शेतकऱ्यांसाठी उर्जामंत्र्यांची मोठी घोषणा; रब्बी हंगामात सिंचनासाठी दिवसाही वीजपुरवठा होणार

सिंचनासाठी अखंडित वीज देण्याच्या सूचना मुख्य अभियंत्यांना देण्यात येतील. | Nitin Raut

शेतकऱ्यांसाठी उर्जामंत्र्यांची मोठी घोषणा; रब्बी हंगामात सिंचनासाठी दिवसाही वीजपुरवठा होणार
Follow us
| Updated on: Nov 12, 2020 | 12:26 PM

नागपूर: नैसर्गिक संकटांमुळे खरीप हंगामात प्रचंड नुकसान सहन करावे लागलेल्या शेतकऱ्यांना आता राज्य सरकारकडून लवकरच दिलासा मिळण्याची शक्यता आहे. रब्बी हंगामासाठी राज्यातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसाही वीज देण्याचा विचार राज्य सरकारकडून सुरु आहे. (Electricity for irrigation facility will be available in day time also in Maharashtra)

राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत यांनी गुरुवारी ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना यासंदर्भातील माहिती दिली. आम्ही राज्यात रब्बी हंगामात शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा वीज देण्याचा विचार करत आहोत. याबाबतचा निर्णय अंतिम झाल्यास सिंचनासाठी अखंडित वीज देण्याच्या सूचना मुख्य अभियंत्यांना देण्यात येतील. कोरोनाच्या संकटानंतर राज्यातील वीजेची मागणी वाढली असली तरी पुरेसा वीजपुरवठा होईल, अशी ग्वाही उर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिली.

तसेच राज्यातील वीज कर्मचाऱ्यांच्या संपाबाबतही नितीन राऊत यांनी भाष्य केले. वीज कर्मचारी सध्या माझ्याशी चर्चा करत आहेत. हा तिढा लवकरच सुटेल. वीज कर्मचारी संपावर जाणार नाहीत. कोणाचीही दिवाळी अंधारात जाणार नाही, असेही नितीन राऊत यांनी सांगितले.

शेतकऱ्यांसाठी खुशखबर; दोन दिवसांत नुकसान भरपाईचे पैसे खात्यात जमा होणार निवडणूक आयोगाने परवानगी दिल्यानंतर अतिवृष्टीग्रस्त भागातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याचा राज्य सरकारचा मार्ग मोकळा झाला होता. त्यानुसार आता येत्या शनिवारपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाईची रक्कम जमा होणार आहे.

जून ते ऑक्टोबरदरम्यान नुकसान झालेल्या सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राज्य सरकारकडून 294 कोटी 81 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. जिल्ह्यातील जवळपास पाच लाख पूरग्रस्त शेतकऱ्यांची खातेनिहाय यादी तयार करण्यात आली आहे. या शेतकऱ्यांच्या खात्यात शनिवारपर्यंत पैसे जमा होतील.

संबंधित बातम्या:

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी केंद्राचे पथक अजूनही आलेच नाही, आता विरोधक गप्प का?: विजय वडेट्टीवार

शेतकरी मदतीला निवडणूक आयोगाची परवानगी, मंत्री विजय वडेट्टीवार यांची माहिती

NPA झालेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा कमी फायदा ही अफवा : विजय वडेट्टीवार

मुंबईत वीजपुरवठा ठप्प होणार नाही; उरण येथे एक ते दोन हजार मेगावॅट क्षमतेचा प्रकल्प उभारण्याचे ऊर्जामंत्र्यांचे निर्देश

चक्रीवादळामुळे खंडित झालेला वीजपुरवठा पूर्ववत, 4 लाखांहून अधिक ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत

(Electricity for irrigation facility will be available in day time also in Maharashtra)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.