline) वर्षभरात जीवन प्रमाणपत्र सादर करता येईल.
क्षेत्रीय कार्यालयात प्रशिक्षण
ईपीएफओने त्यांच्या या सुविधेविषयी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन ट्विट केले आहे. ईपीएफओ द्वारे अंशदात्याला सेवानिवृत्तीच्या दिवशी पेन्शन पेमेंट ऑर्डर मिळेल. देशभरातील सर्वच क्षेत्रीय कार्यालयांना याविषयीचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. त्यात सेवानिवृत्तीच्याच दिवशी निवृत्तीधारकाला पीपीओ देण्याची तयारी नावाचा मासिक वेबिनाराचे आयोजन करण्यात आले आहे. तीन महिन्यांत सेवानिवृत्त होणा-या कर्मचा-यांना नियोक्त्यासह या प्रशिक्षण शिबिरात आमंत्रित करण्यात आले आहे. या योजनेमुळे देशभरात दरवर्षी सेवानिवृत्त होणा-या 3 लाख कर्मचा-यांना लाभ होईल.
वर्षभरात कधीही जमा करा प्रमाणपत्र
यापूर्वी ईपीएफओने सांगितल्याप्रमाणे, आता निवृत्तीधारक वर्षभरात केव्हापण जीवन प्रमाणपत्र दाखल करु शकतो. ते पुढील एक वर्षाकरीता ग्राह्य धरण्यात येईल. निवृत्तीवेतनधारकाला दरवर्षी जीवन प्रमाणपत्र दाखल करणे अनिवार्य आहे. जीवन प्रमाणपत्र सादर न केल्यास त्याचे निवृत्ती वेतन थांबण्याची भीती कायम राहते. ईपीएफओच्या म्हणण्यानुसार, ईपीएस 95 निवृत्तीधारकांना कुठल्याही निश्चित मुदतीऐवजी वर्षभरात जीवन प्रमाणपत्र सादर करता येईल. हे जीवन प्रमाणपत्र पुढील एका वर्षाकरीता वैध असेल. याचा अर्थ एखादा निवृत्तीवेतनधारकाने 15 एप्रिल 2022 रोजी जीवन प्रमाणपत्र दाखल केलेल असेल तर पुढील वर्षाकरीता त्याला 15 एप्रिल 2023 रोजी पूर्वी जीवन प्रमाणपत्र दाखल करण्याची मूभा देण्यात आली आहे.



खासगी क्षेत्रातील कर्मचा-यांना दिलासा
ईपीएस-95 योजनेतील खासगी कर्मचा-यांना पेन्शनचा लाभ मिळतो. ईपीएफओने अशा कर्मचा-यांना जीवन प्रमाणपत्र सादर करण्याच्या नियमांमध्ये डिसेंबर 2019 मध्ये बदल केला आहे. ईपीएफओने या सुधारीत नियमांमुळे दर वर्षी नोव्हेंबर महिन्यात जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची अनिवार्यता समाप्त केली आहे.आता लाभार्थ्यांना वर्षभरात केव्हापण जीवन प्रमाणपत्र सादर करता येणार आहे.