ऐन दिवाळीत पिता-पुत्राचा अपघाती मृत्यू, ट्रकच्या चाकाखाली आल्यानं जागीच गमावले प्राण

या अपघाती घटनेचा पोलीस तपास सुरू असून दोन्ही मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचं सांगण्यात येत आहे.

ऐन दिवाळीत पिता-पुत्राचा अपघाती मृत्यू, ट्रकच्या चाकाखाली आल्यानं जागीच गमावले प्राण
Follow us
| Updated on: Nov 17, 2020 | 2:41 PM

जळगाव : दुचाकी घसरल्याने ट्रकच्या चाकाखाली येऊन दुचाकीस्वार पिता-पूत्र जागीच ठार झाले आहेत. हा भीषण अपघात (Accident) आज (मंगळवारी) सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात असलेल्या नेरी गावाजवळ घडला. या अपघाती घटनेचा पोलीस तपास सुरू असून दोन्ही मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचं सांगण्यात येत आहे. (father and son died on the spot under the wheel of the truck in jalgaon)

मिळालेल्या माहितीनुसार, शेख रशीद शेख कालू (वय 65) आणि त्यांचा मुलगा शेख आबीद शेख रशीद (वय 25) अशी अपघातात ठार झालेल्या पिता-पुत्रांची नावं आहेत. ते जामनेर तालुक्यातील वाघरी इथले रहिवासी होते. दोघांच्या अशा अकाली जाण्यामुळे संपूर्ण शेख कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. ऐन दिवाळी ही घटना घडल्यामुळे गावातही शोककळा पसरली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नेरी इथं दर मंगळवारी गुरांचा बाजार भरतो. शेख रशीद हे गुरांचे व्यापारी असल्याने ते त्यांचा मुलगा शेख आबीद सोबत नेरीच्या बाजारात येण्यासाठी निघालेले होते. नेरी गावापासून काही अंतरावर त्यांची (एमएच 19 डीएल 4465) क्रमांकाची दुचाकी रस्त्यावरील चिखलामुळे घसरली.

यामुळे दोघेही बाजूला चालणाऱ्या (जीजे 15 यूयू 1726) क्रमांकाच्या ट्रकच्या मागच्या चाकाखाली आले. ट्रकचे चाक डोक्यावरून गेल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर घटनास्थळी लोकांची मोठी गर्दी झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोघांचे मृतदेह ताब्यात घेतले असून ते शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. तर पुढील तपास सुरू आहे.

इतर बातम्या –

Bus Accident | कराड तालुक्यात मिनी बस नदीत कोसळली, अपघातात 5 जण ठार

काच वाहतूक करणाऱ्या ट्रकला भीषण अपघात, 3 मजूरांचा जागीच मृत्यू

(father and son died on the spot under the wheel of the truck in jalgaon)

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.