शीतल आमटेंच्या निधनानंतर तरी त्यांच्या कामांना, विचारांना न्याय मिळाला पाहिजे – नीलम गोऱ्हे
शीतलच्या अशा अचानक धक्कादायक आणि ज्या प्रकारे निधन झाल्याचं कळलं त्याचा मला फार मोठा धक्का बसल्याचंही नीलम गोऱ्हे यांनी म्हटलं आहे.
मुंबई : डॉ. शीतल आमटे करजगी यांचं आज अत्यंत धक्कादायक असं निधन झालं. त्यांचा माझा गेले काही महिने परिचय अधिक चांगल्या प्रकारे झाला होता. 25 नोव्हेंबर 2020 ला माझे आणि त्यांचे बोलणं झालं होते. तेच आमचे शेवटचे बोलणे ठरले अशा शब्दात शिवसेनेच्या प्रवक्त्या नीलम गोऱ्हे यांनी शीतल यांच्या जाण्यावर शोक व्यक्त केला आहे. (Even after the death of Sheetal Amte his deeds and thoughts should get justice said by Neelam Gorhe)
इतकंच नाही तर कौटुंबिक प्रश्नाच्या बरोबर त्यांच्या मनात कोणते विषय येत होते. त्यांना कोणत्या अडचणी जाणवत होत्या, त्या बद्दलसुद्धा आम्ही बोललो होतो. त्यानंतर शीतलच्या अशा अचानक धक्कादायक आणि ज्या प्रकारे निधन झाल्याचं कळलं त्याचा मला फार मोठा धक्का बसल्याचंही नीलम गोऱ्हे यांनी म्हटलं आहे.
त्या पुढे म्हणाल्या की, ‘त्या अत्यंत सुविद्य, हुशार, कष्टाळू, कृतिशील समाज सुधारक आणि वेगळ्या प्रकारचा दृष्टिकोन असणाऱ्या होत्या. अनेक आकांक्षा असलेल्या त्या भावनाप्रधान सामाजिक कार्यकर्त्या होत्या. आमच्या एका व्हिडिओ कॉन्फरन्सला त्या महिलांच्या उद्योजकतेच्या विषयामध्ये सामाजिक संस्थांनीने तयार केलेले उद्योग आणि त्याच्यामधली भूमिका या विषयावर त्या सहभागी देखील झाल्या होत्या. मनोगतही मांडले होते.’ असंही नीलम गोऱ्हे यांनी सांगतलं.
यावेळी त्यांनी शीतल यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला आहे. ‘शीतलच्या निधनाने एक अतिशय उमदे असे नेतृत्व आपण गमावलेले आहे. ज्या प्रकारे त्यांनी कुष्ठ रोग्याची सेवा केली, त्याचे व्हीडिओसुद्धा त्यांनी मला बघण्यासाठी पाठवले होते. अत्यंत कष्ट घेऊन त्या सगळे ते काम दुरुस्त करण्याचे प्रयत्न करत होत्या. त्यांना काही सरकारच्याकडून राहिलेल्या प्रकल्पांबद्दल त्यांना काही सहकार्य पाहिजे होती, त्या बद्दलसुद्धा मी त्यांना सांगितले होते. की तुम्ही मला तसे पत्र द्या जेणेकरून त्या त्या विभागाच्या तर्फे पाठपुरावा करायला मदत करते अशी मी ग्वाही दिली होती व शीतल यांनी आभार ही कळवले होते.’ असं नीलम गोऱ्हे यांनी सांगितलं. (Even after the death of Sheetal Amte his deeds and thoughts should get justice said by Neelam Gorhe)
तर ‘शीतल आमटे करजगी यांच्या दुःखद निधनाबद्दल मी श्रद्धांजली व्यक्त करते. त्यांच्यावर प्रेम करणारा आणि ज्यांना त्या हव्या होत्या, ज्यांना त्यांचे महत्व होते. त्यांच्या आणि जे त्यांचे बाकीचे जे सुह्रद, परिवार होते यांच्या दुःखात मी सहभागी आहे. शीतल यांच्या विचारांना त्याच्या मृत्यूनंतर तरी न्याय मिळावा असे मला निश्चित वाटते.’ अशा शब्दात नीलम गोऱ्हे यांनी शीतल आमटे यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
इतर बातम्या –
Photos : समाजसेवेचा अविरत वसा घेणाऱ्या आमटे कुटुंबातील तिसऱ्या पिढीच्या ‘डॉ. शीतल आमटे-कराजगी’
आमटे कुटुंबात नेमका वाद कोणता; डॉ. शीतल आमटे-कराजगींनी का उचललं टोकाचं पाऊल?
#चंद्रपूर : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि महारोगी सेवा समितीच्या CEO डॉ.शीतल आमटे यांची आत्महत्या, आनंदवन येथील राहत्या घरी विष घेऊन आयुष्य संपवलं, काही दिवसांपूर्वी त्यांनी सोशल मीडियावरील महारोगी सेवा समितीच्या लोकांवर केलेल्या आरोपांमुळे खळबळ उडाली होती pic.twitter.com/240a0wVxTt
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 30, 2020
(Even after the death of Sheetal Amte his deeds and thoughts should get justice said by Neelam Gorhe)