नीकची इच्छा नसतानाही लग्नासाठी तगादा लावला? प्रियांका म्हणते…

मुंबई : अमेरिकन सिंगर नीक जॉनस आणि देसी गर्ल प्रियांका चोप्रा यांचं लग्न थाटात पार पडलंय. पण या लग्नानंतर नवा वाद सुरु झालाय. नीक जॉनसची इच्छा नसतानाही प्रियांकाने लग्न करायला लावलं, असा लेख न्यूयॉर्कमधील द कट मासिकाने छापला होता. पण मोठी टीका सहन करावी लागल्यानंतर माफी मागत हा लेख द कटने मागे घेतला आहे. कोणत्याही […]

नीकची इच्छा नसतानाही लग्नासाठी तगादा लावला? प्रियांका म्हणते...
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:52 PM

मुंबई : अमेरिकन सिंगर नीक जॉनस आणि देसी गर्ल प्रियांका चोप्रा यांचं लग्न थाटात पार पडलंय. पण या लग्नानंतर नवा वाद सुरु झालाय. नीक जॉनसची इच्छा नसतानाही प्रियांकाने लग्न करायला लावलं, असा लेख न्यूयॉर्कमधील द कट मासिकाने छापला होता. पण मोठी टीका सहन करावी लागल्यानंतर माफी मागत हा लेख द कटने मागे घेतला आहे.

कोणत्याही पुराव्याशिवाय मारिया स्मिथ नावाच्या पत्रकाराने हा लेख लिहिला होता. या लेखात प्रियांका चोप्रावर गंभीर आरोप करण्यात आले. प्रियांका चोप्रा केवळ पैशांच्या मागे धावणारी अभिनेत्री आहे. नीकसोबत तिचा झालेला विवाह हाही त्याचाच एक भाग आहे. नीकला प्रियांकाशी लग्न करायचं नव्हतं, पण प्रियांकाने ते सगळं जबरदस्तीने घडवून आणलं, असा दावा या लेखात करण्यात आला होता.

या लेखानंतर मनोरंजन विश्वात एकच खळबळ उडाली. केवळ बॉलिवूडच नव्हे, तर हॉलिवूडमधूनही यावर तीव्र प्रतिक्रिया आल्या. नीकचा भाऊ ज्यो जॉनस आणि त्याची होणारी पत्नी सोफिया टर्नरनेही या लेखाचा निषेध नोंदवला. बॉलिवूडमध्ये सोनम कपूरनेही प्रियांका आणि नीकच्या लग्नाबाबत जो लेख छापला होता, त्याचा निषेध केला.

हे सगळं होत असलं तरी देसी गर्ल प्रियांका चोप्रा या गोष्टींना गांभीर्याने घेत नाही. यावर मला व्यक्त होण्याची किंवा कोणतंही भाष्य करावं वाटत नाही. ही गोष्ट मला महत्त्वाची वाटत नाही. सध्या मी आनंद साजरा करत आहे आणि अशा गोष्टी मला आनंद साजरा करण्यापासून रोखू शकत नाहीत, अशी प्रतिक्रिया प्रियांका चोप्राने दिल्लीतील एका कार्यक्रमात दिली.

'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल.
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?.
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?.
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'.
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा.