Fathers Day 2020 : ‘फादर्स डे’ का साजरा करतात? जाणून घ्या रंजक इतिहास

जगभरात जून महिन्यातील तिसऱ्या रविवारी Fathers Day साजरा केला जातो. 'फादर्स डे'च्या इतिहासाबाबत दोन वेगवेगळे दाखले दिले जातात. (Father’s Day History)

Fathers Day 2020 : 'फादर्स डे' का साजरा करतात? जाणून घ्या रंजक इतिहास
Follow us
| Updated on: Jun 21, 2020 | 5:09 PM

Fathers Day 2020 मुंबई : प्रत्येकासाठी आई-वडील हे नातं फार स्पेशल असतं. आई हे घराचं मांगल्य असते, तर वडील हे अस्तित्व असतात, असं अनेक ठिकाणी म्हटलं जातं. प्रत्येक वडील आपल्या मुलाच्या भविष्यासाठी ते दिवस रात्र मेहनत करत असतात. त्यांच्या सन्मानासाठी आज (21 जून) Fathers Day साजरा केला जात आहे. जगभरात जून महिन्यातील तिसऱ्या रविवारी Fathers Day साजरा केला जातो. (Father’s Day History)

Fathers Day च्या इतिहासाबाबत दोन वेगवेगळे दाखले दिले जातात. फादर्स डे हा 1907 मध्ये व्हर्जिनियामध्ये सर्वप्रथम साजरा केला गेला असं म्हटलं जातं. व्हर्जिनियातील एका खाणीत झालेल्या स्फोटात 210 कष्टकऱ्यांचा मृत्यू झाला होता. या मृतांना विशेष श्रद्धांजली वाहण्यासाठी 19 जून 1907 रोजी फादर्स डे साजरा करण्यात आला. मात्र याबाबत कुठेही अधिकृत नोंद आढळत नाही.

‘फादर्स डे’ चा इतिहास (Father’s Day History)

सोनोरा स्मार्ट डोड हिने 1910 मध्ये साजरा केलेला फादर्स डे हा अधिकृतरित्या पहिला मानला जातो. सोनोरा स्मार्ट डोड लहान असताना तिच्या आईचे अचानक निधन झालं. यानंतर डोडचा सांभाळ तिचे वडील विलियम स्मार्ट यांनी केला. एक दिवस डोड प्रार्थना सभेसाठी गेली असता चर्चमध्ये आई या विषयावर उपदेश देण्यात आला. त्याने डोड ही फार प्रभावित झाली.

सोनेरा मोठी झाल्यानंतर आईप्रमाणे वडिलांसाठी एखादा खास दिवस असावा, या पार्श्वभूमीवर तिने फादर्स डे साजरा करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार तिचे वडील विलियम स्मार्ट यांच्या जन्मदिनी म्हणजे 5 जूनला तिने Father’s Day साजरा केला. वडिलांच्या सन्मानार्थ सोनेराने साजरा केलेल्या फादर्स डे या संकल्पनेला 1924 रोजी अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्रपती कैल्विन कोली यांनी अधिकृतरित्या मंजूरी दिली.

यानंतर 1966 मध्ये राष्ट्रपती लिंडन जॉनसन यांनी दरवर्षी जून महिन्याच्या तिसऱ्या रविवारी फादर्स डे साजरा केला जाईल, अशी घोषणा केली.

मात्र ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड यासारख्या देशात सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या रविवारी फादर्स डे साजरा केला जातो. तर ब्राझीलमध्ये ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या रविवारी फादर्स डे साजरा करतात.

सुरुवातीला केवळ अमेरिकेतच फादर्स डे साजरा केला जात असे. मात्र कालांतराने या दिवसांचं महत्त्व पटल्यानंतर भारतातही Father’s Day साजरा करण्यात येतो. वडिलांप्रती आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी संपूर्ण जगभरात फादर्स डे चे अनोखं महत्त्व आहे. (Father’s Day History)

संबंधित बातम्या  : 

तुळशीची 4 पानं, दालचिनी 2, रोग प्रतिकार शक्तीसाठी आयुष मंत्रालयाचा आर्युर्वेद काढा कसा बनवाल?

‘लीप दिवस’ का साजरा करतात? 29 फेब्रुवारीचा रंजक इतिहास

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.