औरंगाबादमध्ये भर रस्त्यात वडाचं झाड कोसळलं, कारचं मोठं नुकसान!

दुपारी साधारण 1.15 वाजेच्या सुमारास रस्त्याजवळील भला मोठा वटवृक्ष निखळला. रस्त्यावरील एका कारवर तो पडल्यामुळे कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मात्र काही वेळानंतर लगेच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्या मार्गावरून जाणार असल्याने आपत्कालीन पथक त्या ठिकाणी तातडीने आले आणि या मार्गावरून वृक्ष काढून टाकण्यात आला.

औरंगाबादमध्ये भर रस्त्यात वडाचं झाड कोसळलं, कारचं मोठं नुकसान!
औरंगाबादमधील मुकुंदवाडी भागात कारवर वटवृक्ष कोसळला. देवेंद्र फडणवीस थोडक्यात बचावले.
Follow us
| Updated on: Sep 16, 2021 | 6:36 PM

औरंगाबाद: आज केंद्रिय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड (Dr. Bhagwat Karad) यांच्या नेतृत्वात औरंगाबादेत राष्ट्रीय पातळीवरील बँक अधिकाऱ्यांची अत्यंत महत्त्वाची बैठक संपन्न होत आहे. याकरिता माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) हेदेखील उपस्थित आहेत. मात्र फडणवीसांचे शहरात आगमन झाले, त्या वेळेआधीच एक मोठी दुर्घटना त्यांच्या मार्गावर घडली. दैव बलवत्तर आणि माजी मुख्यमंत्री या दुर्घटनेतून बचावले असेच म्हणावे लागेल. त्यांच्या मार्गातील एक महाकाय वडाचा वृक्ष कोसळून पडला. मात्र फडणवीस येण्याआधीच हा वृक्ष मार्गावरून तत्काळ काढून घेण्यात आला.

80 वर्षांपेक्षा जास्त वयाचा वड कोसळला

औरंगाबाद विमानतळापासून ताज हॉटेलकडे येणाऱ्या मार्गात मुकुंदवाडी परिसरातील एक महाकाय वटवृक्ष कोलमडून पडला. जालना रोडवरील मुकुंदवाडी परिसरातील संजयनगर कमानीजवळ ही घटना घडली. दुपारी साधारण 1.15 वाजेच्या सुमारास रस्त्याजवळील भला मोठा वटवृक्ष निखळला. रस्त्यावरील एका कारवर तो पडल्यामुळे कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मात्र काही वेळानंतर लगेच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्या मार्गावरून जाणार असल्याने आपत्कालीन पथक त्या ठिकाणी तातडीने आले आणि या मार्गावरून वृक्ष काढून टाकण्यात आला.

महत्त्वाच्या बैठकीसाठी फडणवीस औरंगाबादेत

औरंगाबादमध्ये आज शहरातील ताज हॉटेलमध्ये देशातील राष्ट्रीयकृत बँकांचे अध्यक्ष, वित्तमंत्रालयातील महत्त्वाचे अधिकारी यांची बैठक संपन्न होत आहे. केंद्रिय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या नेतृत्वात प्रथमच राष्ट्रीय स्तरावरील ही बैठक औरंगाबादमध्ये आयोजित करण्यात आली आहे. याच बैठकीला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार होते. फडणवीसांचा ताफा ज्या मार्गावरून जाणार, त्याच मार्गावर ही दुर्घटना घडल्याने ते बालंबाल बचावले, असे म्हणावे लागेल. ज्या कारवर हा वृक्ष पडला, त्या कारचे मोठे नुकसान झालेले असले तरी या घटनेत कोणीही जखमी झाले नाही.

मार्गावर अनेक जीर्ण वृक्ष

या परिसरातील नागरिकांनी सांगितले की, या मार्गावर अनेक वर्षांपासूनची वडाची झाडं आहेत. ती आता प्रचंड जूनी झाली असून कधीही कोलमडून पडू शकतात. आजच्या घटनेत कुणी जखमी झाले नसले तरी भविष्यात अशी घटना घडू नये, यासाठी महापालिकेने काहीतरी बंदोबस्त करायला पाहिजे, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.

इतर बातम्या- 

74 व्या मराठवाडा मुक्ती संग्राम दिन सोहळ्यासाठी औरंगाबाद सज्ज, पोलिसांचे संचलन, उद्या सकाळी 9 वाजता ध्वजारोहण

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.