गुगल, फेसबुक आणि ट्विटरला झटका; राजकीय जाहिरातींवर बंदी, अमेरिका निवडणुकीपूर्वी दणका
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वात रिपब्लिकनने या कंपन्यांविरोधात सोशल मीडियावर असंख्य तक्रारी केल्या आहेत.
नवी दिल्ली : अमेरिकेच्या निवडणुकांसाठी आता काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. या दरम्यान बड्या टेक कंपन्यांना गुगल, फेसबुक आणि ट्विटरला मोठा झटका लागला आहे. खरंतर, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वात रिपब्लिकनने या कंपन्यांविरोधात सोशल मीडियावर असंख्य तक्रारी केल्या आहेत. या कंपन्या पुराणमतवादी, धार्मिक आणि गर्भपाताविरोधीत विचारांना मुद्दामहून दडपल्याचा आरोप करत आहेत. त्यामुळे आता निवडणुका सुरू होण्याआधी या कंपन्यांच्या सीईओंना अमेरिकन सिनेटसमोर उपस्थित राहावं लागणार आहे. (Facebook google twitter CEO to be present in front of American senate)
बंद झाल्या राजकीय जाहिराती गुगलचे सीईओ सुंदर पिचाई, फेसबुकचे मार्क जुकरबर्ग आणि ट्विटरचे सीआओ जॅक डोर्सी यांना बुधवारी अमेरिकन सिनेटमध्ये उपस्थित राहण्यासाठी सांगण्यात आलं. सिनेटच्या कॉमर्स कमेटीसमोर या तिघांना प्रश्नांची उत्तरं द्यावी लागणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, फेसबुक आता कोणतीही राजकीय जाहिरात दाखवणार नाही. ज्या जुन्या जाहिराती सोशल मीडियावर आहेत, त्या सुरू राहितील पण आता कोणत्याही नवीन राजकीय जाहिराती दाखवता येणार नाहीत. निवडणुकीनंतर गुगलदेखील राजकीय जाहिराती थांबवणार आहे तर निवडणुका जवळ आल्यामुळे ट्विटरनेही सर्व राजकीय जाहिरातींवर बंदी घातली आहे.
टेक कंपन्यांची होणार चौकशी गुगल, फेसबुक आणि ट्विटरच्या सीईओंशी अमेरिकन सिनेटमध्ये चौकशी केली जाणार आहे. यामध्ये कंपन्यांच्या सीईओंना अनेक प्रश्नांची उत्तरं आणि सोशल मीडिया आरोपांची उत्तरं द्यावी लागणार आहेत.
भ्रष्टाचार लपवण्याचा आरोप मंगळवारी पत्रकारांनी ट्रम्प यांना विचारले असता ते म्हणाले की, त्यांचे विरोधक जे बायडेन यांच्या ‘भ्रष्टाचारा’ला दडपण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना भ्रष्टाचार जगासमोर आणायचा नाही. मीडिया बायडेनसोबत आहे असं वाटतं असल्याचंही ट्रम्प म्हणाले.
इतर बातम्या –
Jaan Kumar Sanu Controversy | आता कुमार सानूची ‘जान’ वाचणं कठीण : शालिनी ठाकरे
Sushant Singh Rajput | सुशांत प्रकरणात अडकण्याची शक्यता, बहिणींची कोर्टात धाव!
VIDEO | Mumbai | जान कुमार सानूला बिग बॉसमधून हाकलून द्या, प्रताप सरनाईकांची मागणीhttps://t.co/tAW6ZMtqXI #JaanKumar
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 28, 2020
(Facebook google twitter CEO to be present in front of American senate)