मार्क झुकरबर्गचा सगळ्यात मोठा निर्णय, आता फेसबुकवर नाही होणार पॉलिटिकल ग्रुप्स

अमेरिकेच्या निवडणुकीच्या वेळी कंपनीने हा निर्णय घेतला होता. खरंतर, फेसबुकने 2020 च्या शेवटच्या तिमाहीत चांगला नफा कमावला.

मार्क झुकरबर्गचा सगळ्यात मोठा निर्णय, आता फेसबुकवर नाही होणार पॉलिटिकल ग्रुप्स
Follow us
| Updated on: Jan 28, 2021 | 2:07 PM

नवी दिल्ली : फेसबुकचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकरबर्ग (Facebook CEO Mark Zuckerberg) यांनी एक मोठी घोषणा केली आहे. यापुढे फेसबुकवर पॉलिटिकल ग्रुप्स (civic and political groups) केले जाणार नसल्याचं मार्क झुकरबर्ग यांनी सांगितलं आहे. अमेरिकेच्या निवडणुकीच्या वेळी कंपनीने हा निर्णय घेतला होता. खरंतर, फेसबुकने 2020 च्या शेवटच्या तिमाहीत चांगला नफा कमावला. ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान कंपनीला 11.22 अब्ज डॉलर्स म्हणजेच प्रति शेअर 3.88 डॉलर्सची कमाई केली. (facebook will stop recommending political groups permanently said by ceo mark zuckerberg )

अमेरिका निवडणुकीवेळी घेतला होता निर्णय

ऑक्टोबरमध्ये, कंपनीने 2020 च्या अमेरिकन निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर वातावरण तापू नये म्हणून हा निर्णय घेतला होता. तर कंपनी आपल्या न्यूज फीडमध्ये वापरकर्त्यांद्वारे पाहिलेली राजकीय माहिती कमी करण्याचा विचार करत असल्याची माहितीही मार्क यांनी दिली आहे. झुकरबर्ग म्हणाले की, “आम्ही आमच्या कम्युनिटीकडून फीडबॅक घेतसा आहे. तो ऐकल्यानंतर असं दिसून आलं की, लोक आता राजकीय बातम्या पाहणं पसंत करत नाहीत. त्यामुळे त्यांनी सेवा बदलण्याचा विचार केला आहे.”

2020 मध्ये वाढली फेसबुकची कमाई

2020 च्या शेवटच्या तिमाहीत फेसबुकचा धमाकेदार नफा झाला. कोरोनाच्या जीवघेण्या संसर्गात लोका घरात असल्यामुळे फेसबुकचा वापर वाढला. इतकंच नाही तर डिजिटल जाहिरातींमधून मिळणारा महसूलही वाढला आहे. फॅक्टसॅटने केलेल्या सर्वेक्षणात विश्लेषकांनी फेसबुकने ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत 11.22 अब्ज डॉलर किंवा 3.88 डॉलर्सचा नफा कमावला असल्याची माहिती देण्यात आली आहे. जी मागच्या वर्षाच्या कालावधीपेक्षा 53 टक्के जास्त होती.

12 टक्क्यांनी वाढला यूजर्सचा फायदा

फेसबुकच्या उत्पन्नाबद्दल बोलायचं झालं तर ते 22 टक्क्यांनी वाढून सुमारे 28.07 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचलं आहे. इतकंच नाही तर फेसबुकचा मासिक वापरकर्त्यांचा आधार 12 टक्क्यांनी वाढून सुमारे 2.8 अब्ज पोहोचला आहे. 2020 च्या शेवटी फेसबुकवर तब्बल 58,604 कर्मचारी काम करत होते. (facebook will stop recommending political groups permanently said by ceo mark zuckerberg )

संबंधित बातम्या – 

Signal App मध्ये 8 नवे बदल, WhatsApp ला टक्कर देण्यासाठी लवकर अपडेटेड व्हर्जन

Google चे नवे नियम ऐकले नाहीत तर खरंच Gmail अकाउंट बंद होणार?

नागरिकांकडून WhatsApp ऐवजी Signal अ‍ॅपचा वापर, ‘या’ देशात Signal अ‍ॅप कायमस्वरुपी बॅन

तब्बल 50 कोटी फेसबुक युजर्सचे फोन नंबर टेलिग्रामवर विकले जात असल्याचा दावा

(facebook will stop recommending political groups permanently said by ceo mark zuckerberg )

अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.